सेक्सलेस मॅरेज म्हणजे काय? विवाहित तरुणांमध्ये त्याचं प्रमाण का वाढतंय?

    • Author, आदर्श राठोड
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

"आम्हाला वेळेवर काऊन्सिलिंग मिळालं नसतं तर आमचं लग्न तुटलं असतं.”

गुरुग्राममधील इंजीनिअर मनीष (नाव बदललं आहे) याचं 2013 मध्ये लग्न झालं होतं, पण सात वर्षांत म्हणजे 2020 पर्यंत त्याचं पत्नी बरोबरचं नातं बिघडलं.

तो सांगतो, "सगळं ठीक असूनही आमच्यात फार कमी शारीरिक संबंध येत होते. त्याचा परिणाम आमच्या नातेसंबंधांवर दिसू लागला होता. शेवटी आम्हाला मॅरेज काउन्सिलरची मदत घ्यावी लागली."

मनीष आणि त्याची पत्नी दोघंही नोकरी करतात. त्याच्यासोबत जे घडलं ते सामान्य नाही. कमी वयाचं जोडपं, खास करून विवाहित मिलेनियल्स आणि तरुणांमध्ये लैंगिग अनास्था वाढत असल्याचं जगभरात दिसून येतं.

1980 च्या सुरुवातीपासून ते 1990च्या दशकाच्या उत्तरार्धात जन्मलेल्या लोकांना मिलेनियल्स किंवा जनरेशन Y म्हणतात. त्यांचं वय आता 25 ते 40 वर्षांच्या दरम्यान आहे.

खरं तर हे असं वय मानलं जातं की, या वेळी मनुष्य शारीरिक संबंधांमध्ये सर्वात जास्त सक्रिय असतो. याला 'सेक्शुअल प्राईम टाइम' देखील म्हणतात. मात्र याच काळात त्यांच्यात सेक्सची इच्छा कमी होण्याचा ट्रेंड पाहायला मिळतोय.

तरुणांची सेक्समधील आवड कमी होतेय

इंडियाना युनिव्हर्सिटीच्या किन्झी इन्स्टिट्यूट आणि 'लव्ह हनी' या सेक्स टॉय विक्री करणाऱ्या कंपनीनं 2021 मध्ये 18 ते 45 वयोगटातील अमेरिकन तरुणांचं एक सर्वेक्षण केलं.

या सर्वेक्षणानुसार मागील वर्षी लग्न झालेल्या जोडप्यांमध्ये सेक्सची इच्छा कमी होण्याची समस्या दिसून आली.

या नुसार 25.8% विवाहित मिलेनियलस तरुणांची लैंगिग संबंधाबाबत आवड राहिली नाही, त्यांच्या नंतरच्या पिढीतील म्हणजे जनरेशन Z च्या 10.5% तरुणांची सेक्सची इच्छा कमी झालीय. तर जनरेशन X च्या 21.2% लोकांमध्ये सेक्सची भावना कमी आहे.

1965 आणि 1980 दरम्यान जन्मलेल्या जनरेशला X मानलं जातं आणि 1990 च्या दशकातील उत्तरार्धात आणि 2010 च्या सुरुवातीला जन्मलेल्या पिढीला जनरेशन Z असं म्हटलं जातं.

मानसशास्त्रज्ञ शिवानी मिस्त्री साधू दिल्लीत कपल थेरपिस्ट म्हणजेच जोडप्यांच्या काऊन्सलिंगचं काम करतात.

त्या सांगतात की "कमी वयाची जोडपी किंवा मिलेनियल्समध्ये सेक्स बद्दलची रुची कमी होताना दिसतंय. मिलेनियल्स जोडपी सांगतात की त्यांची सेक्स करण्याची इच्छा होत नाहीय आणि शारीरिक संबंध ठेवण्याची वारंवारताही कमी आल्याचं ते सांगतात.

"विवाहित जोडप्यांमध्ये शारीरिक संबंध कमी होणं किंवा लैंगिग संबंध न ठेवणं याला 'सेक्सलेस मॅरेज' म्हणतात.

तज्ज्ञांच्या मते जर एका विवाहित जोडप्यानं एका वर्षात 10 पेक्षा कमी वेळा सेक्स केला असेल तर त्याला सेक्सलेस मॅरेज मानलं जातं.

किन्झी इन्स्टिट्यूटचे संशोधक जस्टिन लेहमिलर म्हणतात, "जेव्हा पती पत्नींपैकी एक किंवा दोघांची सेक्स करण्याची इच्छा कमी होते, तेव्हा त्यांच्यात शारीरिक संबंधात कमी येते. थोडक्यात लैंगिग इच्छेचा अभाव हा लग्न करूनही माणसाला 'सेक्सलेस' बनवतो.

जोडप्यांमधील दुरावा का वाढतोय?

अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील सेक्स थेरपिस्ट क्रिस्टीन लोझानो सांगतात, "सेक्स विषयी इच्छा कमी होणं हा असा विषय आहे की, ज्याची काळजी घेतली नाही तर कालांतरानं ही समस्या वाढत जाते.

जर कुणी सेक्ससाठी वारंवार पुढाकार घेतला आणि त्याचा जोडीदार त्याला नाकारत राहिला तर त्याचा स्वाभिमान दुखावला जातो. त्यावेळी सेक्स नाकारणाऱ्या जोडीदाराला ही पश्चाताप होतो. त्यामुळं अशी परिस्थिती निर्माण होते की, त्याच्या लैंगिग उत्तेजनावर त्याचा परिणाम होऊ शकतो."

त्या पुढे सांगतात की, "इतर वैद्यकीय किंवा मानसिक कारणंही आहेत की, ज्यामुळं सेक्स करणं अशक्य, वेदनादायक, कठीण किंवा अप्रिय बनतं. कामाचा ताण, व्यग्रता आणि लहान मुलांच्या संगोपनात व्यग्र राहणं या कारणांमुळेसुद्धा सेक्स करण्यात कमी येऊ शकते. पती-पत्नीचं एकमेकांच्या इच्छेबाबत खुलून न बोलणंही सेक्सची इच्छा कमी होण्याचं एक कारण असू शकतं."

एका पिढीलाच या समस्येला सामोरं जावं लागत असं नाही. मात्र तज्ज्ञांना यात बदलही दिसून येत आहेत.

सॅन फ्रान्सिस्कोमधील सेक्स थेरपिस्ट सेल्सच्या हर्षमन सांगतात की, "पूर्वी लग्नाच्या 10-15 वर्षांनंतर सेक्स करण्याची इच्छा कमी होत असे. पण आता लग्नाच्या तीन ते पाच वर्षांतच सेक्स करण्याच्या इच्छेत कमी दिसून येत आहे."

हा मुद्दा पुढे नेत कॅलिफोर्निया विद्यापीठातील मानसोपचार विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक किंबर्ली अँडरसन या सांगतात की,

“30 वर्षांपूर्वी माझ्याकडे 50 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक सेक्सबद्दल इच्छा नसल्याची समस्या घेऊन यायचे. हे असे लोक होते की, त्यांची 'सेक्सची इच्छा' या वाढत्या वयामुळे आणि हार्मोन्स मधील बदल आणि आजारांमुळं कमी होतात. पण आता 45 वर्षांखाली जोडप्यांचं 'सेक्सलेस' होण्याचं प्रमाण वाढतंय.”

अनेक प्रकारचे ताण-तणाव

अमेरिकेतील किन्झी इन्स्टिट्यूटचे संशोधक जस्टिन लेहमिलर सांगतात,"अति तणावाचा लैंगिग इच्छेवरही खोलवर परिणाम होतो आणि मिलेनियल्सला त्याच्या आधीच्या पिढीच्या तुलनेनं अधिक तणावाला सामोरं जावं लागलं."

ब्रिटन मधील काऊन्सलिंग नेटवर्क 'रिटेल'च्या 2018 अभ्यासानुसार 30 आणि 40 वयापर्यंतच्या 61 टक्के लोकांनी सांगितलं की, त्यांच्या लहान मुलांच्या संगोपनात वेळ जात असल्यामुळं ते त्यांच्या जोडीदारासोबत कमी प्रमाणात शारीरिक संबंधात ठेवताहेत. 31 टक्के लोकांनी कबूल केलं आहे की, मुलं जन्माला घातल्यानंतर त्यांची सेक्स बद्दलची इच्छा कमी झालीय.

याशिवाय मिलेनियल्सवर करियरमध्ये यशस्वी होण्याचा आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा दबाव आहे. कामाच्या ताणामुळं त्यांना तणावाचा सामना करावा लागत आहे.

डेलॉईट या जागतिक स्तरावरच्या सल्लागार कंपनीनं केलेल्या पाच देशांच्या अभ्यासानुसार 38 टक्के मिलेनियल्स सांगतात की,

कामाचा खूप दबाव आहे.अमेरिकेतील किन्झी इन्स्टिट्यूटचे संशोधक जस्टिन लेहमिलर सांगतात, "अतितणावाचा लैंगिग इच्छेवरही खोलवर परिणाम होतो आणि मिलेनियल्सला त्याच्या आधीच्या पिढीच्या तुलनेनं अधिक तणावाला सामोरं जावं लागलं."

या तणावग्रस्त पुरुषांचं प्रमाण 36% टक्के आहे, तर महिलांचे प्रमाण 41% आहे. म्हणजेच तणावाचा सामना करणाऱ्या पुरुषांच्या तुलनेनं महिलांचं प्रमाण अधिक आहे.

