जांभईसाठी तोंड उघडलं आणि तसंच अडकलं; नेमकं काय घडलं? डॉक्टरांनी कसं ठीक केलं?

प्रतिकात्मक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रतिकात्मक फोटो
    • Author, झेवियर सेल्वाकुमार
    • Role, बीबीसी तमिळ

जांभई दिल्यानंतर तोंड बंदच झालं नाही तर काय होईल, याची कल्पना करणंही कठीण आहे. पण असंच काहीसं घडलं केरळमधील कोची शहरात काम करणाऱ्या पश्चिम बंगालच्या एका तरुणासोबत.

कन्याकुमारी–दिब्रूगड विवेक एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या त्या 24 वर्षांच्या तरुणाला, रात्री साधारण दोनच्या सुमारास, रेल्वे पलक्कड स्टेशनजवळ येत असताना हा त्रास झाला.

त्याच्यासोबत प्रवास करणाऱ्यांनी लगेच तिकीट निरीक्षकांना ही माहिती दिली. तिकीट निरीक्षकाने याची माहिती त्वरीत रेल्वे रुग्णालयातील अधिकाऱ्यांना दिली.

काही मिनिटांतच रेल्वेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जितिन पलक्कड स्टेशनवर पोहोचले आणि त्यांनी त्या तरुणावर उपचार केले. काही क्षणांतच त्याचं तोंड पुन्हा बंद झालं म्हणजे पूर्ववत झालं आणि तो तरूण नंतर त्याच रेल्वेने दिवाळीच्या प्रवासाला पुढे निघून गेला.

अवघ्या पाच मिनिटांत उपचार पूर्ण झाले आणि सर्व काही ठीक झालं. तरीही रेल्वेमध्ये त्या तरुणासोबत झालेला हा प्रकार प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेचा ठरला. त्याचा व्हीडिओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

जांभई येणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण जांभई घेताना अशी अडचण का होते, हा प्रश्न अनेकांना पडतो.

'तोंड जास्त उघडल्यावर काय होतं?'

डॉ. जितिन यांनी तरुणाच्या या दुखापतीचं वर्णन हे टेम्पोरोमँडिब्युलर जॉइंट्स डिस्लोकेशन (जबड्याचे हाड त्याच्या सांध्यातून बाहेर सरकणं) असं केलं आहे.

डॉ. जितिन बीबीसीशी बोलताना म्हणाले की, "मी मुळात कान, नाक आणि घसा तज्ज्ञ आहे. त्या दिवशी सकाळी मी पलक्कड रेल्वे रुग्णालयात कामावर होतो. पहाटे सुमारे 2.15 वाजता मला याबाबत माहिती मिळाली आणि मी ताबडतोब तेथून निघालो.

त्याआधी 45 मिनिटांपूर्वी त्या तरुणाने जांभई घेतल्यानंतर तो पुन्हा तोंड बंद करू शकत नव्हता, हे ऐकून मला लगेच लक्षात आलं की ही परिस्थिती 'टीएमजे डिसलोकेशन' असावी. मी आवश्यक ती तयारी करून रेल्वे प्लॅटफॉर्मवर पोहोचलो."

रेल्वेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जितिन यांनी त्या तरुणावर उपचार केले.
फोटो कॅप्शन, रेल्वेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जितिन यांनी त्या तरुणावर उपचार केले.

डॉ. जितिन म्हणतात, "तो तरुण बुकिंग बॉक्समध्ये बसला होता. मी त्याला प्लॅटफॉर्मवरील खुर्चीवर बसवलं आणि उपचार सुरू केले. हातमोजे घालून, खालच्या जबड्याच्या सांध्यावर आलेला 'लॉक' हाताने सोडवला.

अवघ्या पाच मिनिटांत तो तरुण पूर्वस्थितीला परत आला. त्याआधी त्याने तोंड आणि चेहऱ्यावर वेदना होत असल्याची तक्रार केली होती, आणि त्याच्यासोबत असं कधीच घडलं नव्हतं. ही पहिलीच वेळ होती हे लक्षात आलं."

डॉ. जितिन म्हणतात की, त्या तरूणाला ही अडचण त्रिशूर रेल्वे स्टेशन ओलांडताना आली आणि पुढचं स्टेशन पलक्कड येथे त्याच्यावर उपचार करून त्याला बरं ही करण्यात आलं.

