राणी एलिझाबेथ द्वितीय यांना आज अंतिम निरोप

राणी एलिझाबेथ, राजघराणं, कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

2000 पाहुणे, 500 विदेशी पाहुणे, 4000 हून अधिक कर्मचारी आणि जगभरात अब्जावधी माणसं ऑनलाईन माध्यमातून राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या अंतिम सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या या अंत्यंसस्कार कार्यक्रमाच्या आयोजनाची तुलना 21व्या शतकातील अन्य कोणत्याही कार्यक्रमाशी होऊ शकत नाही.

जगभरातून आलेले राजे, राजकुमार-राजकुमारी, राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान हे सगळं लंडनमध्ये जमले आहेत. हे सगळे वेस्टमिन्स्टर एबे इथे होणार असलेल्या महाराणींच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहेत.

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू राणी यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित आहेत.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीस, न्यूझीलंडचे पंतप्रधान जेसिंडा अर्डेन, कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो हे अंत्यसंस्कार सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचं शनिवारी लंडनमध्ये आगमन झालं. फर्स्ट लेडी जिल बायडन यांच्याबरोबरीने ते अंत्यसंस्कार सोहळ्याला हजर असतील.

आयर्लंड, जर्मनी, इटलीसह फ्रान्सचे राष्ट्राध्यक्षही अंत्यसंस्कार सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांनाही अंत्यसंस्कार सोहळ्यासाठी निमंत्रण पाठवण्यात आलं. काही खासदारांना या निर्णयावर टीका केली. चीनने उगर मुस्लिमांना दिलेल्या वागणुकीमुळे नाराजी ओढवून घेतली होती. दरम्यान चीनचे उपराष्ट्राध्यक्ष वांग क्विशान अंत्यसंस्कार सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

सौदी अरेबियाचे राजे मोहम्मद बिन सलमान यांनाही या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं होतं. पण ते कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे.

सीरिया, व्हेनेझुएला, अफगाणिस्तान या देशांच्या प्रतिनिधींना अंत्यसंस्कार सोहळ्याचं निमंत्रण पाठवण्यात आलेलं नाही.

राणी एलिझाबेथ द्वितीय, युके

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, व्लादिमीर पुतिन

रशिया, बेलारुस आणि म्यानमार या देशांनाही निमंत्रण देण्यात आलेलं नाही. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून युके आणि रशिया यांच्यातले संबंध दुरावले आहेत.

रशियाने युक्रेनवर आक्रमण करण्यासाठी बेलारुसच्या भूमीचाही वापर केला होता. त्यामुळे बेलारुसच्या प्रतिनिधींना अंत्यसंस्कार सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलेलं नाही. म्यानमारमध्ये लष्करी बंड झाल्यापासून युकेने संबंध कमी केले आहेत.

उत्तर कोरिया आणि निकाराग्वा यांना अंत्यसंस्कार सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे पण त्यांच्यातर्फे राजदूत उपस्थित राहणार आहेत.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन राणी यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार नसल्याचं त्यांच्या प्रवक्त्याने स्पष्ट केलं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)