ब्रॉयलर चिकन खाल्ल्यामुळे वंध्यत्व येतं का? तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे?

 ब्रॉयलर चिकन

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, सुभाष चंद्र बोस
    • Role, बीबीसी तमिळ

भारतातील बहुतांश लोकांच्या आहारात चिकनचा समावेश असतो. पण जे चिकन आपण खातोय, ते रसायनमुक्त किंवा बिनविषारी आहे, हे खरंच त्यांना ठाऊक असतं का?

केंद्रीय मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या 2019 च्या माहितीनुसार, देशात तामिळनाडू हे राज्य सर्वाधिक ब्रॉयलर चिकनचं उत्पादन करतं.

पोल्ट्री फार्मर्स रेगुलेटरी कमिशन (PFRC)च्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, भारतातील पोल्ट्री उद्योग तब्बल 2,04,900 कोटी रुपयांचा आहे.

'स्टॅटिस्टा' या माहितीचे संकलन करणाऱ्या जर्मन कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, 2023 मध्ये एकट्या भारतातच 4,407.24 मेट्रिक टन ब्रॉयलर मांसाचं उत्पादन झालं होतं.

मात्र, अनेक वर्षांपासून या ब्रॉयलर चिकनविषयी विविध अफवा आहेत. या चिकनना चुकीचं इंजेक्शन आणि औषधे दिली जात असल्यामुळे त्यातून आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होत असल्याच्या अफवांचाही त्यात समावेश आहे.

मात्र हे ब्रॉयलर चिकन नेमके काय असतात? त्यांची वाढ कशी होते? ब्रॉयलर चिकन खाल्ल्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतो का याविषयीचा आढावा या लेखात घेण्यात आला आहे.

ब्रॉयलर चिकन काय असतं?

ब्रॉयलर चिकन हे काही नैसर्गिकरित्या जन्माला आलेलं चिकन नसतं.

1930 मध्ये पहिल्यांदा अमेरिकेसह काही देशांमध्ये या प्रकारचं चिकन विकसित करण्यात आलं. कोंबड्यांच्या निरोगी प्रजातींच्या संगमातून ब्रॉयलर चिकनचा विकास करण्यात आला.

नंतर 1960च्या दशकात ब्रॉयलर चिकनचा जगभर प्रसार होण्यास सुरूवात झाली होती. त्यावेळेस याकडे पोल्ट्री मधून मिळणाऱ्या मांसाहाराच्या अपुऱ्या पुरवठ्यावरील उत्तर म्हणून पाहण्यात येत होतं.

नंतर 1960च्या दशकात ब्रॉयलर चिकनचा जगभर प्रसार होण्यास सुरूवात झाली होती. त्यावेळेस याकडे पोल्ट्री मधून मिळणाऱ्या मांसाहाराच्या अपुऱ्या पुरवठ्यावरील उत्तर म्हणून पाहण्यात येत होतं.नंतर 1960च्या दशकात ब्रॉयलर चिकनचा जगभर प्रसार होण्यास सुरूवात झाली होती. त्यावेळेस याकडे पोल्ट्री मधून मिळणाऱ्या मांसाहाराच्या अपुऱ्या पुरवठ्यावरील उत्तर म्हणून पाहण्यात येत होतं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 1960च्या दशकात अपुऱ्या अन्नपुरवठ्यावर पर्याय म्हणून ब्रॉयलर चिकनचा जगभर प्रसार सुरू झाला.

ज्या देशांमध्ये प्रोटिनयुक्त अन्नाचा तुटवडा होता, त्या देशांमध्ये ब्रॉयलर चिकनच्या आगमनाला खूप महत्त्वाचं मानण्यात येत होतं.

ब्रॉयलर चिकनची पूर्ण वाढ होण्यास लागणारा कालावधी, त्याची परवडणारी किंमत आणि प्रोटिनचं अधिक प्रमाण यामुळे ब्रॉयलर चिकन महत्त्वाचं मानण्यात येत होतं.

तेनकसीमध्ये पोल्ट्री फार्म चालवणारे मुथुरामलिंगम म्हणतात, 1970च्या दशकात ब्रॉयलर चिकन तामिळनाडूसह भारतात आले. 1980-85 पर्यत ब्रॉयलर चिकनचं मार्केट जोरदार तेजीत आलं होतं.

