पाकिस्तान : कराची पोलीस मुख्यालयावरील हल्ल्यात 2 पोलिसांसह चौघांचा मृत्यू

फोटो स्रोत, Getty Images
पाकिस्तानातील कराचीमध्ये पोलीस मुख्यालयावर सहा ते सात जणांनी हल्ला केला. या हल्लेखरांकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला.
सिंध प्रांताच्या पोलीस महानिरीक्षकांनी दिलेली माहिती पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी स्थानिक वृत्तवाहिनीला दिली.
हल्ल्यावेळी पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असताना राणा सनाउल्लाह यांनी सांगितलं होतं की, "सध्या पोलीस मुख्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर हल्लेखोर असून, तिथून गोळीबार करत आहेत. हल्लेखोर ज्यावेळी पोलीस मुख्यालयात पोहोचले, तेव्हा वाहनं पार्क केल्यानंतर हँड ग्रेनेडही फेकले."
तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) ने या हल्ल्याच्या जबाबदारी स्वीकारली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, "या हल्ल्यात दोन पोलीस, एक रेंजरमन आणि एका नागरिकाचा मृत्यू झालाय. तसंच, 14 पोलीस आणि रेंजरमन जखमी झाले आहेत. जखमींची स्थिती गंभीर असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत."
या हल्ल्याची चौकशी केली जाणार असल्याचीही माहिती पोलिसांनी दिली.

फोटो स्रोत, Getty Images
हल्ला झाल्यानंतर पोलीस मुख्यालयात उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी इमारतीची वीज बंद केली, तसंच इमारतीत प्रवेश करण्याचे मार्गही बंद केले होते.
कराची शहरातल्या इतर भागांमधील पोलिसांना पोलीस मुख्यालयाच्या इमारतीकडे पाठवण्यात आलं होतं.
स्थानिक माध्यमांनी आतापर्यंत काय माहिती दिली होती?
एएफपी या वृत्तसेवा संस्थेनुसार पाकिस्तानी वृत्तवाहिनी जिओ टीव्हीशी बोलताना सिंध प्रांताचे माहिती व प्रसारण मंत्री शरजील इमाम मेनन म्हणाले होते की, हल्लेखोर नेमके किती संख्येत आहेत, याची नेमकी माहिती आमच्याकडे नाहीय.
काही दिवसांपूर्वी पेशावरमधील मशिदीवर झालेल्या हल्ल्यात जवळपास 100 लोकांना जीव गमवावा लागला.
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो जरदारी यांनी कराची हल्ल्याबाबत ट्वीट केलंय.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
भुट्टोंनी लिहिलंय की, "कराची पोलिसांवरील हल्ल्यांचा मी निषेध करतो. इतिहासात सिंध पोलिसांनी दहशतवादाचा मोठ्या शौर्यानं सामना केलाय आणि दहशतवाद्यांना पराभूतही केलंय. आम्हाला सिंध पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे की, ते याही वेळेस दहशतवाद्यांना पराभूत करतील. असे भ्याड हल्ले आम्हाला रोखू शकत नाहीत."
सिंधमध्ये बिलावल भुट्टो यांच्या पाकिस्तान पिपल्स पार्टीचं सरकार आहे.
पाकिस्तान दहशतवादाला मुळातून संपवेल - शहबाज शरीफ
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी कराची पोलीस मुख्यालयावर झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवला. शरीफ म्हणाले की, "पाकिस्तान दहशतवादाला मुळातून संपवेल."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
ट्वीट करत शहबाज शरीफ म्हणाले की, "कराची पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचा मी निषेध नोंदवतो आणि या हल्ल्याला अयशस्वी करणाऱ्या अधिकाऱ्यांना सलाम करतो."
"पाकिस्तान केवळ दहशतवादाला मुळातून संपवणार नाही, तर दहशतवाद्यांना न्यायालयाच्या चौकटीत आणून त्यांनाही संपवेल," असंही शरीफ म्हणाले.
(ही बातमी सातत्यानं अपडेट होत आहे....)
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)