काबूलमध्ये गुरुद्वारात शक्तिशाली स्फोट; 30 लोक अडकल्याची भीती

अफगाणिस्तानची राजधानी काबूल इथे प्रसिद्ध गुरुद्वारा करते परवान परिसरात शनिवारी शक्तिशाली स्फोट झाल्याचं वृत्त आहे. हा हल्ला कोणी केला यासंदर्भात माहिती समजू शकलेली नाही. इस्लामिक स्टेटच्या कट्टरतावाद्यांनी हा हल्ला केला असण्याची शक्यता आहे.

अफगाणिस्तानच्या गृह मंत्रालयाचे प्रवक्ते तकूर यांच्या मते, गुरुद्वारा परिसरात कार बॉम्बच्या माध्यमातून हल्ला करण्यात आला. हल्ल्यानंतर परिसरात धूर आणि धुळीचे लोट पाहायला मिळाले.

गुरुद्वारा परिसरात 30 लोक अडकले आहेत अशी माहिती गुरुद्वाराचे अध्यक्ष गुरनाम सिंह यांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेला दिली.

या हल्ल्यात जीवितहानीचं स्वरुप स्पष्ट झालेलं नाही. तालिबान प्रशासन गुरुद्वारा परिसरात कोणालाही प्रवेश करू देत नसल्याचं गुरनाम यांनी सांगितलं.

दरम्यान, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने या हल्ल्याची तातडीने दखल घेतली आहे.

"काबूलमध्ये शीखधर्मीयांच्या पवित्र अशा गुरुद्वारात हल्ल्याचे वृत्त आहे. आम्ही या हल्ल्याने चिंतित आहोत. आम्ही परिस्थितीचा सातत्याने आढावा घेत असून," ठोस माहितीच्या प्रतीक्षेत आहोत, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बगाची यांनी म्हटलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)