त्यानंतरच्या 30 वर्षांमध्ये ब्रॉयलर चिकनने गावरान कोंबडी मागे टाकलं आणि ते सर्वत्र दिसू लागलं.

चिकन

फोटो स्रोत, Getty Images

पोल्ट्री फार्मर्स रेग्युलेटरी कमिशनने दिलेल्या माहितीनुसार, "ब्रॉयलर चिकनमध्ये ज्यांना अंड्यांसाठी जास्त दिवस सांभाळलं जातं त्यांना 'लेयर्स' म्हणतात आणि ज्यांचा वापर कमी दिवसात मांसासाठी केला जातो त्यांना 'ब्रॉयलर्स' म्हणतात."

स्वतंत्र प्रजाती

बालरोजतज्ज्ञ आणि आहारतज्ज्ञ असलेले डॉ. अरुण कुमार सांगतात, "ब्रॉयलर चिकन ही एक खास प्रजाती आहे. ज्याप्रमाणे प्रत्येक प्रजातीचं स्वत:चं असं वैशिष्टयं असतं, त्याचप्रमाणे या प्रजाती वैशिष्ट्यं म्हणजे त्यांची वाढ चटकन होते. त्यामुळेच 1970च्या दशकापासून या प्रकारच्या कोंबड्यांचा वापर मांसासाठी केला जाऊ लागला.

"सुरुवातीच्या काळात ब्रॉयलर चिकनची वाढ 60 दिवसांपर्यत केली जात असे. मात्र नंतरच्या काळात उद्योगात होत असलेल्या बदलांमुळे ब्रॉयलर चिकन 32 दिवसांपर्यत वाढवले जाऊ लागले. हा बदल मुख्यत: कोंबड्यांना देण्यात येत असलेल्या खाद्यामुळे झाला."

ब्रॉयलर चिकनचा विकास कसा झाला?

ब्रॉयलर चिकनची सुरूवात प्रयोगशाळेत झाली. मुथुरामलिंगम सांगतात की यासाठी पहिले संकरीकरण ज्याला प्युअरलाईन म्हणतात ते करण्यात आलं आणि नंतर त्यातून मूळ कोंबडी विकसित करण्यात आली.

"या सुरुवातीच्या कोंबडी पासून मिळालेली अंडी 21 दिवसांपर्यत हॅचरीमध्ये ठेवण्यात आली. हॅचरीमध्ये योग्य तापमान आणि आर्द्रता राखण्यात येतं. इथंच अंडीदेखील उबवली जातात."

"इथून या कोंबड्यांची पिल्लं पोल्ट्री फार्ममध्ये आणल्या जातात आणि पहिल्या आठवड्यात या पिल्लांची वाढ 220 ग्रॅमपर्यंत होते. त्यानंतरच्या आठवड्यांमध्ये त्यांची स्थिर वाढ होत जाते."

Hatchery

फोटो स्रोत, Getty Images

मुथुरामलिंगम सांगतात, आधी जे ब्रॉयलर चिकन 60 दिवसांपर्यत वाढवले जात असे, त्याच ब्रॉयलर चिकनची आता 32 ते 40 दिवसांमध्ये 2.3 किलोपर्यत वाढ होते.

ते सांगतात, ब्रॉयलर चिकनची वाढ त्यांना दिल्या जात असलेल्या खाद्यावर अवलंबून असते.

ब्रॉयलर चिकन आणि गावरान चिकन मध्ये काय फरक असतो?

मुथुरामलिंगम म्हणतात, गावरान किंवा देशी कोंबड्यांची पूर्ण वाढ होण्यासाठी सर्वसाधारपणे 6 महिन्यांचा आणि त्याहून अधिक कालावधी लागतो. मात्र ब्रॉयलर चिकनची वाढ फक्त 32 ते 60 दिवसांमध्ये होते.

ते पुढे सांगतात, याचप्रकारे गावरान किंवा देशी कोंबड्यांमध्ये जी रोगप्रतिकार क्षमता असते ती ब्रॉयलर चिकनमध्ये नसते. कारण ब्रॉयलर चिकनची वाढ होत असताना त्यांना नियमितपणे लसी दिल्या जातात. बर्ड फ्ल्यूसारखे आजार होण्याची शक्यता गावरान कोंबड्यांमध्ये कमी असते.

देशी कडकनाथ प्रजातीच्या चिकनची लोकप्रियता अलीकडे वाढली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, देशी कडकनाथ प्रजातीच्या चिकनची लोकप्रियता अलीकडे वाढली आहे.

