मेस्सीची अर्जेंटिना पेनल्टी शूट आउटमध्ये विजयी, मेस्सीने रचला इतिहास

कतारमध्ये फ्रान्सविरुद्ध झालेल्या सामन्यात अर्जेंटिना विजयी झालं आहे. लिओनिल मेस्सीच्या नेतृत्वात अर्जेंटिनाने वर्ल्ड कपवर आपले नाव कोरले आहे. अत्यंत चुरशीच्या सामन्यात अर्जेंटिनाचा विजय झाला.
एक्स्ट्रा टाइममध्ये लिओनिल मेस्सीने पुन्हा एक गोल करत 3-2 अशी आघाडी मिळवली. पण त्यांचा हा आनंद अल्पकाळच टिकला, पुढील काही मिनिटातच एम्बापेनी तिसरा गोल करत सामना बरोबरीत आणला.
108व्या मिनिटाला लौटारे मार्टिनेझने गोल दागला पण फ्रान्सचा गोलकीपर लॉरिसने तो छातीवर बॉल घेत अडवला. तिथेच असणाऱ्या मेस्सीने हलकेच बॉलला गोलपोस्टमध्ये ढकललं, फ्रान्सच्या उपमेकानोने गोलपोस्टमधून तो परतावला पण तो स्वत: गोलपोस्टमध्ये असल्याने अर्जेंटिनाचा गोल झाला आणि त्यांच्या चाहत्यांनी मैदान डोक्यावर घेतलं.

79व्या मिनिटाला फ्रान्सला पेनल्टी मिळाली. फ्रान्सचा हुकूमी एक्का एम्बापेने अर्जेंटिनाचा गोलकीपर ज्या दिशेने झेपावला त्याच दिशेने गोल दागला. एम्बापेच्या वेगाने गोलकीपरला भेदलं आणि फ्रान्सने गोलचं खातं उघडलं.
आणखी दोन मिनिटात, मार्कस लिलिआन थुरुम युलियनच्या वेगवान पासवर तितक्याच वेगाने एम्बापेने थरारक गोल करत फ्रान्सला बरोबरी करुन दिली. सामन्याच्या अंतिम टप्प्यात फ्रान्सने बॉलवर नियंत्रण मिळवत दणका उडवला.
माँटेइलने एम्बापेचा फटका रोखायचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी बॉल त्याच्या हाताला लागला. रेफरींनी फ्रान्सला पेनल्टी जाहीर केली. एम्बापेने हॅट्ट्रिक करत फ्रान्सला बरोबरी करून दिली.
कसा झाला सामना
सार्वकालीन महान फुटबॉल लढतींमध्ये गणना होईल अशा दर्जेदार खेळाची अनुभूती अर्जेंटिना आणि फ्रान्स लढतीने दिली. निर्धारित वेळेत सामना 2-2 बरोबरीत सुटला. जादा वेळेत 3-3 बरोबरी झाली. पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 अशी सरशी साधत अर्जेंटिनाने जेतेपदावर कब्जा केला. तब्बल 36 वर्षानंतर अर्जेंटिनाने फुटबॉल विश्वविजेतेपदावर नाव कोरलं. आधुनिक फुटबॉलमधील महान खेळाडू लिओनेल मेस्सीच्या नावावर वर्ल्डकपची ट्रॉफी नव्हती. हा सल मेस्सीने दोन गोल करत भरुन काढला आणि कारकीर्दीतील सर्वोत्तम क्षणाची अनुभूती अनुभवली.

हा वर्ल्डकप माझा शेवटचा असेल असं मेस्सीने आधीच जाहीर केलं होतं. जेतेपदासह अर्जेंटिनासाठीच्या कारकीर्दीची सांगता करत मेस्सीने चाहत्यांना हवीहवीशी भेट दिली. पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाने निर्विवाद वर्चस्व राखत एकावर एक गोल केले. फ्रान्ससाठी मात्र पेनल्टी शूटआऊट निराशादायी ठरला. अर्जेंटिनातर्फे माँटियल, पेरडेस, डायबाला आणि मेस्सी यांनी गोल करत अर्जेंटिनाला थरारक विजय मिळवून दिला.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