त्या तरुणाचं वय फक्त 24 असल्यामुळे त्याची हाडं आणि स्नायू अजून मजबूत होते. त्यामुळे त्याला वेदना जास्त जाणवल्या. साधारणपणे अशा परिस्थितीत काही मिनिटांतच समस्या सुटते. केवळ काही दुर्मिळ प्रसंगीच शस्त्रक्रियेची गरज भासू शकते.

त्याचवेळी, डॉ. जितिन यांनी सांगितलं की, अशा अडचणीमुळे प्रत्येकाला वेदना होतीलच असं म्हणता येणार नाही.

नेमकी समस्या दाखवणारं रेखाचित्र
फोटो कॅप्शन, नेमकी समस्या दाखवणारं रेखाचित्र

ऑर्थोडेन्टिस्ट डॉ. बालचंदर यांनी बीबीसी तमिळला सांगितलं की, "चेहऱ्याच्या दोन्ही कानांच्या खाली असलेल्या सांध्यांना टेम्पोरोमँडिब्युलर जॉइंट (टीएमजे) म्हणतात.

या सांध्यांच्या वर एक हाड (टेम्पोरल हाड) आणि खाली जबड्याचे हाड (मँडिब्युलचा कॉन्डाइल) असते. या दोन्ही हाडांमध्ये एक डिस्क असते. या तीनही घटकांना एकत्रित टेम्पोरोमँडिब्युलर जॉइंट्स आणि लिगामेंट्स म्हणतात."

डॉ. बालचंदर पुढे सांगतात, "जेव्हा आपण हळूहळू तोंड उघडतो, तेव्हा फक्त खालील जबडा हलतो. थोडं जास्त तोंड उघडल्यावर, खालील हाड आणि डिस्क एकत्रित थोडंसं पुढे सरकतात आणि स्टॉपर (एमिनेन्स) जवळ थांबतं.

काही लोकांमध्ये कधी कधी खालील हाड आणि डिस्क हा स्टॉपर ओलांडून पुढे जातात आणि परत मागे येत नाहीत. यालाच टेम्पोरोमँडिब्युलर जॉइंट डिसलोकेशन म्हणतात. हे दोन्ही बाजूंना होऊ शकतं. मुख्य कारण म्हणजे तोंड खूप मोठं उघडणं."

डॉक्टरांकडून कोणते उपचार केले जातात?

डॉ. बालचंदर यांनी सांगितलं की, "अशा अडचणीला सामोरे जाणाऱ्यांसाठी, तोंड उघडलेल्या भागात दातांमध्ये गॉझ (पातळ कापड) ठेवून दात घट्ट पकडायला लावलं जातं आणि जबड्याचं हाड थोडं वर उचलून जोड व्यवस्थित बसवलं जातं.

काही लोकांसाठी डॉक्टर हातांनी गॉझ फिरवत, खालील हाडावर आणि डिस्कवर थोडासा दाब देऊन ते मूळ स्थितीत आणतात."

हाडं तुटण्याच्या विविध प्रकारच्या अडचणींपैकी, खालील जबडा सुटणे म्हणजे टेम्पोरोमँडिब्युलर जॉइंट डिसलोकेशन (टीएमजे) हे फार कमी प्रमाणात घडतं, असे हाडांचे डॉक्टर कार्तिक सांगतात.

ऑर्थोडेन्टिस्ट डॉ. बालचंदर
फोटो कॅप्शन, ऑर्थोडेन्टिस्ट डॉ. बालचंदर

डॉ. कार्तिक म्हणतात, "अशा डिसलोकेशनचा सर्वात जास्त धोका खांद्याच्या सांध्याला असतो. त्यानंतर कोपर्‍याच्या सांध्याला आणि बोटांच्या सांध्याला धोका असतो. या सर्वांमध्ये, टीएमजेवगळता, बाकीचे जास्त करून अपघात किंवा खेळताना होण्याची शक्यता जास्त असते."

त्याचप्रमाणे दुसरा एक प्रसंग डॉ. कार्तिक यांनी सांगितला, "एक व्यक्ती संपूर्ण बोंडा एकाचवेळी खाण्याचा प्रयत्न करत होता. नंतर त्याला तोंड बंद करता येत नव्हतं. तो माझ्याकडे आला. मी फक्त एका मिनिटात त्याच्या तोंडात हात घालून खालील जबड्याचं हाड योग्य स्थितीत आणलं आणि तो ठीक झाला.