आहारतज्ज्ञ मीनाक्षी बजाज म्हणतात, ब्रॉयलर चिकन वाढवताना काही विशिष्ट मार्गदर्शक तत्वांचं पालन करावं लागतं. भारतात ब्रॉयलर चिकनची वाढ कशा पद्धतीने केली पाहिजे याबद्दलची मार्गदर्शक तत्वं किंवा नियम पोल्ट्री फार्मर्स रेग्युलेटरी कमिशनकडून देण्यात येतात.

या नियमांनुसार ब्रॉयलर चिकनचे पालन किंवा वाढ 6 ते 8 आठवड्यांपर्यत केली पाहिजे.

त्याचबरोबर या समितीने प्रत्येक गोष्टीसाटी निकष ठरवून दिले आहेत. ज्यात ब्रॉयलर चिकनला द्यावयाचं खाद्य, पाणी, हवामान, लस आणि औषधे इत्यादी बाबी आहेत.

ब्रॉयलर चिकन हे अत्यंत निरोगी पद्धतीने वाढवलेल्या कोंबड्या असतात असं, पोल्ट्री फार्मर्स रेग्युलेटरी कमिशन सांगतं. मात्र ब्रॉयलर चिकनमुळे अनेक आजार होऊ शकतात अशी शंका वारंवार का निर्माण होत असते?

ब्रॉयलर चिकनला हार्मोन्सचे इंजेक्शन दिले जातात का?

सर्वसाधारणपणे, अशा अनेक बातम्या समोर येत असतात की ब्रॉयलर चिकनला हार्मोन्सचे इंजेक्शन दिले जातात आणि त्यामुळेच जे लोक हे चिकन खातात त्यांना हॉर्मोन्सशी संबंधित आजार होतात. किंवा किशोरवयीन मुलींमध्ये तारुण्याशी निगडीत हार्मोन्सल बदल लवकर होतात. म्हणजेच त्या लवकर वयात येतात. मग हे सर्व खरं आहे का? खरंच ब्रॉयलर चिकनला हार्मोन्सचे इंजेक्शन दिले जातात का?

मुथुकुमारलिंगम यांना खात्री आहे की असं काहीही होत नाही.

ते म्हणतात, "ब्रॉयलर चिकनची विशिष्ट वाढ झाली की त्यांना विषाणूंपासून धोका उत्पन्न होतो. ज्याप्रमाणे विषाणूंपासून आजार होऊ नयेत म्हणून माणसांना लस दिल्या जातात त्याचप्रमाणे ब्रॉयलर चिकनला देखील लस दिल्या जातात. याव्यतिरिक्त त्यांना इतर कोणतेही औषध दिले जात नाही."

कोंबड्यांची विशिष्ट वाढ झाली की त्यांना विषाणूंपासून संरक्षणासाठी लशी दिल्या जातात.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कोंबड्यांची विशिष्ट वाढ झाली की त्यांना विषाणूंपासून संरक्षणासाठी लशी दिल्या जातात.

पोल्ट्री फार्मर्स रेग्युलेटरी कमिटीचे उपसचिव सरथ म्हणतात, जर प्रत्येक ब्रॉयलर चिकनला हार्मोन्सचं इंजेक्शन द्यायचं ठरवलं तर प्रत्येक कोंबडीची किंमत 700 ते 900 रुपयांवर जाईल.

म्हणूनच ते सांगतात, असं काहीही होण्याची अजिबात शक्यता नाही. जरी एखादी कोंबडी आजारी पडली किंवा तिला काही संसर्ग झाला तर त्यांना अॅंटीबायोटिक्स दिली जातात. खरंतर या प्रकारे अँटीबायोटिक्स देणं हादेखील पोल्ट्री फार्म मालकाला करावा लागणारा अतिरिक्त खर्चच असतो.

"ज्या ब्रॉयलर चिकनची वाढ 42 ते 45 दिवसांपर्यत होते ते छोटं असतं. त्यांना हार्मोन्स देणं शक्य नसतं. मांसाहारासाठी वापरण्यात येणाऱ्या इतर प्राण्यांएवढी ती आकाराने मोठी नसते."असं ते पुढे सांगतात.

