रशिया युक्रेन वादात पाकिस्तानसह इतर इस्लामिक देश कुणाच्या पाठीशी?

व्लादिमीर पुतिन आणि इम्रान खान 2019 मध्ये एका परिषदेच्या निमित्तानं एकत्र आले होते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, व्लादिमीर पुतिन आणि इम्रान खान 2019 मध्ये एका परिषदेच्या निमित्तानं एकत्र आले होते.

युक्रेनच्या 4.49 कोटी लोकसंख्येपैकी एक ते दोन टक्के मुस्लिम आहेत. येथील बहुसंख्य लोकसंख्या ख्रिश्चन आहे. रशियाने पूर्व युक्रेनवर लष्करी कारवाई सुरू केली आहे.

रशियाच्या या कारवाईमुळे पाश्चात्य देश संतप्त झाले असून त्यांनी आतापर्यंत अनेक निर्बंध जाहीर केले आहेत. जपान आणि ऑस्ट्रेलियाही पाश्चिमात्य देशांच्या पाठीशी उभे आहेत. याशिवाय बाकीचे देश त्यांचे हित लक्षात घेऊन संतुलित विधाने करत आहेत.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

युक्रेनच्या संघर्षात प्रमुख इस्लामिक देश किंवा मुस्लिम बहुल देश कोणाच्या बाजूने आहेत ते पाहूया-

पाकिस्तान

अणुशक्ती संपन्न असलेला पाकिस्तान हा जगातील एकमेव इस्लामिक देश आहे. शीतयुद्धाच्या काळात पाकिस्तान अमेरिकेच्या गटात होता पण आता परिस्थिती बदलत आहे. विशेष म्हणजे पुतिन यांनी युक्रेनवर हल्ला करण्याचे आदेश दिले तेव्हा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान रशियात होते.

इम्रान खान यांनी दौऱ्याची चुकीची वेळ निवडल्याचं सोशल मीडियावरील अनेक विश्लेषकांचे म्हणणं आहे. इम्रान खान यांनी निवडलेली वेळ युक्रेनच्या संकटात पाकिस्तान अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आघाडीसोबत नसून रशियाच्या पाठीशी उभा असल्याचा संदेश जाईल, असं बोललं जात आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

पाकिस्तानचं इंग्रजी वृत्तपत्र डॉनने दिलेल्या वृत्तानुसार, त्यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ यांनी इम्रान खान यांच्या दौऱ्याच्या वेळेबाबतची अटकळ फेटाळून लावली आहे. युसूफ म्हणाले, "होय, जागतिक तणाव आहे पण आमचा दौरा द्विपक्षीय आहे आणि तो चीन दौऱ्यासारखाच आहे. आमच्या दौऱ्यात आर्थिक समस्यांचा समावेश आहे. आम्ही कोणत्याही एका गटात नाही."

सौदी अरेबिया

23 फेब्रुवारी रोजी संयुक्त राष्ट्रांच्या साधारणसभेत सौदी अरेबियाने रशियाची निंदा न करता राजनैतिक समाधानाबद्दल बोलले. सौदी अरेबियाने दोन्ही बाजूंना लष्करी तणाव कमी करण्याचं आवाहन केलं. माध्यमांचं लक्ष युक्रेनकडे असल्याचे बोललं जात आहे, मात्र त्यामुळे वाढत्या गॅसच्या किंमतीविषयी कुठेच बोलल्या जात नाहीये.

युक्रेनच्या संकटामुळे गॅसच्या किमती गेल्या सात वर्षांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचल्या आहेत. रशिया आणि सौदी अरेबिया यांच्यातील भागीदारी अलिकडच्या वर्षांत नाट्यमयरित्या वाढली आहे. रशिया आणि सौदी अरेबिया हे जगातील सर्वांत मोठे तेल उत्पादक देश आहेत आणि ते निर्यातीचे निर्णय नियंत्रित सुध्दा करतात.

