'एकेका रात्री मला 10 ते 18 पुरुषांबरोबर झोपावं लागे'

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र
    • Author, भार्गव पारिख
    • Role, बीबीसी गुजरातीसाठी

"बांगलादेशात आमच्या घरी खाद्यपदार्थांचे स्टॉल होते. एकदा माझी मावशी ईदच्या वेळी बांगलादेशातून भारतात आली आणि तिने माझ्या आईला सांगितले की ती मला भारतात घेऊन जाईल आणि मला नोकरी देईल; जेणेकरून आमची गरिबी दूर होईल, पण तिने आणले. मला इथे आणून विकले. रोज दहा लोक माझ्या शरीराचा वापर करायचे. "

गुजरातमधून बांगलादेशात गेलेल्या एका अल्पवयीन मुलीचे हे शब्द होते. अल्पवयीन असल्याने आम्ही तिला इथं तिच्या खरे नावाऐवजी सलमा असे संबोधत आहोत.

सलमासोबत झालेल्या संवादातून तिने तरुण वयातच आयुष्याचा एक वाईट अनुभव घेतलेला आहे हे दिसलं.

सलमा आणंद येथील 'जागृत महिला संघटने'मध्ये दोन वर्षे लपत्ता हे नाव घेऊन राहिली राहिली आणि या संस्थेने तिला स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवलं.

नोकरी मिळवून पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून बेकायदेशीरपणे भारतात घुसलेल्या सलमाला येथे समुपदेशन आणि उपचारही मिळाले. याच संस्थेने तिला तिच्या आईचीही भेट घडवून दिली. आता सलमा गुजरात सोडून बांगलादेशला गेली आहे, पण तरुण वयात झालेल्या शारीरिक आणि मानसिक हल्ल्यांच्या जखमा बऱ्या व्हायला वेळ लागू शकतो.

घरी जाण्यापूर्वी तिने बीबीसी गुजरातीकडे सांगितलेली तिची वेदनादायक कथा ऐकून हृदय पिळवटून जातं.

'मावशीने माझा व्यवहार केला'

आणंद येथील जागृत महिला संघटनेच्या अध्यक्षा आशाबेन दलाल यांच्या म्हणण्यानुसार, अडीच वर्षांपूर्वी स्थानिक पोलिसांनी सलमाला संस्थेत आणलं. त्यांना ती बसस्थानकाजवळ एकटी आणि गोंधळलेल्या अवस्थेत आढळली.

आशाबेन सांगतात, "जेव्हा ती संस्थेत आली तेव्हा ती काहीच बोलली नाही. ती एका कोपऱ्यात गप्प बसायची. आम्ही तिच्यावर उपचार केले, आमचे समुपदेशक तिच्याशी संवाद साधायचे. हळू हळू ती बोलू लागली. जेव्हा तिने आम्हाला तिच्याबद्दल सांगितले. तिची परिस्थिती पाहून आम्हालाही धक्का बसला."

"सलमा बांगलादेशातून आईला मदत करण्यासाठी आली होती. पण तिच्यावर भलतीच परिस्थिती ओढावली. तिची आई भेटायला आली तेव्हा तिला भेटून सलमाला इतका आनंद झाला की ती अडीच वर्षांची सर्व वेदना क्षणभर विसरली."

त्या पुढे म्हणतात, "तिची आई आमच्याशी बोलायला तयार नव्हती पण सलमाने थरथर कापत तिची वेदनादायक कहाणी सांगितली. तिने कथा सांगताना तिचा निरागस चेहरा दु:खाने व्यापला होता."

कथेची सुरुवात होते बांगलादेशपासून. अत्यंत गरिबीत राहणाऱ्या सलमाला तिच्या या भारतात राहणाऱ्या मावशीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले.

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

ती म्हणाली, "जेव्हा माझी मावशी ईदच्या दिवशी घरी आली, तेव्हा तिने माझ्या आईला अनेक भेटवस्तू दिल्या. माझी आई आणि मला तिच्यासोबत खूप आनंद झाला तिने माझ्या आईला सांगितले की मी तिच्यासोबत भारतात गेले तर मला नोकरी मिळेल.”

“भारतात भरपूर पैसे मिळत असल्याची बतावणीही मावशीने केली. इथे घरकाम करून लोक खूप पैसे कमावतात असं तिने माझ्या आईला सांगितलं.”

“आम्हाला वाटले की काम मिळाल्याने आमची गरिबी दूर होईल आणि म्हणून आम्ही हो म्हणालो."

त्यावेळी सलमा 15 वर्षांची होती. मावशीने तिला बेकायदेशीरपणे भारतात आणले. भारतात आल्यानंतर मावशीच्या वागण्यात बदल झाल्याचं सलमा सांगते

इथे आल्या आल्या तिच्या मावशीाने तिला खडसावले, "तुझ्याकडे पासपोर्ट नाही. तू इथे बेकायदेशीरपणे आली आहेस. मी तुला जिथे काम करायला लावते, तिथे तुला जावं लागेल. ती जागा सोडून तू जाऊ नकोस, नाहीतर पोलीस तुला तुरुंगात टाकतील. तू तुझ्या आईला पैसे पाठवू शकत नाहीस. तुझी आई गरिबीतून बाहेर पडू शकत नाही,” अशा धमक्या मावशीने दिल्याचं सलमा सांगते.

मावशीने कुठे आणलं हे सलमाला माहिती नव्हतं. पण तुटक तुटक हिंदी येत असल्याने तिला अंदाज आला की आपण वापीत आहोत.

