उत्तरकाशी बोगदा दुर्घटना : 67 टक्के ड्रिलिंग पूर्ण, 42 मीटरपर्यंत आडवे पाईप, बचावकार्य़ सुरुच

फोटो स्रोत, ANI
उत्तरकाशीच्या सिलक्यालातील बोगद्यात अडकलेल्या मजुरांना वाचवण्याच्या मोहिमेला दिवस पूर्ण झाले आहेत. आज 11वा दिवस आहे.
41 मजुरांना वाचवण्यासाठी सुरू असलेल्या या बचाव मोहिमेतील बुधवारचा ( 22 नोव्हेंबर) दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो.
67 टक्के ड्रिलिंग पूर्ण झाल्यचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. बोगद्यातील ढिगाऱ्यातून 42 मीटरपर्यंत आडवे पाईप टाकण्यात आले आहेत.
अन्न पुरवण्यासाठीची दुसरी लाईफलाइन व्यवस्थितपणे काम करत आहे. रोटी, भाजी, खिचडी, दलिया, संत्री, केळी याबरोबरच औषधी आणि इतर महत्त्वाचं साहित्यही त्यातून पाठवलं जात आहे. त्यात टी शर्ट, अंडर गारमेंट, टूथ पेस्ट, साबण यांचा समावेश आहे.
वरून केल्या जाणाऱ्या ड्रिलिंगसाठी त्यांनी ठरलेल्या ठिकाणी मशीन लावले आहेत.
तसंच अधिकाऱ्यांना बारकोटच्या बाजुनंही (बोगद्याची दुसरी बाजू) मजुरांना वाचवण्यासाठी कामाची सुरुवात केली आहे. त्यासाठी यापूर्वीच चार स्फोटही करण्यात आले आहेत. त्यामुळं जवळपास 9.10 मीटरचा भाग मोकळा झाला आहे. रोज अशा प्रकारचे तीन स्फोट करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
अंदाजे एकूण 60 मीटर एवढं एकूण ड्रिलिंग आहे.
त्यामुळे बुधवारी रात्री (22 नोव्हेंबर) किवां गुरुवारी ( 23 नोव्हेंबर) सकाळपर्यंत उत्तरकाशी बोगद्यातील बचाव कार्य पूर्ण होऊ शकतं, अशी माहिती रस्ते आणि वाहतूक खात्याचे अतिरिक्त सचिव (तांत्रिक) महमूद अहमद आणि उत्तराखंड राज्याचे सचिव निरज खैरवाल यांनी बुधवारी दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे लवकरच मजुरांना बाहेर काढण्याची आशा निर्माण झाली आहे.
रस्ते आणि वाहतूक खात्याचे अतिरिक्त सचिव (तांत्रिक) महमूद अहमद म्हणतात, "कोणतेही अडथळे नसतील तर आज रात्री किंवा उद्या सकाळी काही मोठी बातमी मिळू शकते.
ही आनंदाची बाब आहे. ढिगाऱ्यासोबत लोखंडी रॉडही आला आहे. या लोखंडी रॉडमुळे मशिन ड्रिलिंगमध्ये अडथळा आला नाही हे बर झालं. पाइपलाइन टाकण्याच्या मध्यभागी आमच्यासाठी कोणतीही अडचण निर्माण झाली नाही."

फोटो स्रोत, ASIF ALI
महमूद अहमद पुढे म्हणतात की, "ड्रील झालं की 6 फुटांचा पाईप आम्ही पूश करतो, याला वेळ लागत नाहीत. तर पहिल्या पाईप ड्रिल केल्यावर त्याला वेल्डिंग करुन दुसरा पाईप जोडवा लागतो.
हे वेल्डिंग खूप मजबूत असणं आवश्यक आहे. या दोन पाईपची जोडणी करताना कराव्या लागणाऱ्या वेल्डिंगला चार ते पाच तास लागतात. हा वेळ कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सध्या हा वेळ आम्ही साडेतीन तासांवर आणला आहे "
या बचाव कार्याचे नोडल अधिकारी असलेले उत्तराखंडचे सचिव निरज खैरवाल म्हणाले की, "एक मायक्रोफोन आणि स्पीकर आम्ही बोगद्यातील ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुरांपर्यंत पोहचवला आहे.
त्याद्वारे आमचे डॉक्टर प्रत्येक मजुराशी संवाद साधत आहेत. मानिसक आरोग्य महत्त्वाचं आहे. म्हणून मानसोपचारतज्ज्ञ ही संवाद साधत आहेत.
अन्नपदार्थ आम्ही त्यांच्यापर्यतं पोहोचवले आहेत. ताजं अन्न ही आम्ही देतोय. अंडर गार्मेंट, ब्रश, टॉवेल या गरजेच्या वस्तू आम्ही त्यांच्यापर्यंत पोहचवल्या आहेत."

फोटो स्रोत, Getty Images
उत्तरकाशीच्या बोगद्यातून पहिला व्हीडिओ
पीटीआय या वृत्तसंस्थेनं बोगद्याच्या आतील एक व्हीडिओ प्रसिद्ध केला आहे. या व्हीडिओत मजूर टनलच्या आत उभे राहून बोलत असल्याचं पाहायला मिळत आहे.
त्यामुळे आत अडकलेल्या लोकांची परिस्थिती अद्याप ठीक असल्याची आशा वाढली आहे.
इंडोस्कोपिक कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही दृश्यं घेण्यात आली आहेत. हा कॅमेरा सहा इंचाच्या फूड पाईपलाईनच्या माध्यमातून पाठवण्यात आला होता. मजुरांनी पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाचे हेल्मेट परिधान केले असल्याचं व्हीडिओत दिसत आहे.
पाईपलाइनमधून येणारं अन्न घेत ते एकमेकांशी चर्चा करत असल्याचंही यातून दिसत आहे. हे व्हीडिओ फुटेज अडकलेल्या मजुरांच्या कुटुंबीयांना दिलासा देण्यासाठी महत्त्वाचं ठरू शकतं.
हेही नक्की वाचा
हा व्हीडिओ पाहिलात का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








