परफेक्ट ऑम्लेट कसं बनवायचं? ही पद्धतही जाणून घ्या

फोटो स्रोत, Emily Monaco
- Author, एमिली मोनॅको
- Role, बीबीसी ट्रॅव्हल
उत्तम आणि क्रीमयुक्त ऑम्लेट फ्रेंच स्वयंपाकघरातील तरुण शेफच्या क्षमतेची चाचणी आहे.
फ्रेंच शेफ यवेस कॅमबोर्ड या प्रसिद्ध डिशमागील त्यांची कथा आणि ते बनवण्याच्या सर्वोत्तम पद्धती शेअर करतात.
एखाद्या शिकाऊ व्यक्तीकडे स्वयंपाकघरात छाप पाडण्यासाठी काही क्षण असतात.
पॅरिसच्या अव्हाँ-कॉम्पट्वायर रेस्टॉरंटचे मालक आणि प्रसिद्ध शेफ यवेस यवेस कॅमबोर्ड यांच्या मते यश मिळवणं म्हणजे मर्जी मिळवणं होय आणि अयशस्वी होणं म्हणजे अजून बरंच काही शिकायचं आहे,हे दाखवणं होय.
कॉर्नर ब्रिस्ट्रोपासून मिशेलिन या तारांकित डायनिंग रूममध्ये ऑम्लेटची भूमिका महत्त्वाची आहे.
शेफ यवेस कॅमबोर्ड यांनी स्पष्ट केलं की,"एक फ्रेंच ऑम्लेटमध्ये वेगवेगळे सारण भरले जातात. एक लिफाफा तयार करावा, तसं आम्ही त्यात सारण भरतो आणि ऑम्लेटचा रोल करतो."
लज्जतदार ऑम्लेटची रेसिपी
त्यांनी यापूर्वी ही अनेकदा आठवणी सांगितल्या आहेत,त्यांच्या व्यावसायिक प्रमाणपत्र d'aptitude professionnelle (CAP) पात्रता परीक्षाविषयी ते सांगतात.
यात ट्रेनींची कार्यं सेट केलेली असतात.
16 वर्षीय यवेस कॅमबोर्ड यांना त्यावेळी 'ऑम्लेट ऑन फाईन हर्ब्स' (औषधीयुक्त ऑम्लेट) रेसिपी देण्यात आली होती.
ते सांगतात,"मला आठवतं की मला 20 पैकी 17 किंवा 18 मार्क्स मिळाले, मी माझ्या CAP वर्गात अव्वल आलो होतो. त्या ऑम्लेटबद्दल धन्यवाद!"
त्यांच्या स्कोअरमुळं त्यांना मिशेलीन तारांकित रेस्टॉरंटमध्ये फ्रान्समधील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी (Meilleur Apprenti de France )स्पर्धेत स्थान मिळालं.
"मी एकटाच असा होतो. जो एका छोट्या शेजारच्या बिस्ट्रोमधून आलो होतो."
या स्पर्धेतही त्यांना ऑम्लेटची रेसिपी देण्यात आली होती.त्यांना पॅरिसमध्ये उपात्य फेरीत स्थान मिळालं.
तरुण ट्रेनींनी शेवटचं ऑम्लेट बनवलं आणि अंतिम स्पर्धेत ते पोहचले.

फोटो स्रोत, Emily Monaco
पण पुढची रेसिपी खूप कठीण होती. त्यात मशरूम क्रीमने भरलेले मासे स्टफ करून आणि व्हाईट वाईन सॉस मिसळून, ब्रेझ्ड लेट्युस( सॅलॅड मध्ये वापणारी पान) वापरून मंद आचेवर मांस शिजवण्याचा पदार्थ देण्यात आला होता.
त्यांच्यासाठी हा पदार्थ नवा होता. मी माझी डिश पूर्ण केली आणि शेफ डी कुझिनच्या डोळ्यातून आनंद अश्रू बाहेर आले. यवेस कॅमबोर्ड यांना हे आजही आठवतं.
शेफ डी कुझिन यांनी यवेस यांना म्हटलं की, आयुष्यात आपण नेहमीच शिकत असतो. मी तुला कामावर घेईन.
ते रिट्झचे शेफ होते.
कॅमबोर्ड यांनी मिशेलिन आणि 'टूर डी आर्जेंट'मध्ये शेफ म्हणून काम पाहिलं. बिस्ट्रोनॉमी चळवळीचे संस्थापक जनक म्हणून पॅरिसच्या जेवणात क्रांती घडवून आणली.
फ्रान्समधील मास्टरशेफ कार्यक्रमाच्या चार सीझनमध्ये त्यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं आहे. हे सर्व एका साध्या ऑम्लेटपासून सुरू झालं.
त्यांचं डिशवर प्रभुत्व होतंच. दक्षिण-पश्चिम फ्रान्समध्ये पाऊ या त्यांच्या गावी 14 व्या वर्षी ब्रिस्टोमध्ये शिकण्यास सुरुवात केली होती. जिथं ऑम्लेटही त्यांची खासियत होती.
ते सांगतात,"आमच्याकडे मेन्यूमध्ये कदाचित 30 ऑम्लेटचे प्रकार असतील."
आकडेमोड करत त्यांनी सांगितलं की, दोन वर्षांत त्यांनी अंदाजे 20 हजार ऑम्लेट सहज केल असतील.
"एवढ्यावेळा पदार्थ बनवल्यानंतर तुम्ही डोळे बंद करूनही ऑम्लेट करू शकता."

