चिकन कसं खाल्लं तर चांगलं? कातडी सोलून की कातडीसकट?

चिकन

फोटो स्रोत, Getty Images

चिकन जगभरात सर्वात आवडीचं मांस आहे. फूड अँड अॅग्रीकल्चर (एफएओ)नुसार 2021 मध्ये जगभरात 13.30 कोटी टन व्हाईट मीटचं सेवन झालं होतं.

भारताच्या कृषी आणि खाद्य परिषदेने 2015 साली केलेल्या पोल्ट्री बाजाराच्या अभ्यासानुसार भारतात प्रतिव्यक्ती 3.1 किलो चिकनचं सेवन होतं.

हे प्रमाण जगाच्या प्रतिव्यक्ती 17 किलो या प्रमाणापेक्षा बरंच कमी आहे.

चिकन सहसा इतर मांसापेक्षा स्वस्त असतं आणि यात फॅट्स कमी असतात. तसंच चिकन खाण्यावर फारशी सांस्कृतिक आणि धार्मिक बंधनं नाहीत.

त्यामुळे हे जगात सर्वाधिक खाल्लं जाणारं मांस आहे.

तसंच चिकनमध्ये भरपूर प्रोटीन असतात. चिकन हा व्हिटॅमिन आणि मिनरल्सचाही मोठा स्रोत आहे.

चिकनमध्ये मोनो सॅच्युरेटेड फॅटस् असतात जे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असतात.

पण जगभरातल्या लोकांच्या या आवडत्या पदार्थाभोवती अनेक गैरसमजही पसरले आहे.

स्किनलेस की स्किनसकट?

हा एक प्रश्न अनेकदा विचारला जातो की चिकन स्किनलेस खावं की स्किनसकट.

कारण चिकनच्या स्किनमध्ये भरपूर फॅट्स असतात, त्यामुळे हा प्रश्न पडतो.

चिकन

फोटो स्रोत, Getty Images

अर्जेंटिनातल्या मीट न्युट्रिशनल इंफोर्मेशन सेंटरच्या न्युट्रिशनिस्ट मारिया डोलोरेस फर्नांडिस पेजोस यांनी बीबीसी मुंडोशी बोलताना म्हटलं की, "चिकनच्या त्वचेत 32 टक्के फॅट्स असतात. म्हणजे जर तुम्ही 100 ग्रॅम चिकन स्किनसह खाल्लं तर तुमच्या शरीरात 32 ग्रॅम फॅट्स जातील."

त्या म्हणतात, "चिकनच्या त्वचेमध्ये असलेल्या फॅट्सपैकी दोन तृतीयांश भाग अनसॅच्युरेटेट असतो. बऱ्याच जणांच्या मते अनसॅच्युरेटेड फॅट्स 'चांगले फॅट्स' असतात. यामुळे शरीरातली कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारते. याच स्किनमधला फॅट्सचा एक तृतीयांश भाग सॅच्युरेटट असतो, म्हणजे वाईट फॅट्स. यामुळे शरीरातल्या बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते."

पेजोस यांच्या मते, "स्किनसकट मांस खाल्लं तर जेवणातल्या कॅलरींचं प्रमाण जवळपास दुप्पट होतं. उदाहरणार्थ जर आपण स्किनलेस चिकनचा सहा औंसांचा ब्रेस्टचा भाग खाल्ला तर आपल्याला 284 कॅलरी मिळतात, पण हाच भाग स्किनसह खाल्ला तर आपल्याला 386 कॅलरी मिळतात."

म्हणूनच लोकांना चिकन खाताना त्वचा काढून मग खा, असा सल्ला दिला जातो.

तज्ज्ञांचं मत आहे की जर सशक्त आणि निरोगी व्यक्ती, ज्यांचं वजन आपल्या उंचीच्या तुलनेत योग्य आहे, त्यांनी चिकनची वेगळी केलेली त्वचा शिजवताना भांड्यात टाकली तर यामुळे चिकन अधिक स्वादिष्ट आणि रसदार बनतं.

चिकनला सतत गोठवू नका

चिकन एकदा फ्रीजरमधून काढलं की ते पुन्हा फ्रिजरमध्ये ठेवून गोठवू नका असा सल्ला दिला जातो.

चिकन

फोटो स्रोत, Getty Images

अन्न यासाठी फ्रीजरमध्ये गोठवलं जातं की त्यात सुक्ष्मजीव तयार होऊन ते खराब व्हायला नको. जर चिकन सतत फ्रीजरमधून बाहेर काढलं तर त्यात सुक्ष्मजीव तयार होण्याची शक्यता असते. त्यामुळे एका फ्रीज बाहेर काढलेलं चिकन शिजवल्यानंतरच फ्रीजमध्ये ठेवावं.

चिकन डी-फ्रॉस्ट करण्याचा उत्तम मार्ग

गोठलेलं चिकन वितळण्यासाठी किंवा डी-फ्रॉस्ट करण्यासाठी नुसतं फ्रीजबाहेर काढून चालणार नाही. त्याला गरम पाण्यात टाकूनही काही उपयोग नाही.

जर नुसतं ते बाहेर काढून ठेवलं तर त्यात सुक्ष्मजीव तयार होऊ शकतात.

त्यामुळे तुम्हाला जेव्हा चिकन शिजवायचं असेल, ते तेव्हाच फ्रीजरमधून काढत जा.

पिवळं की गुलाबी, कोणतं चिकन चांगलं?

चिकनचा रंग कोंबडा/कोंबडीच्या आहारात काय होतं यावरही ठरतो.

मक्यात ज्वारी किंवा गव्हापेक्षा जास्त पिंगमेंट असतात, म्हणजे तो खाल्ला तर चिकनचा रंग बदलू शकतो.

काही देशात पिवळं चिकन पसंत केलं जातं त्यामुळे त्या कोबंड्यांच्या आहारात रंग मिसळला जातो.

पण तज्ज्ञांच्या मते दोन्ही रंगाच्या चिकनमध्ये सारखीच पोषणमुल्यं असतात.

चिकन बाधू नये म्हणून काय करावं?

चिकन सर्वाधिक पोषक आणि लोकप्रिय आहार आहे. पण यामुळे अनेकदा लोकांना फूड पॉयझनिंग होतं.

चिकन

फोटो स्रोत, Getty Images

कच्च्या मांसात सुक्ष्मजीव तयार होतात. कधी कधी अशा प्रकारच्या मांसात सालमोनेला आणि क्लॉस्ट्रिडियम परफ्रिजेंस पण तयार होतात. त्यामुळे चिकन शिजवताना काळजी घेतली पाहिजे.

चिकन व्यवस्थित शिजलं नसेल तर त्याचा त्रास होऊ शकतो, फूड पॉयझनिंग होतं.

यूएस सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेंनशन (सीडीसी) नुसार दर वर्षी अमेरिकेत 10 लाख लोक संक्रमित चिकन खाऊन आजारी पडतात.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)