'ग्रोथ हार्मोन वगैरे काही नसतं'

याबद्दल डॉ. अरुण कुमार सांगतात, "वाढीसाठी द्यावयाचे हार्मोन्स असा कोणताही प्रकार नसतो. अनेक लोकांना असं वाटतं की ब्रॉयलर चिकनला वाढीसाठी हार्मोन्स दिले जातात. मात्र अशा प्रकारचे कोणतेही हार्मोन्स नसतात. लहान मुलांची उंची वाढवण्यासाठी आम्ही काही हॉर्मोन्सचा वापर करतो, मात्र ती वेगळी बाब असते."

ते पुढे म्हणतात, "जर तुम्हाला ब्रॉयलर चिकनमध्ये या प्रकारच्या हार्मोन्सचा वापर करायचा असेल तर त्यांना 40 दिवस ते दिवसातून चारवेळा द्यावे लागतील. अशा पद्धतीने त्या कोंबडीची किंमत 20 ते 25 हजार रुपये होईल. हार्मोन्सचे इंजेक्शन देऊन कोंबड्यांची वाढ कधीही होत नाही. या सर्व अफवा आहेत."

"एका ब्रॉयलर चिकनला 5 लस दिल्या जातात. विषाणूंपासून होणाऱ्या संसर्गापासून संरक्षण म्हणून या लसी दिल्या जातात. अनेक लोकांना या लसी म्हणजेच हार्मोन्सचे इंजेक्शन वाटतात."

ब्रॉयलर चिकनमुळे मुली लवकर वयात येतात का?

एसआरएम ग्लोबल हॉस्पिटलमधील वरिष्ठ आहारतज्ज्ञ यशोदा पोनुचामी सांगतात, अमेरिकेच्या नॅशनल सेंटर ऑफ मेडिसिनच्या अभ्यासानुसार मुलं नेहमीपेक्षा लवकर वयात येत आहेत.

"त्याचप्रमाणे जर चिकन जर उकडलेले असेल तर ही समस्या कमी असते. मात्र जर चिकन शिजवलेलं असेल किंवा बिर्याणी किंवा इतर डिशच्या स्वरुपात खाल्लं जात असेल तर त्यामुळे वजन वाढतं आणि त्यातून इतर समस्या निर्माण होतात," असं ते सांगतात.

"आमच्याकडे येणाऱ्या अनेक महिलांना आम्ही जेव्हा तपासतो तेव्हा त्या सांगतात की त्या खूप जास्त प्रमाणात चिकन खातात. खासकरून बिर्याणी किंवा चिकन राईससारखे पदार्थ खातात. त्याचा परिणाम म्हणून त्यांचं वजन वाढतं आणि मग त्यांना अकाली मेनोपॉज आणि पीसीओडीच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं," असं मदुराई मीनाक्षी मिशन हॉस्पिटलचे वरिष्ठ आहारतज्ज्ञ जेपी सांगतात.

period

फोटो स्रोत, Getty Images

मात्र ही गोष्ट पूर्णपणे मिथक असल्याची बाब असल्याचं डॉ. अरुण कुमार नाकारतात.

ते म्हणतात, "मागील 100 वर्षांमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारची मुलं लवकर वयात येत आहेत. मुलींना वयाच्या 11 किंवा 12 वर्षीच मासिक पाळी सुरू होते आहे. पूर्वी मुलींना वयाच्या 17 वर्षी मासिक पाळी येण्यास सुरूवात होत असे. जर वयाच्या 8 वर्षीच मासिक पाळी आली तर ती चिंतेची बाब आहे. मात्र सध्याच्या काळात वयाच्या 12 वर्षी मासिक पाळी येणं म्हणजे ते मूल निरोगी आहे."

ब्रॉयलर चिकनमुळे वंध्यत्व येतं का?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

आहारतज्ज्ञ मीनाक्षी सांगतात, जे लोक पोल्ट्री फार्मर्स रेगुलेटरी कमिशनच्या नियमांचं पालन न करणाऱ्या पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या खातात त्यांच्यावर नक्कीच परिणाम होऊ शकतो.

चेन्नईतील स्टॅन्ले गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधील प्राध्यापक आणि वैद्यकीय विभागाचे प्रमुख एस चंद्रशेखर देखील याच मताचे आहेत. ते म्हणतात, पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांना अतिरिक्त अॅंटीबायोटिक्स किंवा औषधे दिल्यामुळे त्या खाणाऱ्या माणसांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

ते म्हणतात, काही वेळा पोल्ट्री फार्ममध्ये हजारो कोंबड्यांचं पालन केलं जातं. त्यांचं वजन वाढून जास्तीचं मांस मिळावं यासाठी त्यांना केमिकल्सचं इंजेक्शन दिलं जातं. त्याचबरोबर या कोंबड्यांचं विषाणूमुळे होणाऱ्या संसर्गापासून संरक्षण करण्यासाठी त्यांना अॅंटीबायोटिक्सचे मोठे डोस दिले जातात.

