16व्या शतकात समुद्रात बुडालेल्या जहाजात सापडलं सोनं, चांदी, नीलम आणि बरंच काही...

फोटो स्रोत, Allen Exploration
4 जानेवारी 1656 च्या रात्री स्पेनचं जहाज 'अवर लेडी ऑफ वाँडर्स'च्या डेकवर शांतता होती. मध्यरात्रीचा प्रहर होता. समुद्राची गाज आणि सळसळणाऱ्या वाऱ्याचा आवाज रुंजी घालत होता. पण काही सेकंदात सगळं बदललं.
जिझस मारिआ डि ला लिम्पिआ कन्सेपसिऑन या जहाजावरून चांदीचा मोठा साठा गोळा करून हे जहाज स्पेनच्या दिशेने निघालं होतं. आताचं इक्वेडोर आहे तिथे हे जहाज बुडालं होतं.
वाटचाल करताना 'न्युइस्त्रा सेनोरा डी ला कन्सेपिअन' जहाजात एक तांत्रिक चूक झाली आणि हे जहाज अवर लेडी ऑफ वाँडर्सला जाऊन धडकलं. अवघ्या अर्ध्या तासात हे जहाज अटलांटिक महासागराच्या तळाशी विसावलं. 650 जणांचा ताफा या जहाजावर होता, त्यापैकी फक्त 45 जणांचा जीव वाचला.

फोटो स्रोत, Allen Exploration
गेली चार दशकं हे जहाज पाण्यातलं थडगं बनून राहिलं आहे. बहामाच्या किनाऱ्यापासून 70 किलोमीटरवर हे जहाज समुद्राच्या तळाशी विसावलं आहे.
अनेक मोहिमांनी या जहाजावरची संपत्ती खरडवून काढण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये जतनकार आणि पाण्यात काम करणारे पुरातत्वशास्त्रज्ञांनी चिकाटीने काम करत समुद्राखालच्या या सोन्याचा खजिना जगासमोर आणला आहे.
हा सगळा खजिना बहामातल्या मॅरिटाईम म्युझियमच्या माध्यमातून पहिल्यांदाच जगासमोर खुला होणार आहे.
माव्हार्लिस हा बहामाच्या मॅरिटाईम इतिहासाचा गौरवशाली भाग आहे, असं कार्ल अलन यांनी सांगितलं. अलन हे उद्योगपती आहेत तसंच समाजधुरीण आहेत आणि अलन एक्सप्लोरेशन या कंपनीचे संस्थापक आहेत. समुद्राच्या उदरात गुडूप झालेला हा खजिना हुडकण्याचं कठीण काम या कंपनीने केलं आहे.
या जहाजाच्या अवशेषांमध्ये बरंच काही दडलं आहे. अनेक मौलिक गोष्टी 17व्या आणि 18व्या शतकात स्पॅनिश, इंग्रजी, फ्रेंच, डच, अमेरिकन आणि बहामा यांनी हाती घेतलेल्या मोहिमांमध्ये सापडल्या आहेत.
प्रकल्पाचे मरिन पुरातत्वशास्त्रज्ञ जेम्स सिनक्लेअर यांनी या जहाजाने हरिकेनचाही सामना केलेला असू शकतो याकडे लक्ष वेधलं. पण अजूनही या जहाजात बरंच काही शिल्लक आहे असा मोहिमांमध्ये सहभागी झालेल्या चमूंना विश्वास आहे.

फोटो स्रोत, Allen exploration
म्युझियमने दिलेल्या माहितीप्रमाणे अलीकडे हाती घेण्यात आलेल्या मोहिमेत सोन्यांचं एक पेंडंट आढळलं आहे. त्यावर क्रॉस ऑफ सँटियागो म्हणजे ख्रिस्ती धर्मातील संत जेम्स यांचा क्रॉस (ख्रिश्चन लोकांचं धार्मिक चिन्ह) आहे.
दुसऱ्या एका दागिन्यावर तशाच स्वरुपाचा क्रॉस एका कोलंबियन पाचूवर जडवलेला दिसतो. बाहेरची फ्रेम 12 पाचूंनी सुशोभित होती.
ही महिरप प्रेषितांचे प्रतिनिधित्व करणारी होती. या सगळ्यातून हे स्पष्ट होतं धार्मिक आणि लष्करी महत्त्वाचं अशी ऑर्डर ऑफ सँटियागो जहाजावर होती. स्पेन आणि पोर्तुगालमध्ये हे सापडलं होतं.

फोटो स्रोत, Allen Exploration
पोर्तुगीज खलाशी वास्को दी गामा हा भारतात येणारा पहिला युरोपियन होता. वास्को दी गामाने 1502 ते 1503 मध्ये 21 जहाजांच्या आरमाराची कमांड घेतली तेव्हा त्याने ऑर्डरच्या 8 नाईट्ससह प्रवास केला.
अन्य गोष्टींमध्ये सुवर्ण आणि चांदी नाणी, नीलम, 1.8 मीटर सोन्याची साखळी आणि 34 किलो वजनाची चांदीची पट्टी हेही सापडलं आहे.
अॅलन आणि त्यांच्या चमूने मोहिमेदरम्यान फक्त खजिनाच शोधला असं नाही. या मोहिमेतील मंडळींनी जहाजाचे शेवटचे असे अवशेष मिळवले. अजस्र जहाजाचं संतुलन करणारी दगडी गिट्टी, लोखंडी नांगर मिळालं आहे. अॅस्ट्रोलेब नावाचं कांस्यांचं उपकरण सापडलं आहे जे जहाजाच्या योग्य वाटचालीसाठी आवश्यक होतं.
जहाजाच्या मंडळींनी वापरलेले जार, प्लेट्स आणि वाइनच्या बाटल्या हेही मोहिमेतली मंडळींनी मिळवलं आहे.
बहामाचं महत्त्व
बहामाच्या मॅरिटाईम म्युझियमने व्यक्त केलेल्या इच्छेनुसार हा सगळा ठेवा बहामातच राहावा असं म्हटल्याचं अॅलन एक्सप्लोरेशनने सांगितलं.

फोटो स्रोत, Allen Exploration
समुद्रावर बेतलेला देश म्हणजे बहामा. बहामा आणि समुद्र यांच्या नात्याबद्दल किती अपुरी माहिती आहे, असं म्युझियमचे संचालक मायकेल पेटमन यांनी सांगितलं.
ल्युकान हे मूळ रहिवासी बहामात 1300 वर्षांपूर्वी स्थिरावले. त्यांची 50,000 लोकांच्या गटाला स्पेनने जबरदस्तीने बाहेर काढलं असावं. व्हेनेझुएलात मोत्यांच्या शोधात त्यांना पिटाळलं. तीन दशकात ही सगळी मंडळी नामशेषच झाली, असं त्यांनी सांगितलं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








