कॉड लिव्हर ऑईल: चांगल्या आरोग्यासाठी आश्चर्यकारक फायदे असणारं माशाचं तेल

कॉड लिव्हर ऑईल: आरोग्याचे आश्चर्यकारक फायदे असणारं माशाचं तेल

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, वेरोनिक ग्रीनवूड
    • Role, बीबीसी न्यूज

व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमच्या कमतरतेतून मूडदूससारखे आजार होतात. कॉड लिव्हर ऑईल हे पूर्वी यासाठी उपयुक्त मानलं जायचं. आता बहुधा पुन्हा त्याची आवश्यकता भासू लागली आहे. यासंदर्भातील आढावा या लेखात घेण्यात आला आहे.

अनेकजण आरोग्यदायी किंवा सकस अन्नासाठी संघर्ष करत असताना विचित्र चवीच्या तेलांना आरोग्याशी निगडीत सर्व समस्यांवरचा उपाय मानलं जायचं. त्यातील एक खरोखरंच व्हिटॅमिनचा खजिना असल्याचं दिसून आलं.

सध्याच्या काळात "कॉड लिव्हर ऑईल" (cod liver oil)या शब्दांवर एकप्रकारची जुन्या काळातील छटा आली आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

त्यातून डिकेन्शियन मुख्याध्यापक किंवा शाळेतील परिचारिकेनं देऊ केलेल्या एखाद्या चमचाभर अस्पष्ट गोष्टीची प्रतिमा तयार होते. थोडक्यात कॉड लिव्हर ऑईल म्हणजे जुन्या जमान्यातील गोष्ट झाली आहे.

18व्या आणि 19व्या शतकातील असंख्य उपाय किंवा इलाज काळाच्या ओघात टिकले नाहीत. उदाहरणार्थ, रडणाऱ्या बाळांना आपण आता अफूयुक्त वेदनाशामक औषध देत नाही.

अंजीरचं सरबत किंवा रस आणि एरंडेल तेल, जरी बद्धकोष्ठतेसाठी चांगलंच उपयुक्त ठरत असलं तरी देखील त्यांना आता सर्व आजारांवरचा इलाज मानलं जात नाही.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

शिवाय सल्फर आणि काकवीच्या खरेदीसाठी तुम्ही औषध विक्रेत्याकडं गेल्याचं तुम्हाला आठवतंय का?

कारण यांचा वापरही अनेक आजार किंवा आरोग्याशी निगडीत समस्यांच्या उपचारात केला जायचा.

कॉड लिव्हर ऑईल आणि त्याचे फायदे

मात्र कॉड लिव्हर ऑईल, हे सापांचं तेल वापरात असल्यापासूनच्या काळातील दुर्मिळ औषध किंवा उपाय आहे. त्याचबरोबर पेटंट असलेल्या औषधांच्या बाबतीत खरोखरच त्यांचा संबंध आहे.

कॉड लिव्हर ऑईल, कॉडफिश या समुद्रातील एका मोठ्या माशापासून मिळवलं जातं. कॉडफिशच्या यकृताला (लिव्हर) तापवल्यानंतर त्यातून तेल बाहेर पडतं. या तेलात व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणात असतात.

व्हिटॅमिन्सचा शोध लागण्यापूर्वी लोकांच्या लक्षात आलं होतं की कॉड लिव्हर ऑईल मुलांना दिल्यामुळे त्यांना मुडदूस (rickets) सारखा आजार होण्याची शक्यता कमी होते.

(या आजारात मुलांची हाडं ठिसूळ आणि कमकुवत होतात. मुलांमध्ये बराच काळ व्हिटॅमिन डी ची कमतरता राहिल्यास हा आजार उद्भवतो.)

कॉड लिव्हर ऑईलचं सेवन करणारा मुलगा.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मुलांच्या कित्येक पिढ्यांनी कॉड लिव्हर ऑईलचं सेवन केलं आहे. मात्र त्यातील आरोग्यदायी गुणधर्मांचा अतिरेक नसावा.

त्याचबरोबर यामुळे आकडी किंवा झटके येतात आणि ह्रदयविकाराचा झटका देखील येऊ शकतो.