अशा प्रकारच्या अडचणी फारच दुर्मिळ आहेत, पण अचानक घडल्यामुळे लोकांना याची भीती वाटू शकते."

Photo Caption- हाड तुटण्याच्या विविध प्रकारच्या अडचणींपैकी, खालील जबडा सुटणे म्हणजे टेम्पोरोमँडिब्युलर जॉइंट डिसलोकेशन (टीएमजे) खूप कमी प्रमाणात होते, असं डॉ. कार्तिक सांगतात.

डॉक्टर नसलेल्या ठिकाणी काय करावं?

अशा अडचणीला सामोरे जाणाऱ्यांनी साधारणपणे जांभई घेणं किंवा शिंकताना त्यांचा खालचा जबडा हलक्या हाताने धरावा आणि तोंड जास्त उघडू नये, असं ऑर्थोडेन्टिस्ट डॉ. बालचंदर सांगतात.

विशेषतः बासरी, सॅक्सोफोनसारखी वाद्ये वाजवणाऱ्यांनी याची थोडी जास्त काळजी घेणं आवश्यक आहे.

त्याचवेळी डॉ. बालचंदर म्हणतात, "ही काही मोठी समस्या नाही. जर ही अडचण वारंवार येत असेल, तर आपल्या परिचित दातांच्या डॉक्टरांकडे गेल्यास ते योग्य मार्गदर्शन करून ही समस्या सोडवतील."

डॉ. बालचंदर म्हणतात, "कधी कधी डॉक्टर लगेच उपलब्ध नसल्यास, या अडचणीत दोन्ही हातांच्या बोटांनी खालील जबडा आणि बाकीचे बोट जिभेच्या भागावर ठेवून वरून खाली हलवलं, तर जबडा योग्य स्थितीत येतो.

हाड तुटण्याच्या विविध प्रकारच्या अडचणींपैकी, खालील जबडा सुटणे म्हणजे टेम्पोरोमँडिब्युलर जॉइंट डिसलोकेशन (टीएमजे) खूप कमी प्रमाणात होते, असं डॉ. कार्तिक सांगतात.
फोटो कॅप्शन, हाड तुटण्याच्या विविध प्रकारच्या अडचणींपैकी, खालील जबडा सुटणे म्हणजे टेम्पोरोमँडिब्युलर जॉइंट डिसलोकेशन (टीएमजे) खूप कमी प्रमाणात होते, असं डॉ. कार्तिक सांगतात.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

यामुळे काही लोकांना तणावामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो, पण यासाठी घाबरायची गरज नाही. त्यामुळे कोणतंही नुकसान होणार नाही. मात्र, ही अडचण वारंवार होत असेल, तर पुढील उपचार घेणं आवश्यक असू शकतं."

डॉ. कार्तिक म्हणतात, नैसर्गिकपणे होणाऱ्या या डिसलोकेशनव्यतिरिक्त, इतर सर्व घटना प्रामुख्याने अपघात किंवा खेळांमध्येच घडतात.

डॉ. कार्तिक सांगतात की, तरुणींच्या पायांमध्ये 'बेटाला डिसलोकेशन' जास्त होतं. काहींमध्ये खालच्या हाडांमुळे वरच्या सांध्यावरचं हाड सरकून जातं आणि त्यामुळे हा प्रकार होतो.

"व्यायाम न करणाऱ्या महिलांमध्ये ही अडचण जास्त दिसून येते. बऱ्याच वेळा ही अडचण स्वतःहून बरी होते, पण त्या वेळी थोड्या वेदना होतात. पाय, कंबर, खांदे यांसारख्या भागांमध्ये झालेलं डिसलोकेशन बरं करण्यासाठी काही वेळा वेदनाशामक औषधं द्यावी लागतात.

काही वेळा बोटांमधील डिसलोकेशनसाठी फक्त त्या भागाला सुन्न करण्यासाठी भूल देण्याची आवश्यकता भासू शकते. या वेदनेत इंजेक्शनच्या वेदनेपेक्षा, बोट दुरुस्त किंवा बरं करण्यासाठी होणारी वेदना खूप कमी असते," असं डॉ. कार्तिक म्हणाले.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)