You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लिझ ट्रस : पंतप्रधानपद ते राजीनामा या प्रवासातले 8 टप्पे
युकेच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी राजीनामा दिला आहे. अवघ्या सहा आठवड्यांत लिझ ट्रस यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिलाय.
त्यांनी सत्तेत येताच नवी कर प्रणाली आणत करांमध्ये मोठी कपात केली होती. ज्यानंतर त्यांना सर्वच स्तरातून मोठ्या टीकेला सामोरं जावं लागलं होतं.
ज्या कामासाठी पक्षानं माझी नियुक्ती केली होती, ते मला करता आलेलं नाही. म्हणून मी राजीनामा देत आहे, असं लिझ ट्रस यांनी राजीनामा देताना म्हटलं.
त्यांच्या अवघ्या 45 दिवसांच्या कारकिर्दीतले महत्त्वाचे टप्पे-
सर्वांत कमी कालावधीसाठी पंतप्रधान
बोरिस जॉन्सन यांनी राजीनामा दिल्यानंतर लिझ ट्रस पंतप्रधान बनल्या. 6 सप्टेंबर रोजी त्यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि आणि 45 दिवसांतच राजीनामा दिला. याआधी म्हणजेच 1827 मध्ये जॉर्ज कॅनिंग पंतप्रधान पदी असताना त्यांचा मृत्यू झाला. आणि अवघ्या 119 दिवसांच्या कालावधीत पंतप्रधान पदाची खुर्ची रिकामी पडली.
लवकरच अडचणीत
लिझ ट्रस यांच्या मंत्रिमंडळातले वित्त मंत्री क्वासी क्वार्टेंग यांनी सत्तेवर आल्यावर तिसऱ्या आठवड्यातच 45 बिलियन युरो डॉलर कपात केलेलं मिनी बजेट जाहीर केलं. पण यामुळे मोठ्या आर्थिक समस्या निर्माण झाल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. याचा परिणाम क्वार्टेंग यांना वित्त मंत्री पदावरून काढून टाकण्यात आलं.
त्यांच्याच खासदारांची टीका
ट्रस यांच्या पक्षातील खासदारांनीच त्यांना पायउतार व्हावं असं सांगितलं. त्यांच्या मंत्रिमंडळातील गृहखातं सांभाळणाऱ्या सुएला ब्रेव्हरमन यांनी राजीनामा दिला. त्यानंतर मंत्रिमंडळात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी ट्रस यांनी ग्रँट शॅप्स आणि जेरेमी हंट यांची नियुक्ती केली.
'दिलेलं वचन पूर्ण करण्यात अयशस्वी'
आपला राजीनामा सादर करताना त्या भाषणात म्हणाल्या की, "कन्झर्व्हेटिव्ह पक्षाने ज्यासाठी मला निवडून दिलं होतं त्या अपेक्षा मी पूर्ण करू शकत नाही."
पंतप्रधान पदाच्या शर्यतीत ऋषी सुनक यांना मागे टाकलं
लिझ ट्रस यांना फक्त कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या सदस्यांनी मतदान केलं. आणि 80,000 लीड घेऊन त्यांनी ऋषी सुनक यांना मागे टाकलं.
आता त्यांच्याजागी कोण ?
पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा लिडरशीपसाठी मतदान होईल. तोपर्यंत त्या पदावर कायम राहतील.
राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी नियुक्त केलेल्या शेवटच्या पंतप्रधान
राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या मृत्यूच्या काही दिवस आधी लिझ ट्रस पंतप्रधान झाल्या होत्या. ट्रस यांची नियुक्ती झाल्यानंतर 10 दिवसांतचं राणीचं निधन झालं.
अर्थतज्ज्ञ म्हणूनही केलं होतं काम
कॉलेज पूर्ण झाल्यावर त्यांनी शेल, केबल आणि वायरलेससाठी काम केलं. 2000 मध्ये त्यांनी अकाउंटंट असलेल्या ह्यू ओलेरी यांच्याशी लग्न केलं. त्यांना दोन मुली आहेत. त्या त्यांच्या कुटुंबासमवेत थेटफोर्ड, नॉरफोक येथे राहतात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)