युक्रेन-रशिया संकट, मुस्लीम देश

फोटो स्रोत, Getty Images

अमेरिका आणि सौदी अरेबियाचे संबंध पूर्वीसारखे राहिलेले नाहीत. या महिन्यात अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी सौदी अरेबियाला तेल उत्पादन वाढवण्याची विनंती केली तेव्हाही हे संकेत मिळाले. सौदीने हे केलं असतं तर केवळ महागाई आणि गॅसच्या किमती कमी होण्यास मदत झाली नसती, तर रशियाच्या फायद्यावरही नियंत्रण ठेवता आले असते. मात्र सौदी अरेबियाने याला नकार दिला.

क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या वाढत्या ताकदीचा परिणाम असा झाला आहे की सौदी आणि रशियामधील संबंध अधिक घट्ट झाले आहेत. 2015 च्या उन्हाळ्यात पुतिन आणि क्राउन प्रिन्स यांच्यातील पहिली भेट होती. त्यानंतर दोन्ही नेत्यांच्या अनेक बैठका झाल्या. बायडन अध्यक्ष झाल्यावर ते म्हणाले होते की ते फक्त त्यांच्या समकक्षांना भेटतील. क्राउन प्रिन्स सौदी अरेबियाचे संरक्षण मंत्री आहेत आणि फक्त अमेरिकेचे संरक्षण मंत्री त्यांना भेटतील.

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

द इंटरसेप्टच्या एका अहवालात, ब्रुकिंग्स संस्थेचे वरिष्ठ फेलो ब्रूस रिडेल म्हणतात, "पुतिन आणि सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स यांच्यात बरेच साम्य आहे. ते घरात किंवा घराबाहेरील विरोधकांना सहन करत नाही. दोघेही शेजारील देशांमध्ये हल्ले करतात आणि तेलाच्या किंमती शक्य तितक्या जास्त ठेवण्याचा प्रयत्न करतात. युक्रेनवरील हल्ल्यानंतर सौदी क्राउन प्रिन्ससाठी सर्वोत्तम संधी असेल. कारण तेलाची किंमत सातव्या आसमानाला भिडणार आहेत.

येमेनमध्ये अनेक वर्षांपासून लष्करी कारवाई होत असल्याने युक्रेनवर बोलण्याचा अधिकार सौदीला नाही, असा प्रश्नही अनेकजण उपस्थित करत आहेत. बुधवारी, भारताचे सुप्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी ट्वीट केले होते की येमेनमध्ये सौदी अरेबियाच्या बॉम्बहल्ल्यावर पाश्चात्य सैन्याने मौन का धारण केले आहे?

तुर्कस्तान

तुर्कस्तान हा घटनात्मकदृष्ट्या इस्लामिक देश नाही, परंतु तेथील बहुसंख्य लोकसंख्या मुस्लिम आहे. तुर्कस्तान देखील NATO चा सदस्य आहे. नाटोचे सदस्य म्हणून ते युक्रेनवरील रशियन हल्ल्याच्या पाठीशी नाहीत, तर तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन अमेरिकेवर नाराज असताना पुतिन यांच्याकडे जातात. रशियाकडून एस-400 क्षेपणास्त्र प्रणाली घेतल्याने अमेरिकेने तुर्कस्तानवर निर्बंधही लादले आहेत. बिडेन आल्यानंतर तुर्कस्तानचे अमेरिकेसोबतचे संबंध बिघडले आहेत.

तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी बुधवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा केली. तुर्कस्तानच्या राष्ट्राध्यक्षांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून या संभाषणाबाबत एक निवेदन जारी करण्यात आलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 4
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 4

या संभाषणात रशिया-युक्रेनच्या मुद्द्यावर चर्चा झाली.

अध्यक्ष एर्दोगन म्हणाले की त्यांनी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याशी संवाद साधण्यास नेहमीच महत्त्व दिले आहे, ज्याचे अनेक चांगले परिणाम मिळाले आहेत आणि ते संवाद सुरू ठेवतील.

