You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Climate Change : लिथियम बॅटरीच आता आपलं भविष्य तारणार का?
कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण मिळवण्यासंदर्भात जगभरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. पृथ्वीचं तापमान आणखी वाढू नये यासाठी आंतरराष्ट्रीय हवामान परिषदांमध्ये नवी लक्ष्यं आखण्यात येत आहेत. सगळ्या देशांची यासंदर्भात खलबतं सुरू असताना लिथियम बॅटरी आशेचा किरण ठरू शकते.
2019 मध्ये लिथियम आयन बॅटरीला रसायनशास्त्राचं नोबेल मिळालं होतं. जीवाश्म इंधनांपासून मुक्तीचं हत्यार म्हणून पाहिलं जात आहे.
1991 मध्ये व्यावसायाला सुरुवात करणाऱ्यांसाठी ही कामगिरी वाईट नाही. लिथियम आयन बॅटरी 1991 मध्ये कॅमकॉर्डरमध्ये वापरण्यात आली होती.
त्यावेळी कॅमेऱ्याचा शोध क्रांतिकारी मानला गेला. वजनाला हलकं आणि त्यामध्ये बसवण्यात आलेल्या शक्तिशाली रिचार्ज करता येऊ शकेल अशी बॅटरी हे त्याचं गुणवैशिष्ट्य आहे.
यानंतर लिथियम आयन बॅटरीचा वापर अनेक गोष्टींमध्ये होऊ लागला. मोठमोठाल्या पॉवर टूल्स पासून टूथब्रशपर्यंत लिथियमचा वापर होऊ लागला.
लिथियम बॅटऱ्यांमुळे स्मार्टफोन ते इलेक्ट्रिक गाड्या यांचं अस्तित्व प्रत्यक्षात साकारू शकलं. आपल्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग असलेल्या मोबाईल फोनचा लिथियम बॅटरी कळीचा आहे. आता लिथियम बॅटरीला क्लायमेट हिरो म्हटलं जाऊ लागलं आहे.
लिथियम बॅटरी
1800 मध्ये लिथियम बॅटरीचा शोध लागला. पहिली इलेक्ट्रिक कार 1800 मध्येच बनली होती. कंबशन इंजिन बाजारात आल्याने इलेक्ट्रिक कार झाकोळली गेली.
पण आता जगभरात सगळीकडे कार्बन उत्सर्जन नियंत्रणात आणण्यासाठी जोरदार मोहीम सुरू झाली आहे. त्यामुळे लिथियम बॅटरी चर्चेत आहे.
जगभरात जेवढं कार्बन उत्सर्जन होतं त्याच्या एक चतुर्थांश गाड्यांच्या उत्सर्जनातून बाहेर पडतं. वायू आणि सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीजनिर्मितीचे पर्याय उपलब्ध झाल्यास कार्बन उत्सर्जन मर्यादित होऊ शकतं.
जगभरातील विविध देशांनी लिथियम बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या वापरायला सुरुवात केली तर वातावरणात पसरणारा अब्जावधी कार्बन डाय ऑक्साइड रोखला जाऊ शकतो.
जैवइंधनांची ताकद
जगभरात एक कोटी इलेक्ट्रिक गाड्या धावत आहेत. या दशकाच्या अखेरीपर्यंत... गाड्या रस्त्यावर असतील. यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणावर बॅटऱ्या लागतील.
लिथियम बॅटरीचे निर्माते जगभरात खंडप्राय असे प्लांट उभारत आहेत. असे प्लांट केवळ इलेक्ट्रिक गाड्यांसाठी नव्हे तर लिथियम बॅटरीचा वापर होत असलेल्या प्रत्येक उपकरणासाठी मदतगार ठरू शकतं.
तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगपती एलॉन मस्क यांनी सांगितलं की जगभरात 100 गिगा फॅक्टऱ्या तयार झाल्या तर घरापासून गाडीपर्यंत सगळं सौरऊर्जेवर चालू शकेल.
हे चित्र प्रत्यक्षात साकारण्यासाठी काही वर्ष प्रतीक्षा करावी लागेल. पण हे खरं की ज्यावेळी सूर्य तळपत नसेल, वारा नसेल, त्यावेळी लिथियम आयन बॅटरीद्वारे ऊर्जेचं संवर्धन होऊ शकतं.
