कार्बन डायऑक्साईडपासून तयार होणार गाद्या आणि प्लॅस्टिक, पण कसं?

या कार्बन डाय ऑक्साईडचं करायचं काय? त्याच्यापासून गाद्या आणि प्लॅस्टिक तयार करावं का?

फोटो स्रोत, Getty Images

आपल्या पृथ्वीवर प्लॅस्टिक ही एक मोठी समस्या झाली आहे. जवळपास 7.25 ट्रिलियन टन प्लॅस्टिक जमिनीवर आणि समुद्रात आहे. मात्र याचा आणखी एक पैलू आहे. तो म्हणजे आपल्याला प्लॅस्टिकची गरज आहे आणि या प्लॅस्टिकनं गेल्या शतकापासून आपल्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणला आहे.

प्लॅस्टिकने आपल्या आयुष्याचा मोठा भाग व्यापून टाकला आहे. आपल्या रोजच्या जगण्यात पदोपदी या प्लॅस्टिकचा वापर होताना दिसतो. आता हेच पाहा प्लॅस्टिक नसेल तर संगीत रेकॉर्ड करणं किंवा अगदी सिनेमाही करणं अशक्य आहे. नवी सर्व औषधं प्लॅस्टिकवर अवलंबून आहेत. रक्तपेढ्या आणि सीरिंज ट्युबमध्येही त्याचा वापर होतो.

गाड्यांपासून अगदी विमानापर्यंत त्याचा वापर होतो. प्लॅस्टिकच्याच मदतीने आपला जगप्रवास शक्य होतोय. त्याचबरोबर संगणक, फोन तसेच इंटरनेटशी संबंधित तंत्रज्ञानात प्लॅस्टिकचा वापर भरपूर होतो. जर आणखी खोलात गेलं तर कदाचित प्लॅस्टिकमुळेच तुम्ही ही बातमी वाचू शकत आहात, हे लक्षात येईल.

प्लॅस्टिक तयार करण्यासाठी इंधनाचा वापर होतो. इंधन जळल्यावर वातावरणात कार्बन डायऑक्साईड पसरतो. हा एक हरितगृह वायू आहे. त्यामुळे हवामान बदलाला हातभार लागतो. पण आपण कार्बनच्या उत्सर्जनाविना आपण प्लॅस्टिकच्या गाद्या, फोम इन्सुलेशन, प्लॅस्टिकच्या ताटं-वाट्या, डबे करू शकतो का?

नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने कार्बन डायऑक्साईडचं प्लॅस्टिकमध्ये रुपांतर करणं शक्य आहे. त्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी करता येईल. यातल्या शास्त्रीय भागाची येथे माहिती घेऊ.

कार्बन डायऑक्साईडपासून नायलॉन

प्लॅस्टिक हे सिंथेटिक पॉलिमर असतं. त्यात लांबट मॉलेक्युल्स वारंवार येत एका साखळीने दुसऱ्याशी जोडलेले असतात. ब्रिटनमधील सेंटर फॉर कार्बन डायऑक्साईड युटिलायझेशनच्या शास्त्रज्ञांनी नायलॉन तयार करण्याच्या पद्धतीचा शोध घेतला आहे. हे एक प्रकारचे पॉलिपर आहे त्याला पॉलीक्राइलामाई असं म्हणतात, आणि ते कार्बन डायऑक्साईडपासून तयार होतं.

सेंटर फॉर कार्बन डायऑक्साईड युटिलायझेशनचे संचालक सांगतात, "कार्बन डायऑक्साईडपासून नायलॉन बनवणं ही संकल्पना ऐकायला विचित्र वाटते, पण आम्ही ते साध्य केलंय."

ते सांगतात, इंधनाला कच्च्या घटकांसारखं वापरण्याऐवजी तुम्ही कार्बन डायऑक्साईडमध्ये काही रसायनं घालून त्याचा वापर करू शकता. हे पेट्रोकेमिकल क्षेत्रात मोठा बदल घडवू शकतं.

बहुतांश कार्बन डायऑक्साईड हे फक्त उत्सर्जनाने येत नाही, ते अनेक रासायनिक प्रक्रियांमधून उपपदार्थ म्हणजे बायप्रोडक्ट म्हणूनही निघतं. परंतु कारखान्यांमधून बाहेर पडणाऱ्या कार्बन डायऑक्साईडला पकडण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ करत आहेत.

वायूने बनवलेल्या गादीवर झोपा

कार्बन डायऑक्साईडपासून प्लॅस्टिक तयार करण्यासाठी शास्त्रज्ञांना अनेक कॅटेलिस्ट तयार करावे लागतात, त्यातून रासायनिक अभिक्रियेला गती येते. जर्मनीच्या कोवेस्ट्रो पेट्रोकेमिकलने एक गादी तयार केली आहे, त्यात 20 टक्के कार्बन आहे.