सलमा सांगते, “एके दिवशी मावशी मला एका हॉटेलमध्ये घेऊन गेली आणि तिथे एका माणसाशी ओळख करून दिली. त्यांच्यात काय बोलणं झालं मला माहिती नाही पण तिने सांगितलं की मी भारतात राहाणार याबद्दल त्या माणसाला पैसे द्यावेत. सगळं बेकायदेशीरच होणार होतं. माझं बँक खातंही नव्हतं.”

सलमाला काळजी वाटू लागली की जर हातात पगारच येत नसेल तर आईला पैसे कसे पाठवणार?

'कधीकधी मला 18 पुरुषांसोबत रात्र काढावी लागली'

इथून सलमाचे हाल सुरू झाले. तिला विकलं गेलं असल्याचं तिला समजलं. रोज रात्री तिचा व्यवहार होत असे.

त्या भयानक दिवसांची आठवण काढताना सलमा म्हणते, “ते लोक रोज माझं शरीर वापरायचे. कधी कधी तर मला 10, तर कधी 18 पुरूषांसोबत झोपावं लागे. त्या बदल्यात मला फक्त झोपायला जागा आणि जेवण मिळत असे. कधी कधी ग्राहक मला टिप द्यायचे, तेवढेच पैसे माझ्या हातात पडायचे.”

ती पुढे सांगते, “एका महिन्यानंतर मला नवसारीला नेण्यात आलं, आणि त्यानंतर वडोदराला. माझे मालक मला सांगायचे की पैसे आई पाठवले गेले आहेत.”

पण सलमाच्या आईला कधीच कोणतेही पैसे मिळाले नाही हे तिला फार उशीरा कळलं. पोलिसांच्या तावडीत सापडू नये म्हणून सलमा लपून बसायची.

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

वेश्या व्यवसायात तिचा जीव गुदमरू लागला होता. तिला पळून जायचं होतं पण ती अशा जाळ्यात अडकली होती की तिची सुटका होणं अशक्य होतं.

ती संधीची वाट पाहात होती आणि एक दिवस तिला ती संधी मिळाली.

ती सांगते, “एक दिवस हॉटेलमध्ये कोणी ग्राहक आला नाही. ती संधी मी साधली आणि हॉटेलमधून पळून गेले. मी गपचूप आणंदच्या बस स्टँडवर पोचले. पोलिसांच्या नजरेत येऊ नये म्हणून मी लपून बसले, पण त्यामुळे मी लोकांना चोर वाटले. त्यांनी पकडून मला पोलिसांच्या ताब्यात दिलं.”

पोलिसांनी सलमा पकडलं पण तिने आपलं नाव त्यांना सांगितलं नाही. तिची अवस्था पाहून पोलिसांनी तिला तिथल्या जागृत महिला आश्रममध्ये नेऊन सोडलं.

या संस्थेत अनेक अडचणीत सापडलेल्या महिला वास्तव्यास असून त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी मदत केली जाते.

या संस्थेतले आपले अनुभव सांगताना सलमा म्हणते, “इथे आल्यावर मला घरी आल्यासारखं वाटलं पण तरीही मला सतत पोलिसांची भीती वाटायची. पण इथल्या प्रशासकांचा प्रेमळ स्वभाव पाहून मी हळूहळू माझ्याविषयी त्यांना सांगितलं. माझे वेदनादायक अनुभव सांगितले. मी त्यांना हेही सांगितलं की मी मुकी नाही, फक्त पोलिसांच्या भीतीने मी काहीच बोलत नव्हते.”

अखेर सलमाच्या आयुष्यातील अंधारात आशेचा किरण दिसला

या संस्थेच्या प्रशासकांनी सलमाला तिच्या अंधाऱ्या आयुष्यात आशेचा किरण दाखवण्याचा प्रयत्न केला. इथे मानसोपचार तज्ज्ञाकडून तिचे समुपदेशन करण्यात आलं आणि तिच्यावर उपचारही करण्यात आले.

या संस्थेच्या व्यवस्थापक आशाबेन दलाल सांगतात, “सलमाची खरी परिस्थिती कळल्यानंतर आम्ही पोलीस, सरकार आणि बांगलादेशच्या दूतावासाला कळवलं. तिला मायदेशी पाठवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांच्या मदतीने आम्ही तिच्या आईशी संपर्क साधू शकलो. आईला तिच्या मुलीची दुःखद परिस्थिती कळली. आपल्या मुलीला भेटण्यासाठी त्यांनी आयुष्यात पहिल्यांदा पासपोर्ट काढला.”

सलमा दोन वर्षं या संस्थेत होती. इथे राहून तिने भरतकाम, शिवणकाम, इमिटेशन ज्वेलरी बनवणे याचं प्रशिक्षण घेतलं.

आधारगृह

फोटो स्रोत, Bhargav Parikh

सलमाने तयार केलेल्या मालाच्या विक्रीतून दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. सलमा आईसोबत बांगलादेशला रवाना झाली तेव्हा संस्थेने तिला सलमाच्या कमाईचे दोन लाख रुपयेही देण्यात आले.

दरम्यान, सलमाच्या मावशीला अटक करून बांगलादेशात नेण्यात आले आहे.

आज सलमा आपल्या गावी पोहोचली आहे. तिच्या गुजरातमधल्या कटू आठवणींना इथेच मिळालेली माया, प्रेम आणि आधारच्या आठवणी आता दिलासा देत आहेत.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.