या प्रकारच्या केमिकल्सना एंडोक्राईन डिसरप्टर्स म्हणतात.

या केमिकल्सचं सेवन करणाऱ्या पुरुष किंवा महिलेमध्ये वंध्यत्व, ट्युमर आणि अकाली मेनोपॉससारख्या समस्या निर्माण होऊ शकतात, असं चंद्रशेखर सांगतात.

"अर्थात हे आजार फक्त ब्रॉयलर चिकन खाल्ल्यामुळेच होतात असं म्हणता येणार नाही. मात्र तो एक घटक नक्कीच आहे," असं ते सांगतात.

"माणसांवर याचा परिणाम होण्याची शक्यता नाही, मात्र ब्रॉयलर चिकनला जरी सर्रासपणे अॅंटीबायोटिक्स दिले असले तरी माणसावर त्याचा थेट परिणाम होत नाही," असं डॉ. अरुण कुमार सांगतात.

"आपण जे अॅंटीबायोटिक्स माणसांना देतो तेच अॅंटीबायोटिक्स ब्रॉयलर चिकनला देखील देण्यात येतात. या उद्योगातील हीच उणीव आहे. मात्र जी माणसं ब्रॉयलर चिकन खातात त्यांच्यावर याचा थेट परिणाम होत नाही," असं ते म्हणतात.

"ज्या पद्धतीने कोंबड्यांना दिल्या जाणाऱ्या अॅंटीबायोटिक्सचं प्रमाण वाढत चाललं आहे, त्यामुळे कोंबड्यांच्या शरीरात सूक्ष्मजीवांसाठीची रोगप्रतिकार क्षमता निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे जर कोंबड्यांना काही संसर्ग झालेला नसेल तर जी लोक ब्रॉयलर चिकन खातात त्यांच्यावर थेट परिणाम होण्याची शक्यता नाही."

चिकन

फोटो स्रोत, Getty Images

डॉ. अरुण कुमार यांना खात्री आहे की, ब्रॉयलर चिकन खाल्ल्यामुळे माणसांना कोणताही धोका उद्भवत नाही.

सरथ म्हणतात, "ब्रॉयलर चिकन खूपच नाजूक असतात. त्यामुळेच त्यांना आवश्यकतेपेक्षा कमी प्रमाणात अॅंटीबायोटिक्स दिले पाहिजेत. शिवाय ते पशुवैद्याच्या सूचनांप्रमाणे दिले पाहिजेत. शिवाय जर ब्रॉयलर चिकन त्या विशिष्ट आजारातून बऱ्या झालेल्या असतील तर माणसावर थेट त्याचा परिणाम होण्याची शक्यता नसते."

बिर्याणी खाणाऱ्यांनी काय करावं?

अलीकडेच समोर आलेल्या सर्व्हेनुसार मागील वर्षी भारतात फूड डिलिव्हरी कंपन्यांकडून विकत घेतलेला पहिल्या क्रमांकाचा अन्नपदार्थ बिर्याणी हाच होता. भारतीय दर 2.25 सेकंदांना बिर्याणीची ऑर्डर देतात.

चिकन बिर्याणी सर्वात लोकप्रिय बिर्याणी आहे. अर्थात खूप जास्त प्रमाणात चिकन खाणे आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकतं. आहारतज्ज्ञ मीनाक्षी सांगतात, "जर तुम्ही मर्यादित प्रमाणात चिकन खाल्लं तर त्याचा अपाय होत नाही.

"आठवड्यातून तीन वेळा 100 ग्रॅम चिकन खाणं योग्य आहे. तळलेल्या चिकनपेक्षा ते ग्रेव्ही टाकून ते उकडलेल्या स्वरुपात देखील खाता येऊ शकतं. जर बिर्याणी खायची असेल तर ठराविक प्रमाणात महिन्यातून दोनदा खाणं योग्य ठरतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण ती घरीच शिजवली पाहिजे आणि खाल्ली पाहिजे."