त्यांनी एक कॅटलिस्ट तयार केलंय ते कार्बन डायऑक्साईड आणि दुसऱ्या संयुगामध्ये अभिक्रिया घडवून आणतं आणि पॉलियुरेथेन नावाची फॅमिली तयार करतं. त्याचपासून गाद्या बनतात, त्याचपासून फ्रिजचं इन्सुलेशनही तयार होतं.

जगभरात 15 दशलक्ष टनांहून अधिक पॉलियुरेथेनचा वापर होतो. त्याचमुळे कार्बन डायऑक्साईडपासून याचा कच्चा माल तयार करणं फायदेशीर ठरू शकतं. त्यामुळे कार्बन उत्सर्जनही कमी होईल.

स्वच्छ हवा

संपूर्ण जगात शास्त्रज्ञ कार्बन डायऑक्साईडचा वापर करुन वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅस्टिक तयार करत आहेत. पॉलियुकेथेन तयार करणाऱ्या इकोनिक या ब्रिटिश कंपनीचं उत्पादन येत्या दोन वर्षांत फोन बाजारात येईल, असं त्या कंपनीला वाटतं. त्याशिवाय कोटिंग आणि इलास्टोमरही तयार करता येतं. इलास्टोमर हा एक रबारासारखा पदार्थ आहे.

कंपनीचे विक्रीप्रमुख टेलर सांगतात, हा नवा पदार्थ क्वालिटी पाहिल्यास प्लॅस्टिकसारखाच असतो. ते सांगतात, हे मटेरियल अनेक पातळ्यांवर सरस आहे. त्याला आग लागत नाही, ओरखडे उठत नाहीत.

या कार्बन डाय ऑक्साईडचं करायचं काय? त्याच्यापासून गाद्या आणि प्लॅस्टिक तयार करावं का?

फोटो स्रोत, Getty Images

इकोनिकच्या अंदाजानुसार एकूण पॉलिऑलपैकी 30 टक्के भाग कार्बन डायऑक्साईडपासून बनवला गेल्यास 90 दशलक्ष टन कार्बन उत्सर्जन कमी केलं जाऊ शकेल.

कार्बन डायऑक्साईडची किंमत पोपलाइन ऑक्सलाईटच्या अर्ध्या किंमतीएवढी आहे.

भविष्यातील संधी

याशिवाय शास्त्रज्ञ कार्बन डायऑक्साईडपासून काही पॉलिकॉर्बोनेट तयार करत आहेत, त्यापासून कंटेनर आणि बाटल्या तयार केल्या जाऊ शकतात. त्यात जायलोजसुद्धा आहे. ते कॉफीमधून मिळतं.

हे शुगर बेस्ड प्रॉडक्ट आधीच्या प्रॉडक्टपेक्षा सुरक्षित आहे. याशिवाय कार्बन डायऑक्साईडपासून इथाइलिन तयार करण्याचाही प्रयत्न केला जात आहे. जगातलं अर्धं प्लॅस्टिक इथाइलिनपासूनच तयार झाल्याचं बोललं जाऊ शकतं आणि हा सर्वांत महत्त्वपूर्ण कच्चा माल आहे.

ब्रिटनमधील सांवासी कॉलेजमधील प्राध्यापक इन्रिको एन्ड्रिओली यांचा इथाइलिनसाठी कॅटलिस्ट तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कार्बन डायऑक्साईडबरोबर पाणी आणि विजेचा वापर करुन इथाइलिन तयार केलं जाऊ शकतं.

कार्बन डायऑक्साईडपासून तयार झालेल्या पॉलिइथाइलिनचा व्यापक स्तरावर वापर सुरू होण्यास 20 वर्षांहून अधिक काळ लागू शकतो. मात्र इन्रिको सांगतात, त्यासाठी अधिक प्रयत्न केले पाहिजेत.

30 ते 40 वर्षांनंतर आपण इंधनापासून इथाइलिन बनवू शकणार नाही, त्यासाठी आपल्याला दुसरे मार्ग शोधावे लागतील, असं त्यांचं मत आहे.

बायोप्लॅस्टिकमुळे काही समस्या उद्भवतील का?

जेवढा दावा केला जातोय तितक्या लवकर बायोप्लॅस्टिक नष्ट होत नाही, असं दिसून आलंय. ते तयार करतानाही वातावरणात कार्बन जातं.

यामुळे कार्बन डायऑक्साईडने तयार होणारं प्लॅस्टिक काही समस्यांवर उत्तर असू शकेल, पण सर्वच समस्या त्यामुळे सुटतील असं मानणं चूक आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)