यामुळे जीवाश्म इंधनांच्या अस्तित्वाला नख लागू शकतं.
क्लिन एनर्जी हार्वेस्टिंग
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकं चालवताना लिथियम आयन बॅटरीचा उपयोग सढळहस्ते होतो. हे सूर्याच्या उष्णतेनं चार्ज होतं. बिहारमधल्या एका गावात 2014मध्ये या माध्यमातून वीजनिर्मितीचा प्रयोग करण्यात आला होता. त्यावेळी तिथली माणसं इंधन म्हणून लाकडं, केरोसिन आणि डिझेलचा वापर करत होती.
लिथियम आयन बॅटरीशी जोडलेल्या सोलार पॅनेलमुळे गावकरी क्लिन एनर्जी अर्थात मुक्त ऊर्जेचा अनुभव घेत आहेत.
न्यूयॉर्कजवळच्या ब्रुकलिन शहरात लिथियम आयन बॅटरी, सोलार पॅनेल, कन्हव्हर्टर आणि स्मार्ट मीटरच्या माध्यमातून लोक आजूबाजूच्या भागातील मायक्रो ग्रिड क्लिन एनर्जी हार्वेस्टिंग, स्टोरेज आणि वितरण करतात.
नव्या पायाभूत व्यवस्थेची आवश्यकता
मोठ्या प्रमाणावर क्लिन एनर्जी हवी असेल तर तेवढ्याच पातळीवर नव्या पायाभूत व्यवस्थांची गरज आहे. आपल्याला नव्या मोठ्या आणि छोट्या इलेक्ट्रिक गाड्यांसाठी चार्जिंग पॉइंट्सची आवश्यकता भासेल.
अन्य काही आव्हानंही समोर आहेत. लिथियम काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भूगर्भातून पाणी बाहेर काढावं लागतं.
खारं पाणी बाष्पीभवनाकरता सोडून दिलं जातं. यामुळे पाण्याची टंचाई जाणवू शकते. यातून धोकादायक कचराही तयार होतो.
दुसरं आव्हान कोबाल्टचं आहे. लिथियम आयन बॅटरी या एकाच धातूवर अवलंबून आहे. जगभरातील 70 टक्के कोबाल्ट आफ्रिकेतील कांगो या देशात मिळतं. मात्र तिथे कोबाल्टाच्या खाणींमध्ये धोका आहे.
कोबाल्ट खूप महाग असतं. पण तरीही कांगो हा जगातल्या गरीब देशांपैकी एक आहे. लिथियम आयर्न बॅटरी सदैव असू शकत नाही. केवळ पाच टक्के बॅटऱ्या पुन्हा वापरता येऊ शकतात.
शेकडो टन बॅटऱ्या टाकून दिल्या जातात. बॅटरी तुटली तर जमिनीखाली आगही लागू शकते.
पुढच्या काही दशकांमध्ये बॅटरी विकसित करणाऱ्यांना या आव्हानांचा सामना करावा लागतो. बॅटरी रिसर्च हे एक रोमांचकारी क्षेत्र आहे. जसजसे नव्या धातूंचे पर्याय समोर येत आहेत तसतसे कोबाल्टला पर्याय तयार होत आहेत. लिथियम आयर्नसाठी या धातूवरचं अवलंबत्व कमी होत जाईल.
तूर्तास हे मोठ्या प्रमाणावर होत नाहीये पण रिसायकलिंग अर्थात पुनर्वापर वाढला आहे.
सिंगापूरमधला एक प्लांट दिवसाला 2 लाख 80 हजार बॅटऱ्यांचं तांबे, निकेल, लिथियम आणि कोबाल्ट पावडरमध्ये रुपांतिरत करतो. 90 टक्क्यांपर्यंत रिकव्हरी रेट आहे. वेगाने चार्ज होणारी लिथियम बॅटरी हे नव्या जगाचं भविष्य आहे. अशी बॅटरी अधिक ऊर्जेची आणि हजारो सायकल चार्ज करणारी असेल.
लिथियम आयन तंत्रज्ञान विकसित करण्यासंदर्भात जगभरात जोरदार द्वंद्व रंगलं आहे. अब्जावधी डॉलर रुपये वाचवायचे असतील तर लिथियम बॅटरीचा वापर क्रांतिकारी ठरू शकतो.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)