रेशीम शेतीतून तो लाखोंचं उत्पन घेतोय

व्हीडिओ कॅप्शन, भाऊसाहेब निवदे या तरुण शेतकऱ्याला सरकारचा रेशीमरत्न हा पुरस्कार मिळालाय.

मराठवाड्यातल्या भाऊसाहेब निवदे या 25 वर्षांच्या शेतकऱ्याने रेशीम शेतीतून 15 महिन्यांमध्ये 23 लाखांचं उत्त्पन्न मिळवलं.

भारतीय सैन्य दलात जायचं त्याचं स्वप्न होतं, तीन वर्षं तयारी केल्यानंतर त्याचे प्रयत्न अयशस्वी झाले. पार्ट टाईम शिक्षण घेता-घेता त्याने इंटरनेटवर पाहात शेतीमध्ये प्रयोग करायचं ठरवलं. आणि जोमाने रेशीमची शेती सुरू केली.

त्यानंतर त्याने जे कमवलं ते फक्त पैशातच तोललं गेलं नाही तर त्याच्या यशाची नोंद घेतली. त्याला सरकारचा रेशीमरत्न हा पुरस्कार मिळालाय.

रिपोर्टर – श्रीकांत बंगाळे शूट – गणेश वासलवार एडिटिंग - अरविंद पारेकर

हेही वाचलंत का?