बगदाद : इराकमध्ये धर्मगुरूने राजकारण सोडल्यानंतर हिंसा, आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू

मुक्तदता-अल-सदर

फोटो स्रोत, REUTERS/ALAA AL-MARJANI

फोटो कॅप्शन, मुक्तदता-अल-सदर

इराकी फौजा आणि शिया धर्मगुरू समर्थकांचा संघर्ष सोमवारी टोकाला पोहोचला आणि या संघर्षात आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे.

मुक्तदता-अल-सदर यांचे समर्थक असलेल्या आंदोलकांनी राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानावर हल्ला केला. त्यातही अनेक लोक जखमी झाले आहेत.

सदर यांनी राजकारणातून संन्यास घेतल्यावर हा हिंसाचार उफाळून आला आहे.

इराकच्या काळजीवाहून पंतप्रधानांनी शांततेचं आवाहन केलं आहे. अनेक शहरात हिंसाचार उफाळून आल्यावर संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

सोमवारी रात्री इराकच्या रस्त्यावर हिंसाचार उफाळून आला. आंदोलकांनी हवेत गोळीबार केला. गेल्या काही काळातला हा सगळ्यांत मोठा हिंसाचार आहे.

ज्या ठिकाणी बहुतांश शासकीय अधिकाऱ्यांची घरं आहेत, त्याच ठिकाणी हा हिंसाचार झाला. या परिसराला ग्रीन झोन असं म्हणतात.

संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर यांचे समर्थक आणि इराकी सैन्यांमध्ये हा संघर्ष झाला. यातील काही लोकांनी अत्याधुनिक शस्त्र वापरल्याचं सोशल मीडियावरील व्हीडिओवरून दिसत आहे. त्यात रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेडचाही समावेश आहे.

इराणने इराकला लागून असलेली सीमा बंद केली आहे तर कुवैतने त्यांच्या नागरिकांना देश सोडण्याचं आवाहन केलं आहे.

सदर यांच्या 15 समर्थकांची हत्या झाली आहे तर 350 आंदोलक जखमी झाल्याची बातमी AFP या वृत्तसंस्थेने दिली आहे.

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस ओंटोनिओ ग्युट्रेस यांच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की त्यांना या घटनेची माहिती मिळाली आहे आणि परिस्थिती निवळण्यासाठी पावलं उचलण्याचे आदेश दिले आहेत.

काळजीवाहून पंतप्रधान मुस्तफा- अल काधिमी हे इराकचे काळजीवाहू पंतप्रधान आहेत आणि सदर यांचे निकटवर्तीय आहे. त्यांनी कॅबिनेटच्या बैठका रद्द केल्या आहेत.

कामिधी यांनी देशातील महत्त्वाच्या धर्मगुरूंना या परिस्थितीत मध्यस्थी करायला सांगितली आहे. तसंच हिंसाचार थांबवण्यासाठी मदत करण्याचं आवाहन केलं आहे.

इराक

फोटो स्रोत, Getty Images

सदर यांच्या ज्येष्ठ सहकाऱ्यांनी इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेला सांगितलं की त्यांनी हा हिंसाचार थांबेपर्यंत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.

सदर यांनी राजकीय आयुष्यातून संन्यास घेतल्यामुळे या हिंसाचाराला सुरुवात झाली आहे. इराकच्या राजकीय व्यवस्थेत बदल घडवण्यासाठी शिया नेत्यांनी विरोध केला. त्याचा विरोध म्हणून सदर यांनी हे पाऊल उचललं.

गेल्या ऑक्टोबरमध्ये झालेल्या निवडणुकीत सदर यांच्या समर्थकांनी सर्वांत जास्त जागा जिंकल्या होत्या. मात्र सरकार स्थापनेसाठी त्या अपुऱ्या पडल्या. तेव्हापासून त्यांनी शिया समर्थकांशी कोणत्याही प्रकारची तडजोड करण्यास नकार दिला. त्यामुळे साधारण एक वर्ष इराकमध्ये राजकीय अस्थिरता आहे.

सदर हे इराकमधील महत्त्वाच्या व्यक्तींपैकी एक आहे. काळ्या रंगाचा फेटा, खोल डोळे आणि धष्टपुष्ट शरीर ही त्यांची ओळख आहे. इराकमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे, वीजेची मोठी समस्या आणि बेरोजगारी तिथे आहे. या समस्येशी झुंजणाऱ्या सर्व लोकांचं मन त्यांनी जिंकलं आहे.

सदर यांनी हा निर्णय कळवताना एक निवेदन जारी केलं आहे. ते म्हणतात, "मी आता राजकारणात हस्तक्षेप थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. मी निवृत्ती जाहीर करत असून माझ्या सर्व संस्था बंद करत आहे." त्यांच्याशी निगडीत काही संस्था मात्र खुल्या राहतील.

48 वर्षीय सदर गेल्या दोन दशकांपासून सार्वजनिक आणि राजकीय आयुष्यातले महत्त्वाचे नेते आहे. त्यांच्या मेहंदी सेनेने अमेरिकेविरुद्ध आणि इराकी सरकारविरुद्ध मोठा लढा दिला. त्याची परिणती सद्दाम हुसैन यांचं सरकार पडण्यात झाली होती.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)