उद्ध्वस्त घरं, राख, मातीचा ढीग; युक्रेनचं विदारक चित्र दाखवणारे 7 फोटो

फोटो स्रोत, Getty Images
रशियन क्षेपणास्त्रं मागच्या काही दिवसांपासून युक्रेनमधील शहरांना सातत्याने लक्ष्य करत आहे. या हल्ल्यांमुळे युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. या फोटोंमधून युक्रेनमध्ये रशियन आक्रमणापूर्वी आणि आक्रमणानंतरची विदारक स्थिती दिसते आहे. युक्रेनची राजधानी कीव्ह पासून रशियन सैन्य काही अंतरावर असतानाच अनेक प्राणघातक हवाई हल्ले करण्यात आले. गेल्या शनिवारी पहाटे शहरातील इमारतीवर रशियाने क्षेपणास्त्रं डागली.

मागील आठवड्यापासून इरपिन हे छोटे शहर रशियन आणि युक्रेनियन सैन्याच्या लक्ष्यस्थानी आले आहे. अर्पिन कीव्हच्या वायव्येला फक्त 20 किमी (12 मैल) अंतरावर आहे.

तोफा आणि हवाई हल्ल्यांमुळे या भागाचं भीषण नुकसान झालं आहे. फोटोत दिसत असलेलं निवासी क्षेत्र या हल्ल्यात जवळजवळ नष्ट झालं आहे.खारकीव्ह हे युक्रेनमधील दुसरं महत्वाचे आणि मोठं शहर आहे. हे शहर मागील अनेक दिवसांपासून रशियन सैन्यानं केलेल्या हवाई हल्ल्यांचा केंद्रबिंदू ठरलं आहे. या हल्ल्यांमुळे शहराच्या मध्यवर्ती भागात खूप नुकसान झालं आहे.


युक्रेनियन अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी शहरातील निवासी भागात अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या घटनेचा संयुक्त राष्ट्रांतर्फे संभाव्य युद्ध गुन्हा म्हणून तपास सुरू आहे. कीव्हच्या वायव्येस 60 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बोरोद्यांका शहरावर झालेल्या रशियन हवाई हल्ल्यांमुळे अनेक निवासी इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत.गुरुवारी चित्रित करण्यात आलेल्या ड्रोन फुटेजमुळे युक्रेनमध्ये झालेल्या विध्वंसाची व्याप्ती दिसून येत आहे. हल्ल्यांमुळे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेल्या इमारतींचे अवशेष अजूनही जळत आहेत. हल्ल्यांमुळे बेचिराख झालेल्या वाहनांच्या रांगा रस्त्यांवर दिसत आहेत.कीव्हच्या ईशान्येला 120 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या चेर्निहीव्ह शहरावर उत्तरेकडून आक्रमण करणाऱ्या रशियन सैन्याने अलिकडच्या दिवसांत जोरदार गोळीबार केला आहे.


अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, गुरुवारी शहरातील निवासी भागांवर झालेल्या हल्ल्यात 30 हुन अधिक लोक मारले गेले आहेत. हल्ल्यात शाळा आणि एक उच्चभ्रू वसाहत असलेल्या इमारतीचा समावेश आहे

चेर्निहाइव्हच्या अगदी उत्तरेला असलेल्या रिव्हनोपिल्या गावातून घेतलेल्या सॅटेलाइट फोटोजमध्ये विदारक दृश्य दिसत आहे. यात रशियन सैन्याने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांनंतर जळणारी घरं आणि धूर असं दृश्य टिपण्यात आलं आहे.

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








