You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
1947 ते 2019: समान हक्कांसाठीच्या लढ्याचा एक ट्रेन प्रवास - बीबीसी VR फिल्म
महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांचं प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्र संघटनेनं 25 नोव्हेंबर हा दिवस मुक्रर केला आहे.
International Day for the Elimination of Violence against Women हा दिवस महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांचं गांभीर्य समाजासमोर मांडणं, यासाठी महत्त्वपूर्ण आहे.
संयुक्त राष्ट्र संघटनेनुसार, दर तीनपैकी एक महिला किंवा मुलीला आयुष्यात शारीरिक किंवा लैंगिक अत्याचाराला सामोरं जावं लागलं आहे.
भारतातल्या महिलांना स्वातंत्र्य मिळाल्यापासून त्यांच्या हक्कांसाठी लढा द्यावा लागला आहे. यानिमित्ताने महिलांसाठीच्या हक्कांच्या मोहिमतले काही महत्त्वाचे पैलू बीबीसी 360 चित्रपटाद्वारे तुमच्यासमोर उलगडणार आहे.
हा चित्रपट नक्की पाहा आणि महिला हक्क लढाईतलं कालचक्राचं आवर्तन नक्की अनुभवा.
काही सूचना:
- हा व्हीडिओ पाहताना तुमचं इंटरनेट कनेक्शन चांगलं आहे ना, याची खात्री करा. हेडफोन्स वापरल्यास उत्तम.
- मोबाईलवर पाहताना फोन horizontal mode मध्ये धरा. स्क्रीनवर टच आणि ड्रॅग करून तुम्ही 360 डिग्री दृश्याचा अनुभव घेऊ शकता.
- डेस्कटॉपवर हा व्हीडिओ पाहताना गुगल क्रोम, सफारी किंवा मोझिला फायरफॉक्स वापरत असाल तर त्याचं सर्वांत ताजं अपडेट तुमच्याकडे आहे, याची खात्री करा. माऊसच्या सहाय्याने तुम्ही 360 डिग्री दृश्याचा अनुभव घेऊ शकता.