1919 मध्ये मुडदूस हा आजार होण्यामागे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी ची कमतरता असल्याचा शोध लागला. यातून कॉड लिव्हर ऑईल च्या आश्चर्यकारक शक्तीचा आणि फायद्याचा उलगडा झाला होता.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात, युके सरकारनं पाच वर्षांखालील मुलांना कॉड लिव्हर ऑईल मोफत पुरवलं होतं. त्या काळात पोस्टरवर "जिमीचा संत्र्याचा रस आणि कॉड लिव्हर ऑईल विसरू नका!" असं लिहिलेलं असायचं.

कॉड लिव्हर ऑईलचे इतर कोणतेही फायदे आणि गुणधर्म असले तरी त्याची चव मात्र चांगली नसायची. इतर कोणत्याही तेलाप्रमाणे ऑक्सिजनच्या संपर्कात आल्यानंतर त्याची चव बिघडते आणि त्याला एखाद्या खराब माशाची चव येते.

व्हिटॅमिन डी ची कमतरता आणि आजार

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

व्हिटॅमिन डी साठी अंगावर ऊन घेणं चांगलं असतं त्यामुळे अनेकदा उन्हात बसतात. त्यातून त्वचेखालील उत्प्रेरकं (Enzymes) व्हिटामिन डी ची निर्मिती करतात. मात्र व्हिटामिन डी मिळवण्यासाठीचा हा पर्याय युकेमधील मुलांसाठी नियमितपणे अवलंबता येण्यासारखा पर्याय नव्हता.

ही बाब जशी आज खरी आहे तशीच ती शंभर वर्षांपूर्वी देखील होती.

(आणी ही परिस्थिती आणखी खराब होण्याची शक्यता आहे. कारण हवामान विभागानं अंदाज वर्तवला आहे की 1990 मध्ये हिवाळ्यात जितका पाऊस पडत होता, त्यातुलनेत त्यामध्ये 2070 पर्यंत 30 टक्के वाढ होणार आहे)

"युकेतील अन्नातील पोषक घटक वाढवण्याच्या प्रयत्नांमध्ये सुरूवातीलाच अडथळे आले"

म्हणूनच अनेक दशकांपूर्वी अनेक सरकारांनी पोषणयुक्त (खनिजं आणि व्हिटामिनयुक्त) अन्नपदार्थांवर भर दिला. 1940 मध्ये युकेनं व्हिटामिन डी असलेल्या मार्जरिनवर (margarine) भर देण्याची सक्ती सुरू केली.

पाव, दूध आणि न्याहारीतील तृणधान्यांचा मग त्यात समावेश झाला. अमेरिकेत दूधामध्ये व्हिटामिन डी चं चांगलं प्रमाण असण्यासंबंधीचा कायदा 1933 पासून आहे.

न्याहारीतील तृणधान्ये, पाव आणि पीठ यांच्यामध्ये मग नियमितपणे पोषक घटकांचा (खनिजं आणि व्हिटामिन) अंतर्भाव करण्यात येऊ लागला.

अगदी 21 व्या शतकात व्हिटामिन डी ची पातळी उंचावण्यासाठी सरकारांनी त्यांच्या धोरणात बदल केला.

दुधासारख्या अन्नपदार्थांमध्ये पोषक घटकांचा समावेश केल्यानं या प्रकारचे पूरक तेल घेण्याची आवश्यकता कमी होते

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, दुधासारख्या अन्नपदार्थांमध्ये पोषक घटकांचा समावेश केल्यानं या प्रकारचे पूरक तेल घेण्याची आवश्यकता कमी होते

2003 मध्ये फिनलंडनं अन्नात पोषक घटकांचा सहभाग करण्यासाठी स्वत:ची योजना सुरू केली. त्यात जवळपास जगभरातील अन्न उत्पादकांचा सहभाग होता.

युकेतील अन्नातील पोषण वाढवण्याच्या प्रयत्नांना सुरूवातीलाच अडथळे आले. अन्नात पोषक घटकांचा समावेश केल्यानंतर हायपरकॅल्सेमिया (hypercalcaemia)या आजाराचे रुग्ण आढळून आले होते.

हायपरकॅल्केमिया सारख्या आजारात रक्तात खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळं मूतखडे तयार होतात आणि त्याचबरोबर इतरही समस्या उद्भवतात.

यातून तज्ज्ञांना शंका आली की मुलांच्या शरीरात व्हिटामिन डी चं अतिरिक्त प्रमाण जातं आहे. त्यानंतर 1950 च्या दशकात याप्रकारे अन्नात पोषक घटकांचा समावेश करण्यावर बंदी घालण्यात आली.