जस्टिन लेहमिलर यांच्या म्हणण्यानुसार "बहुतेक मिलेनियल्स गटातील तरुणांनी 2008 साली मंदीच्या काळात करियरला सुरुवात केली आणि आता कोविड महामारीचा मोठा फटका त्यांना बसलाय.

त्याचबरोबर तंत्रज्ञानात झपाट्यानं बदल होत असताना त्यांना पूर्वीपेक्षा अधिक मेहनत करावी लागणार आहे. ते मिलेनियल्स तरुण 'वर्कहोलिक' झालेत. कामाच्या ताणामुळं अशी परिस्थिती निर्माण झालीय. अधिक कामाच्या दबावामुळं थकवा येतो आणि शेवटी सेक्स करण्याची इच्छा राहत नाही.”

सोशल मीडिया आणि पॉर्न

ब्रिटन मधील काऊन्सलिंग नेटवर्क 'रिटेल'च्या 2018 अभ्यासानुसार 30 आणि 40 वयापर्यंतच्या 61 टक्के लोकांनी सांगितलं की,

"त्यांच्या लहान मुलांच्या संगोपनात वेळ जात असल्यामुळं ते त्यांच्या जोडीदारासोबत कमी प्रमाणात शारीरिक संबंधात ठेवताहेत. 31 टक्के लोकांनी कबूल केलं आहे की, मुलं जन्माला घातल्यानंतर त्यांची सेक्स बद्दलची इच्छा कमी झालीय."

याशिवाय मिलेनियल्सवर करियरमध्ये यशस्वी होण्याचा आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा दबाव आहे. कामाच्या ताणामुळे त्यांना तणावाचा सामना करावा लागत आहे.

डेलॉईट या जागतिक स्तरावरच्या सल्लागार कंपनीनं केलेल्या पाच देशांच्या अभ्यासानुसार 38 टक्के मिलेनियल्स सांगतात की, "कामाचा खूप दबाव आहे."

सोशल मीडिया आणि पॉर्नचा तरुणांच्या लैंगिग जीवनावर होणार परिणाम दुर्लक्षित करता येणार नाही.

तज्ज्ञांचं मत आहे की, सोशल मीडियावर अनेक ब्युटी फिल्टर्स आहेत. अशा परिस्थितीत वास्तविक जीवनात काही लोकांना त्यांच्या शरीराबद्दल न्यूनगंड निर्माण होतं.

काऊन्सिलिंग नेटवर्क 'रिटेल'च्या सर्वेक्षणानुसार 30 वर्षांपेक्षा कमी वयाच्या 37 टक्के तरुणांनी त्यांच्या शरीराविषयी न्यूनगंडाची भावना निर्माण झालीय.

त्याचवेळी न्यूयॉर्कचे सेक्स थेरपिस्ट स्टीफन स्नायडर सांगतात की, "जेव्हा बहुतेक मिलेनियल्स वयात येत होते. तेव्हा इंटरनेटवर पॉर्नची उपलब्धता वाढत होती. आता असं दिसून येतंय की काही लोकांना सेक्स करण्याऐवजी पॉर्न पाहण्यात जास्त आनंद मिळतो."

यावर उपाय काय आहेत?

तणावाची कारणं आयुष्यातून पूर्णपणे काढून टाकता येत नाहीत, तसंच पॉर्न किंवा सोशल मीडियाचा प्रभावही नाहीसा करता येत नाही. मग या कारणामुळं लग्न सेक्सलेस होण्यापासून कसं वाचवता येईलं?

मानसशास्त्रज्ञ शिवानी मिस्त्री साधू सांगतात की, "शरीर संबंधांमध्ये पती-पत्नी या दोघांच्या इच्छा या महत्त्वाच्या आहेत. दोघानांही आनंद मिळायला हवा. दोघांनी परस्पर संवाद, विश्वास आणि एकमेकांच्या इच्छांचा आदर करायला हवा.

तुम्ही किती वेळा सेक्स करता यापेक्षा तुमचं नातं किती घट्ट आहे हे महत्त्वाचं ठरतं. त्या नात्यात किती जवळीकता आहे आणि किती आनंद तुम्हाला मिळतोय याला महत्त्व आहे."

तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, "ज्या जोडप्यात संवाद, समाधान, आनंद आणि नातेसंबंधात परिपूर्णतेची भावना असेल त्याचं सेक्स लाईफ चांगलं आहे, असं म्हणता येईलं."

हे सत्य आहे की, शारीरिक संबंधांमध्ये रस नसणं हा एक असा विषय आहे की, याबाबत अनेक जण आपल्या जोडीदाराशी बोलण्यास लाजतात. पण असं झाल्यास मॅरेज काउन्सिलर किंवा सेक्स थेरपिस्टची मदत घ्यावी असा सल्ला तज्ज्ञ देताना दिसतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)