तुम्ही टेन्शन मध्ये आहात की नाही हे आता तुमचा कुत्राही सांगू शकेल

क्वीन्स विद्यापीठातील प्रयोगादरम्यान कुत्रा.

फोटो स्रोत, Queen's University, Belfast

फोटो कॅप्शन, क्वीन्स विद्यापीठातील प्रयोगादरम्यान कुत्रा.
    • Author, व्हिक्टोरिया गिल
    • Role, विज्ञान प्रतिनिधी

कुत्रे हे मानवी भावनांशी किती सुसंगत आहेत, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.

आपल्या श्वासोच्छवासातील घाम,तणावाला कुत्रे त्यांच्या हुंगण्याच्या क्षमतेतून प्रतिसाद देऊ शकतात, असा शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे. त्यासाठी कुत्र्यांची हुंगण्याची चाचणी घेण्यात आली.

या प्रयोगात सहभागी चार कुत्र्यांना तीन सुगंधी डब्यांपैकी एकाची निवड करण्यासाठी प्रशिक्षण दिलं होतं.

700 पैकी 650 हून अधिक चाचण्यांमध्ये या कुत्र्यांनी तणावग्रस्त व्यक्तीकडून घेतलेला घाम किंवा श्वासाचा नमुना यशस्वीरित्या ओळखला आहे.

क्विन्स युनिव्हर्सिटी, बेलफास्ट येथील संशोधकांना आता आशा आहे की, प्लॉस वन जर्नलमध्ये प्रकाशित केलेलं त्यांचं संशोधन कुत्र्यांच्या प्रशिक्षणात मदत करेल.

कुत्रे वासाद्वारे त्यांचं जग अनुभवतात आणि त्यांची अतिसंवेदनशील सुगंध-शोधण्याची क्षमता याआधीच औषधं, स्फोटकं, काही प्रकारचे कर्करोग, मधुमेह आणि अगदी कोव्हिडचा आजार शोधण्यासाठी वापरली गेली.

"एखाद्या विशिष्ट वैद्यकीय परिस्थिती किंवा रोगाशी संबंधित असलेल्या माणसांकडून कुत्रे वास घेऊ शकतात, याचे पुष्कळ पुरावे आमच्याकडे आहेत. पण, कुत्रे आपल्या मानसिक स्थितितल्या बदलाबाबत वास घेऊ शकतात का, याचे पुरावे आमच्याकडे नाहीयेत," अस मुख्य संशोधक क्लॅरा विल्सन सांगतात.

या संशोधनात सहभागी सूट नावाचा कुत्रा

फोटो स्रोत, Queen's University, Belfast

फोटो कॅप्शन, या संशोधनात सहभागी सूट नावाचा कुत्रा

या प्रयोगादरम्यान, अवघड गणित सोडवण्याआधी आणि नंतर 36 मानवी स्वयंसेवकांनी त्यांच्या तणावाची पातळी नोंदवली.

यात, गणित सोडवण्याआधी घामाचा वास किंवा श्वास घेण्याची प्रक्रिया याच्यातून कुत्र्यांना हे कळू शकतं. किंवा गणित सोडवल्यानंतर ह्दयाची ठोके किंवा रक्तदाब वाढला की कुत्रा ते ओळखू शकतो, हे दिसून आलं.

आणि जर हे कुत्रे, ट्रेओ, फिंगल, सूट आणि विन्नी, तणावग्रस्त नमुन्यासमोर बसले किंवा स्थिर उभे राहिले तर त्यांना त्याबाबत खास भेटही देण्यात आली.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)