व्लादिमिर पुतीनः युक्रेन मोहिमेला युरोप आणि पाश्चिमात्य देश कारणीभूत

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी अमेरिका आणि युरोपीय देशांवर कडाडून टीका केली आहे. युक्रेन युद्ध सुरू होऊन वर्ष झाल्यानंतर पुतीन यांनी मास्कोमध्ये केलेल्या भाषणात पाश्चिमात्य देशांवर आरोप केले आहेत. या युद्धाला युरोप आणि पाश्चिमात्य देश जबाबदार असल्याचं ते म्हणाले आहेत.

आपल्या भाषणात ते म्हणाले, "ही वेळ आपल्या देशासाठी अत्यंत जटील आणि आव्हानात्मक आहे. या काळात जग वेगानं बदलं आहे. रशियाचं युक्रेनवरील आक्रमण ही विशेष मोहीम आहे. डोनबास क्षेत्रातील संघर्षाला शांततामय उत्तर शोधण्याचे प्रयत्न रशियाने केले परंतु शांततेसाठी पाश्चिमात्य देशांची बांधिलकी ही फक्त फसवणुकीची आहे आणि ती एक मोठी असत्य गोष्ट आहे."

ते पुढे म्हणाले, "युक्रेन जैविक आणि अण्वस्त्रं एकत्र करण्याचा प्रयत्न करत होता. आम्ही या समस्येवर शांततामय तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु आमच्या माघारी वातावरण वेगळंच तयार केलं गेलं. युक्रेन आणि डोनबास हा परिसर फक्त असत्याचं प्रतीक झाला आहे.

पाश्चिमात्य देश आणि युक्रेन या मोहिमेला कारणीभूत आहेत. पूर्व दिशेला सरळ आक्रमण करुन स्पर्धा संपवावी अशा मताचे ते आहेत. स्थानिक संघर्षाला वैश्विक संघर्षाचं रूप देण्याचा प्रयत्न पाश्चिमात्य देश करत आहे. पाश्चिमात्य देश मुलभूत समजुतीपासून फारकत घेतली. ते नेटोचा विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहेत."

पुतीन यांनी जाहीर केले की अमेरिकेसोबत असलेला शस्त्र नियंत्रण करार रद्द करण्यात आला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन अचानकपणे युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये पोहोचतात तेव्हा...

गेल्या एका वर्षापासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धाची सांगता होण्याची अद्याप चिन्हं दिसत नसतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे अत्यंत गोपनीयरीत्या युक्रेनमध्ये पोहोचल्याची माहिती न्यूयॉर्क टाइम्सने दिली होती.

पोलंडच्या सीमेहून रेल्वेने ते पोहोचल्याचे सांगण्यात आले आहे. पोलंडहून अचानकपणे बायडन युक्रेनची राजधानी कीव्हला पोहोचले. त्यांच्या या दौऱ्यासंबंधी सर्व माहिती गुप्त ठेवण्यात आली आहे. बायडन हे पुन्हा परतले असल्याचे सांगण्यात येत आहे.

त्यांचा हा दौरा इतका गोपनीय कसा ठेवण्यात आला याबाबतची सर्वत्र चर्चा होत आहे.

काही रिपोर्टनुसार शनिवारी (18 फेब्रुवारी) बायडन हे त्यांची पत्नी जिल यांच्यासोबत कीव्हमध्ये एका रेस्टॉरंटमध्ये हजर होते. तिथे त्यांनी जेवण केले आणि त्यानंतर ते वॉशिंग्टनला रवाना झाले.

याआधी, बायडन यांच्या युक्रेन दौऱ्याबाबत अधिकाऱ्यांनी काही सांगण्यास नकार दिला होता. बायडन यांचा युरोप दौरा निजोजित होता, त्यावेळी ते युक्रेनला जाणार आहेत का असं अधिकाऱ्यांना विचारण्यात आलं होतं तेव्हा तसं काही होणार नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितले पण आता बायडेन यांच्या युक्रेन भेटीनंतर या युद्धाची दिशा कशी बदलते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

न्यूयॉर्क टाइम्सने लिहिलं आहे की रविवारी रात्री व्हाईट हाऊसने राष्ट्राध्यक्षांचा एक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार ते सोमवारी वॉशिंग्टनमध्ये असणे अपेक्षित होते, आणि संध्याकाळी वर्साव रवाना होणार होते, पण त्यावेळी राष्ट्राध्यक्षांनी आपल्या युक्रेन दौऱ्यात होते.

रशियाने युक्रेनवरील गेल्या वर्षी हल्ले सुरू केल्यापासून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा हा पहिला दौरा होता. बायडन हे पोलंडचे राष्ट्राध्यक्ष अॅंड्रेज दुदा यांना भेटण्यासाठी गेले होते.

बायडन काय म्हणाले?

जो बायडन यांनी युक्रेनच्या नागरिकांची स्तुती तरताना म्हटले की सैन्यातील ट्रेनिंगचा अनुभव नसतानाही युक्रेनच्या सैनिकांनी युद्धात चांगली कामगिरी बजावली.

ते म्हणाले, एक वेळा मी पुन्हा युक्रेनच्या सामान्य नागरिकांच्या मेहनतीचं कौतुक करतो. ज्यांना याआधी कधी सैन्याचं प्रशिक्षण देखील मिळालं नाही त्यांनी पुढे येऊन संघर्ष केला. त्यांनी केलेली ही कामगिरी एखाद्या नायकाहून कमी नाहीये आणि केवळ मीच नाही, तर संपूर्ण जग त्यांच्या शौर्याबाबत असाच विचार करत आहे.

बायडन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी संयुक्तरीत्या एक निवेदन जारी केले आहे त्यामध्ये ते सांगतात की लोकशाहीप्रधान जगासाठी आपल्याला हे शौर्यपूर्ण युद्ध जिंकावेच लागेल.

बायडनने म्हटलं आहे की अमेरिका नेहमीच युक्रेनच्या बाजूने उभी राहिली.

झेलेन्स्की यांनी म्हटले की अमेरिका-युक्रेन संबंधांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण दौरा आहे. यातून हे दिसून येतं की आपण भरपूर काही मिळवलं आहे, आज आमच्यात झालेली चर्चा ही अत्यंत फलदायी ठरली.

या दौऱ्याचा परिणाम निश्चितपणेच युद्धावर होईल असा विश्वास बायडन यांनी व्यक्त केला.

जानेवारीच्या सुरुवातीलाच अमेरिकेने युक्रेनला अब्राम्स रणगाडे देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचा फायदा युक्रेनचे संरक्षण मजबूत होण्यासाठी झाला आहे.

झेलेन्स्की यांनी म्हटले आहे की बायडन यांच्याशी लांब पल्ल्याच्या हत्यारांबाबतही चर्चा झाली आहे. मला विश्वास आहे की युक्रेनला एक महत्त्वपूर्ण सपोर्ट पॅकेज मिळेल आणि आता रशियाच्या आक्रमणाला कुठलीही संधी नसेल याबाबतचा हा इशारा असेल.

झेलेन्स्की यांनी बायडनचे आभारही मानले.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)