फक्त मार्गारिन आणि बेबी फूड किंवा छोट्या बाळांना दिला जाणार आहार (दुधाची पावडर इत्यादी) यांचा यासाठी अपवाद करण्यात आला.

तरीही कॉड लिव्हर ऑईलनं बाजारात पुनरागमन केल्याचं दिसून आलं नाही. 2013 मध्ये युकेनं मार्गारिनमध्ये पोषक घटकांचा समावेश करणं थांबवलं.

हे करण्यामागे लोकांना मुख्य आहारास पूरक पोषण आहार किंवा घटक (Supplements)घेण्यास उद्युक्त करण्याचा किंवा प्रोत्साहन देण्याचा उद्देश होता (काही लोकांनी या सल्लाकडे लक्ष दिलं किंवा कदाचित याबद्दल त्यांना माहिती असेलही).

व्हिटामिन डी संदर्भातील ताजा धक्कादायक अभ्यास

अलीकडच्या वर्षांमध्ये रक्तातील व्हिटॅमिन डी ची पातळी जाणून घेण्यासाठी करण्यात येणाऱ्या रक्तचाचण्यांमध्ये सुधारणा झाल्यानंतर यासंदर्भात धक्कादायक सत्य उजेडात आलं आहे.

जानेवारी आणि मार्च दरम्यान जेव्हा सूर्यप्रकाश सर्वात कमी असतो तेव्हा युकेतील मुलांचा मोठा भाग किंवा संख्या म्हणजेच काही वयोगटातील जवळपास 40 टक्के मुलांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता असते.

तसंच जवळपास 30 टक्के वयस्क देखील याच स्थितीत असतात. विशेषत: ज्या लोकांची त्वचा गडद असते त्यांना हा धोका अधिक असतो.

"युकेतील दक्षिण आशियाई लोकांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता ही जवळपास सर्रास दिसून येणारी बाब आहे," असं न्युट्रिशन बुलेटिन या जर्नलच्या संपादकीय लेखात अकॅडमी ऑफ न्युट्रिशन सायन्सच्या ज्युडीथ बट्रिस या आहारतज्ज्ञांनी लिहिलं होतं.

इतकंच काय, मुडदूस देखील परतला आहे. 60 आणि 70च्या दशकात युकेतील हॉस्पिटलमध्ये मुडदूसमुळे दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होती. त्यानंतरच्या दशकात देखील ती आणखी कमी झाली होती.

1991 मध्ये इंग्लंडमध्ये 15 वर्षे वयाखालील दर 1 लाख लोकांमागे 0.34 जणांना मुडदूसची समस्या होती. मात्र 2000 च्या दशकात मुडदूसाच्या रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली.

"इंग्लंडमध्ये मुडदूसामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण आता पाच दशकांतील उच्चांकावर आहे," असं 2011 मध्ये वैज्ञानिकांनी लिहिलं होतं.

प्रतिकात्मक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

अन्नात पोषक घटकांचा समावेश करण्याची वेळ पुन्हा आली आहे का? युके मधील पोषक आहारावरील वैज्ञानिक सल्लागार समिती (Scientific Advisory Committee on Nutrition) या प्रश्नावर विचार करते आहे.

आता असं मानलं जातं आहे की ज्या हायपरकॅल्केमिया च्या समस्येमुळे युकेतील अन्नपदार्थांमध्ये पोषक घटकांचा समावेश करण्याचं थांबवलं गेलं होतं.

ती समस्या एका अनुवांशिक रोगामुळे होते. व्हिटॅमिनच्या शोषणात व्यत्यय निर्माण झाल्यामुळे किंवा ती प्रक्रिया मंदावल्यामुळे ते होतं.

दुसऱ्या शब्दात, खूप जास्त प्रमाणात पोषक घटकांचा समावेश केलेल्या अन्नाचं सेवन करणं हीच समस्या होती असं नाही. किंबहुना पुढे एक बदल होणार आहे.

युकेमध्ये मुडदूस चं प्रमाण वाढण्यामागे अनेक घटक कारणीभूत आहेत. मात्र असं दिसून येतं की आहारात चमचाभर कॉड लिव्हर ऑईलचं पुनरागमन होण्याची शक्यता आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.