You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पोटाचा कॅन्सरः विष्ठेची तपासणी करुन स्वादुपिंडाचा कर्करोग पहिल्या टप्प्यातच शोधता येणं शक्य
संशोधकांच्या म्हणण्यानुसार, स्टूल टेस्ट ही सुरुवातीच्या टप्प्यातील पॅनक्रीयाटीक कॅन्सर अर्थात स्वादुपिंडाचा कर्करोग शोधण्यासाठी महत्त्वाची टेस्ट ठरू शकते.
या संशोधकांनी 136 स्वयंसेवकांवर या संकल्पनेचा प्रयोग करून पाहिला.
त्यातून निघालेले निष्कर्ष हे गट नावाच्या जर्नल मध्ये प्रसिद्ध करण्यात आले. यात आतड्यात असणारे काही विशिष्ट प्रकारचे सूक्ष्मजीव त्या ठिकाणी ट्यूमर असल्याचा इशारा देतात.
स्वादुपिंडाचा कर्करोग जेव्हा होतो तेव्हा सुरुवातीच्या टप्प्यात याची काहीच लक्षणे दिसून येत नाहीत. मात्र जेव्हा लक्षणे दिसून येतात तेव्हा परिस्थिती अधिक गंभीर झालेली असते आणि त्यावर उपचार करणं कठीण होऊन बसतं.
आता हा कॅन्सर जसजसा वाढत जातो तसतसं काही अस्पष्ट लक्षण ही दिसू लागतात. यात मग अपचन असेल, शौचाला जाण्याच्या सवयी, पोट किंवा पाठदुखी असे अनेक बदल होतात. काही लोक निदान होण्यापूर्वी साध्या प्रॅक्टिशनर डॉक्टरांकडे जातात. त्यामुळे अंदाज येत नाही.
सध्या या कॅन्सरचा सर्वात सामान्य प्रकार म्हणजेच डक्टल एडेनोकार्सिनोमा झालेल्या 20 पैकी एक रुग्ण पाच वर्षे किंवा त्याहून अधिक काळ जगण्याची शक्यता असते. मात्र या कॅन्सरचे निदान वेळीच झाले तर ती रुग्ण दगावण्याची शक्यता कमी होते.
हा अभ्यास करणाऱ्या स्पॅनिश टीमने माद्रिद आणि बार्सिलोना अशा दोन हॉस्पिटलमधील रुग्णांची निवड केली. यात काही रुग्णांना फक्त स्वादुपिंडाचा एडेनोकर्किनोमा होता. तर काहींना तुलना करण्यासाठी म्हणून निवडण्यात आले होते.
संशोधकांनी या रुग्णांच्या गटांमध्ये काही फरक आढळतो का? हे पाहण्यासाठी त्यांच्या थुंकीचे आणि स्टूलचे नमुने गोळा केले आणि त्यांचे विश्लेषण केले.
थुंकीच्या नमुन्यात जर काहीच दिसून आलं नाही, तर स्टूलच्या नमुन्यांमध्ये फरक दिसून आला. या फरकामुळे स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे निदान व्हायला मदत होऊ शकते असं टीमला वाटतं.
आतड्यात असणारे जीवाणू, बुरशी आणि इतर सूक्ष्मजीवांचा हा एक वेगळा नमुना किंवा मग वेगळा जीनोमिक प्रोफाइल आहे.
संशोधकांचे म्हणणे आहे की, कॅन्सरच्या सुरुवातीच्या टप्प्यात आतड्यात वैशिष्ट्यपूर्ण मायक्रोबायोम आढळतात. स्टूल मायक्रोबायोम या सुरुवातीच्या टप्प्यातील मायक्रोबायोम ओळखू शकतात आणि त्यामुळे कॅन्सरच्या कोणत्याही टप्प्याची माहिती मिळते
तरी ही यावर आणखीन विस्ताराने अभ्यास झाला पाहिजे अशी शिफारस संशोधक करतात. यावर काही अभ्यास आधीच झाला आहे.
जर्मनीतील स्वतंत्र अभ्यास करणाऱ्या संशोधकांनी अशा कॅन्सरच्या रुग्णांमध्ये आढळलेल्या नमुन्यांचे निष्कर्ष जमा केले आहेत. जपानमध्ये देखील या कॅन्सरवर संशोधन सुरू आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)