चीनमध्ये जिवंत कोव्हिड पेशंटला चक्क प्लॅस्टिकच्या बॅगेत गुंडाळलं तेव्हा...

शांघाय

फोटो स्रोत, Getty Images

एका वृद्ध पेशंटला मृत समजून प्लॅस्टिकच्या बॅगेत भरल्याची घटना शांघायमध्ये घडली आहे. यावरून चार अधिकांऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे.

रविवारी यासंबंधी व्हीडिओ व्हायरल झाले. शवागारातले दोन कर्मचारी एक मृतदेह प्लॅस्टिकमध्ये गुंडाळून एका गाडीत ठेवत होते.

नंतर हे कर्मचारी ती बॅग उघडताना दिसतात. त्यातला एक माणूस म्हणतो की अरे हा माणूस जिवंत आहे.

ही घटना चीनच्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आणि लोकांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली.

शांघायमधील प्रशासनाने या घटनेला दुजोरा दिला आहे. जेव्हा या रुग्णाला दाखल केलं तेव्हा त्याची प्रकृती स्थिर होती.

या घटनेनंतर पाच अधिकारी आणि एक डॉक्टरच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

पेशंटची ओळख अद्याप पटलेली नाही.

लोकांनी ऑनलाईन पद्धतीने या घटनेचा निषेध केला आहे. इथली शासकीय वाहिनी हु झिजिंगचेच्या माजी मुख्य संपादकांच्या मते ही कामातली अशक्य हयगय आहे. यामुळे एक रुग्ण मरता मरता वाचला आहे.

सोशल मीडियावर एका दुसऱ्या युझरने ही शांघायमध्ये होत असलेल्या गोंधळांचं द्योतक असल्याचं म्हटलं आहे.

शांघाय हे चीनमधलं सगळ्यांत मोठं शहर आहे. तिथली लोकसंख्या 2.5 कोटी आहे. तिथे लॉकडाऊनचा सहावा आठवडा आहे. मार्च पासून इथल्या कोव्हिड केसेसमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

विनाकारण घराबाहेर पडायला शांघायमध्ये मनाई आहे. कोव्हिडच्या रुग्णांना आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना प्रशासनातर्फे चालवलेल्या कोव्हिड सेंटरमध्ये पाठवण्याची सक्ती आहे. लोकांनी तिथे बळजबरीने नेतानाचे व्हीडिओसुद्धा व्हायरल झाले आहेत.

शांघायचं प्रशासन लाटेवर नियंत्रण मिळवण्यात अपयशी आहे हे याबदद्ल बीबीसीने वार्तांकन केलं आहे.

इतर जगातून कोरोना ओसरत असताना चीनला अजूनही या विषाणूवर नियंत्रण मिळवण्यात अपयश येत आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)