You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये चकमक, 6 कट्टरतावादी ठार
जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत 6 कट्टरतावादी ठार झाले आहेत.
या प्रकरणात स्थानिक कट्टरतावादी सहभागी असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक आरआर स्वेन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, "दोन वेगवेगळ्या ठिकाणी चकमक झाली आहे, ज्यामध्ये मृतदेहांच्या पुष्टीनुसार, 6 अतिरेकी मारले गेल्याची माहिती आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हे अत्यंत महत्त्वाचे आहे. सध्या हे ऑपरेशन सुरू असून, हे ऑपरेशन संपल्यानंतर अधिक माहिती दिली जाऊ शकते."
स्वेन म्हणाले की, "आम्ही प्रत्येक घटनेला गांभिर्याने घेतो. जम्मू भागातील जुनी परिस्थिती पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे."
त्यांच्या म्हणण्यानुसार, "यापूर्वी 2006-07 च्या सुमारास येथे अशी घटना घडली होती त्यामुळे ही चिंतेची बाब आहे. पण याचा अर्थ अतिरेक्यांना मोठे यश मिळाले असे नाही."
स्थानिक लोकांच्या मदतीने या भागातील कट्टरतावाद्यांना रोखण्यात यश मिळेल, असा पोलिसांचा दावा आहे.