शून्याचा शोध लागला नसता तर काय झालं असतं?

शून्य

फोटो स्रोत, iStock

    • Author, हना फ्राय
    • Role, बीबीसी फ्यूचर

शून्य हा एक अत्यंत रंजक आकडा आहे. शून्याला स्वतःचं असं कोणतंच मूल्य नसतं. मात्र, इतर कोणत्याही आकड्याच्या कोणत्या बाजूला शून्य असतं, त्यावरून त्या आकड्याचं मूल्य निश्चित होतं.

आज 22 डिसेंबर म्हणजेच राष्ट्रीय गणित दिन. या निमित्ताने शून्याची कहाणी आपण समजून घेऊ –

प्राचीन काळापासूनच शून्याची संकल्पना वापरली जात आहे. बॉबिलोनिया आणि माया संस्कृतीच्या अभिलेखांमध्ये त्याचा उल्लेख पाहायला मिळतो. त्या काळात याचा वापर हवामानविषयक अंदाज लावण्यासाठी वापर केला जात असे.

प्राचीन काळातील विद्वान मंडळींनी याला कोणत्याही आकड्याचं गैरहजर असण्याप्रमाणेच मानलं.

म्हणजे, जर 101 हा आकडा लिहायचा आहे, तर शंभरच्या पुढे काहीच नाही, असं मानलंज जायचं.

त्यावेळी तज्ज्ञांनी शून्य लिहिण्याची पद्धत गोलाकारच ठेवली होती. मात्र बॉबिलोनियन संस्कृतीत हा एका भाल्याच्या आकारात लिहिला जात होता.

या संस्कृतीत दोन आकड्यांमध्ये हे चिन्ह काढण्याचा अर्थ असा होता की याठिकाणी काहीही नाही.

गणितात शून्याचं महत्त्व काय असू शकतं, हे भारताच्या विद्वानांनी ओळखलं.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

प्रा. अलेक्स बेलोस यांच्या मते, “काहीही नसूनसुद्धा काहीतरी असल्याची संकल्पना भारतीय संस्कृतीत होती. त्याला निर्वाण म्हणून संबोधलं जायचं.”

जर एखाद्या व्यक्तीच्या आकांक्षा आणि समस्या त्याच्यापासून दूर होतात, तेव्हा त्याच्या आयुष्यात काहीही उरत नाही. म्हणजेच ही शून्य स्थिती असते.

भारतात गूढवादात शून्य हे गोलाकार आहे, कारण हे जीवनाचं चक्र दर्शवण्याचं काम करतं.

शून्याची उपयुक्तता जगाला दर्शवण्याचं श्रेय सातव्या शतकातील भारतीय खगोलशास्त्रज्ञ ब्रह्मगुप्त यांना जातं.

काही तज्ज्ञांच्या मते, शून्याची उत्पत्ती भारतातच झाली होती. मात्र, मोठ्या चलाखीने हे इतिहासातून हटवण्यात आलं. आशियात आपलं वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर इस्लामिक विद्वानांनी अरबी आकड्यांमध्ये याचा समावेश केला.

अशा प्रकारे, भारत आणि अरबी देशांचा याच्याशी खोलवर संबंध असल्यामुळे त्याला इंडो-अरेबिक आकडा असं संबोधलं गेलं पाहिजे.

शून्याचा प्रवास सोपा नव्हता. त्याने आपल्या प्रवासात अनेक अडचणींचा सामना केला. युरोपात शून्य वापरणं सुरू झालं होतं. त्यावेळी तिथे इस्लामविरोधात ख्रिश्चन धर्मयुद्ध सुरू होतं. अरबी आकड्यांवर त्यावेळी युरोपीय लोक विश्वास ठेवायचे नाहीत.

सन 1299 मध्ये इटलीच्या फ्लोरेन्स शहरात इतर अरबी आकड्यांसोबतच शून्यावरही बंदी घालण्यात आली होती. कारण शून्याचं रुपांतर 9 आकड्यात करणं अत्यंत सोपं होतं. पैशांचे व्यवहार करणाऱ्या लोकांची फसवणूक होणं यामुळे सहजशक्य होतं.

मात्र, 17व्या शतकाची सुरुवात होता होता शून्याने स्वतःला इतकं मजबून बनवलं की याशिवाय काम चालणं अवघड बनलं. यामुळे गणित आणि विज्ञान यांचे सिद्धांत पुढे जाण्यासाठी मदत झाली. तेव्हापासून आतापर्यंत हे महत्त्व कायम आहे.

शाळेत आपण अनेकवेळा आलेख तयार केले असतील. त्यांची कल्पना शून्याशिवाय कदापि शक्य नाही. इंजिनिअरिंगसोबत कम्प्युटर ग्राफिक्सपर्यंत कोणतंही काम शून्याशिवाय होऊ शकत नाही.

प्रा. बेलोस यांच्या मते, “अरबी आकडेवारी आणि शून्याची निर्मिती झाल्यानंतर जगात क्रांतीच घडली होती. अंकगणिताचं जग यामुळे शहारून गेलं.”

जरा विचार करा, शून्य नसतं तर आपण स्टॉक मार्केटचे व्यवहार कसे केले असते? शून्य नसता तर कोणत्याही आकड्यांना अर्थच उरला नसता.

म्हणूनच सगळी ताकद ही शून्यातच आहे, असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. या शून्यातच आपल्या सर्वांना विलीन व्हावं लागणार आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)