फोटो स्रोत, Emily Monaco
आपल्या ऑम्लेटची रेसिपी सांगताना ते ताज्या अंड्यापासून सुरूवात करतात.
ते ताज्या अंड्यापासून सुरुवात करतात. प्रति व्यक्ती तीन अंडी, चरबीची गरज आहे.
"स्वादासाठी लार्डो आणि कोपा (चरबीचे प्रकार) अर्धपारदर्शक होईपर्यंत तळा.हा डिशचा आत्मा आहे."
एकदा चरबी तळून झाली की, त्यावर अंडी लगेच फोडायला हवीत,अशी सूचना ते देतात.
"कारण एकदा तुम्ही अंडी फोडली की ते द्रव बनतं आणि त्याची रचना बदलते."
अंडी हलकीच फेटावीत,लगेच गरम चरबीमध्ये टाकावीत आणि फोर्कनं हलक्या हातानं ढवळत राहावं.
ते सांगतात,"जेव्हा एखादं अंडं जास्त शिजते तेव्हा त्यातलं क्रीम निघून जातं. अंड फोडल्यानंतर पसरलं की वरून धने पावडर टाकवी. या सगळ्या गोष्टी वापरल्या की खुसखुशीत ऑम्लेट बनतं."

फोटो स्रोत, Emily Monaco
शेफ म्हणून कॅमबोर्ड हे कुशल आणि कामात पटाईत होते. फोर्कनं त्यांनी अंड्याची एक कडा पकडली आणि हळूवार दुमडली. ऑम्लेट सुटणं सोपं व्हावं यासाठी बटरची धार सोडली.
हँडल हातात घेऊन पॅन तिरपा करत उशीच्या रोल सारखं ऑम्लेट प्लेट मध्ये अलगत उतरवलं.
"एकदा यात तुम्ही प्रभुत्व मिळवलं की, त्याला जास्त वेळ लागत नाही," त्यांनी म्हटलं
कॅमबोर्ड यांच्या वडिलांच्या शेतावर आठवड्यातून किमान एकदा तरी रात्री एकदा जेवणाचा कार्यक्रम असायचा.
फार्मवरील कोंबडीचीअंडी, मटार, टोमॅटो आणि व्हिनेगारचा वापर करून केलेलं ऑम्लेट, वडिलांचा एक खास सॉस असा मेन्यू असायचा.
त्यांचे वडील 20 अंडी एकत्र फेटून मोठ्या पॅनवर एकावेळी अनेक ऑम्लेट करायचे.
ते हसत त्यांच्या तरुणपणातील आठवणी सांगतात. रविवार आमच्यासाठी एक सणच असायचा.
मित्रांसोबत पार्टी केल्यानंतर मी वडिलांना उठवून सांगू शकत होतो की, "बाबा आम्ही 10 जण आहोत...तुम्ही आम्हाला ऑम्लेट बनवू देऊ शकाल का?"
शेफ यवेस कॅमबोर्ड यांची ऑम्लेट रेसिपी
स्टेप- 1
नॉन-स्टिक फ्राईंग पॅनमध्ये शेंगदाणा तेल मध्यम ते कमी आचेवर गरम करा. त्यात अर्धपारदर्शक होईपर्यंत लार्डो (चरबी)तळून घ्या.पॅनमधून काढा.
कोप्पा(swiss pork) सुद्धा पॅनमध्ये याचं प्रक्रियेने शिजवा. मांसाला पुरेसं तेल सुटत नसेल तर पॅनमध्ये बटर घाला.
स्टेप- 2
पॅन मध्यम-कमी आचेवर ठेवा आणि अंडी एका बाउलमध्ये घेऊन फोडा. एकसंध होईपर्यंत हलक्या हातानं फेटा.जास्त फेटलं जाणार नाही याची काळजी घ्या.
त्यात मीठ आणि मिरपूड टाका आणि गरम चरबीमध्ये अंडी सोडा.
जेव्हा अंड्यातील पिवळं बलक जमा होण्यास सुरुवात होईल, परंतु ऑम्लेट अजूनही पूर्ण शिजलेलं नसेल तेव्हाच गॅस कमी करा आणि लार्डोचे दोन काप, दोन कोप्पा आणि कोथिंबीर घाला.
फोर्क वापरून वरील सारण आत भरलं जाईल अशा पद्धतीनं ऑम्लेटची घडी करा. एका घडी नंतर ऑम्लेटला बटर लावा आणि पॅन तिरका करा, जेणेकरून लोणी ऑम्लेटच्या खाली जाईल.
ऑम्लेटच्या कडा दुमडण्यासाठी काटेचमच्याचा वापर करा. आता हातानं पॅनचं हँडल धरा आणि पॅन हलवून चिकटलेलं ऑम्लेट सैल करा.
स्टेप 3
एका प्लेटवर पॅनची कडा ठेवा आणि प्लेटच्या दिशेनं पॅन वाकवा.ऑम्लेट रोल थेट प्लेटमध्ये असेल.
स्टेप 4
लार्डो आणि कोप्पाच्या उरलेल्या स्लाईसने ऑम्लेट सजवा आणि आवडत असल्यास असल्यास बन्यूल्स व्हिनेगरचे काही थेंब यावर टाका.
टीप
अर्धं वितळलेलं बटर यावर टाकावं हे पदार्थाला चांगली चव येते.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.








