You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बीएचयू विद्यार्थी आंदोलन चिघळलं : पोलिसांचा लाठीमार
- Author, समीरात्मज मिश्रा
- Role, बीबीसी हिंदी
बनारस हिंदू विद्यापीठात छेडछाडीवरोधात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलानाला शनिवारी मध्यरात्री हिंसक वळण आलं.
विद्यापीठाच्या गेटसमोर धरणं देत असलेल्या विद्यार्थ्यांना तिथून हटविण्यासाटी शनिवारी रात्री पोलिसांनी लाठीमार केला. पोलिसांनी बळाच्या केल्यानं विद्यार्थी आणि पोलिसांत चकमकी उडाल्या. विद्यार्थ्यांना पांगविण्यासाठी मग पोलिसांनी अश्रुधूराच्या नळकांड्या फोडल्या.
विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पुरेशी काळजी घेण्यात आलेली नाही. म्हणून छेडछाडीच्या घटना वारंवार घडतात, असे विद्यार्थ्यांनी आरोप केले आहेत.
विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारींनुसार प्रशासनानं त्यावर कार्यवाही करण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या वेळी-अवेळी येण्याजाण्यावरच प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले.
त्यातूनच ही परिस्थिती उद्भवली.
पोलिसांच्या लाठीमारानं संतापलेल्या विद्यार्थ्यांनी नंतर पोलीस आणि पत्रकारांच्या वाहनांना आग लावल्याचं पोलीस म्हणाले. वरिष्ठ अधिकारी आणि पत्रकारांसोबतही विद्यार्थ्यांनी धकाबूक्कीही केल्याचं त्यांनी पुढे सांगितलं.
परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी नंतर मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त बोलवला. पोलिसांनी विद्यापीठाच्या हॅस्टेलमध्ये रात्री शोध मोहीम सुरू केलं.
विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनानं 2 ऑक्टोबरपर्यंत कॅम्पस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुकवर लाईक करू शकता.)