युक्रेन-रशिया संकट, मुस्लीम देश

फोटो स्रोत, Getty Images

तुर्कस्तानने जोर दिला की ते युक्रेनच्या सार्वभौमत्वाचं आणि प्रादेशिक अखंडतेचे उल्लंघन करणाऱ्या उपायांना समर्थन देत नाही आणि त्याची भूमिका तत्त्वांवर आधारित आहे. मिन्स्क करारांतर्गत समस्या सोडवण्याचा आग्रह एर्दोगन यांनी धरला.

सध्याची परिस्थिती गुंतागुंतीची असल्याचे सांगून एर्दोगन म्हणाले, "लष्करी संघर्षाचा कोणालाच फायदा होणार नाही, त्यामुळे तुर्कस्तान राजनैतिक मार्गाने तोडगा काढण्याच्या बाजूने आहे. तणाव कमी करण्यासाठी तुर्कस्तानही भूमिका बजावण्यास तयार आहे. नाटोमध्येही तुर्की आपली सकारात्मक भूमिका बजावत राहील."

तुर्कस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांना उच्चस्तरीय सहकार्य परिषदेच्या बैठकीत उपस्थित राहण्याचं निमंत्रणही दिलं आहे.

इराण

इराण हा शिया मुस्लिम बहुसंख्य देश आहे. इराणचे अमेरिकेशी संबंध १९७९ च्या इस्लामिक क्रांतीपासून खराब आहेत. इराणचे रशियाशी चांगले संबंध आहेत.

युक्रेनच्या संकटाबाबत, इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सईद खतीबजादेह यांनी मंगळवारी सांगितलं, "इराणचे इस्लामिक प्रजासत्ताक सर्व बाजूंनी संयमाची अपेक्षा करते. तणाव वाढवणारे कोणतेही पाऊल टाळावं. सर्व पक्ष आपापसातील मतभेद संवादातून सोडवू शकतात. दुर्दैवाने, अमेरिकेने नाटोच्या हस्तक्षेपाने आणि चिथावणी देऊन या भागातील परिस्थिती गुंतागुंतीची केली आहे."

दरम्यान इराणचे रशियाशी संबंध ऐतिहासिकदृष्ट्या सौहार्दपूर्ण राहिलेले नाहीत. 1943 मध्ये, दुसऱ्या महायुद्धादरम्यान, मित्र राष्ट्रांचे नेते स्टॅलिन, चर्चिल आणि फ्रँकलिन डी. रुझवेल्ट तेहरानमध्ये भेटले. त्यावेळी इराणवर रशिया आणि ब्रिटनचा ताबा होता. तेहरान परिषदेतच मित्र राष्ट्रांनी नॉर्मंडीवर दुसऱ्या आघाडीवर हल्ला करण्याचे मान्य केले होते. 1941 मध्ये रशिया आणि ब्रिटनने तटस्थ इराणवर हल्ला केला जेणेकरून तेल पुरवठ्यात व्यत्यय येऊ नये आणि रशियन पुरवठा चालू राहील.

युएई

युक्रेनच्या प्रश्न राजनयिक चर्चेद्वारे सोडवावा, असं आवाहन संयुक्त अरब अमिरातीने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला केलं आहे. रशियाने युक्रेनच्या सार्वभौमत्वाचं उल्लंघन केल्याचं युएईनं म्हटलेलं नाही.

X पोस्टवरून पुढे जा, 5
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 5

UAE च्या अधिकृत वृत्तसंस्थेनुसार WAM, रशिया आणि UAE च्या परराष्ट्र मंत्र्यांनी बुधवारी फोनवर बोलले आणि त्यांचे संबंध आणखी मजबूत करण्याच्या गरजेवर भर दिला. युक्रेनच्या संकटाच्या वेळी दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये संबंध दृढ होण्याची चर्चा झाली आहे.

ISWOTY

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)