HIV: एड्सवर मात करणाऱ्या जगातल्या पहिल्या महिलेने कोणते उपचार घेतले?

फोटो स्रोत, Science Photo Library
अमेरिकेच्या एका रुग्णाचा असा विश्वास आहे की त्या HIV आजारातून पूर्णपणे बऱ्या होणाऱ्या जगातील पहिल्या महिला आणि तिसऱ्या रुग्ण आहेत.
एड्स-उद्भवणार्या विषाणूला नैसर्गिक प्रतिकार करू शकणाऱ्या व्यक्तीकडून स्टेम सेल उपलब्ध झाले तेव्हा या संबंधित महिलेवर ल्यूकेमियावरील उपचार सुरू होते.
ही महिला आता 14 महिन्यांपासून ए़ड्स मुक्त आहे. परंतु तज्ज्ञ सांगतात, या प्रत्यारोपण पद्धतीत अॅम्बिकल कॉड रक्ताचा समावेश होता. HIV असलेल्या रुग्णांच्या अनुरुप ही पद्धत वापरता येणं अत्यंत धोक्याचं असतं.
मंगळवारी (15 फेब्रुवारी) डेनव्हर येथे या रुग्णाची केस वैद्यकीय परिषदेत सादर करण्यात आली आणि पहिल्यांदाच ही पद्धत एचआयव्हीसाठी कार्यात्मक उपचार म्हणून वापरली गेल्याचं असल्याचं समोर आलं.
रुग्णाला तिच्या कर्करोगाच्या उपचाराचा एक भाग म्हणून नाभीसंबधीच्या रक्ताचे प्रत्यारोपण मिळाले आणि तेव्हापासून तिला एड्सच्या उपचारासाठी आवश्यक अँटीरेट्रोव्हायरल थेरपी घेण्याची आवश्यकता भासली नाही.
एड्सची लागण झालेले आणि कर्करोग किंवा इतर आजारांसाठी समान पद्धतीने रक्त प्रत्यारोपण मिळालेल्या लोकांच्या अमेरिकेतील अभ्यासाचा ही केस खूप मोठा बनली होती.

फोटो स्रोत, Getty Images
प्रत्यारोपण केलेल्या पेशींमध्ये विशिष्ट अनुवांशिक उत्परिवर्तन असते ज्याचा अर्थ त्यांना एचआयव्ही विषाणूचा संसर्ग होऊ शकत नाही. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की प्राप्तकर्त्यांची रोगप्रतिकारक शक्ती परिणामी एड्सला प्रतिकारक्षमता विकसित करू शकते.
एड्सपासून बऱ्या होण्याऱ्या या घटना खरंच उल्लेखनीय आणि आनंद साजरा करण्यासाठी एक कारण देणाऱ्या आहेत कारण आजार बरा होऊ शकतो असं या घटना सिद्ध करतात.
परंतु या पद्धतीने किंवा या दृष्टीकोनातून सर्वांवरच यशस्वी उपचार होऊ शकत नाही असंही तज्ज्ञांनी स्पष्ट केलं. हा दृष्टीकोन एचआयव्हीग्रस्त 37 दशलक्ष लोकांच्या उपचाराजवळही जात नाहीय,यापैकी बहुतेक सब-सहारान आफ्रिकेत राहतात.
स्टेम सेल प्रत्यारोपणाची क्षमता 2007 मध्ये पहिल्यांदा सिद्ध झाली. त्यावेळी टिमोथी रे ब्राऊन हे HIV पासून बरे होणारे पहिले रुग्ण होते. HIV ला नैसर्गिकरित्या प्रतिकार करणाऱ्या दात्याकडून त्यांचे प्रत्यारोपण झाले.
आतापर्यंत या पराक्रमाची केवळ दोनवेळा पुनरावृत्ती झाली आहे. एक म्हणजे अॅडम कॅस्टिलिजो आणि आता न्यू यॉर्कच्या या महिला रुग्ण.
या तिघांनाही कर्करोगाचे निदान झाले होते आणि त्यांना त्यांचे प्राण वाचवण्यासाठी स्टेम सेल प्रत्यारोपणाची आवश्यकता होती. HIV पासून बरं होणं हे त्यांचं प्राथमिक उद्दिष्ट नव्हतं आणि प्रत्येक एचआयव्हीग्रस्तांवर ही थेरपी वापरणं अत्यंत धोकादायक होतं.

फोटो स्रोत, Getty Images
अँटी-रेट्रोव्हायरल थेरपी एचआयव्ही ग्रस्त लोकांना साधारण-सामान्य आयुर्मान देते. बरं होण्याच्या मुख्य आशा लशी किंवा औषधांवर केंद्रित राहतात ज्यामुळे विषाणू शरीरातून बाहेर काढता येतात.
या महिलेच्या उपचारामध्ये अॅम्बिकल कॉड रक्ताचा समावेश होता. यापूर्वीच्या दोन केसेसमध्ये अस्थिमज्जा प्रत्यारोपणाचा भाग म्हणून रूग्णांना प्रौढ स्टेम पेशी प्राप्त झाल्या होत्या.
इंटरनॅशनल एड्स सोसायटीचे अध्यक्ष शेरॉन लेविन यांनी सावध केलं की, या प्रकरणात वापरलेली प्रत्यारोपण पद्धत ही एचआयव्हीग्रस्त बहुतेक लोकांसाठी व्यवहार्य ठरणार नाही.
त्या पुढे असंही सांगतात, "HIV बरा करणं शक्य आहे हे यामुळे सिद्ध होतं आणि जीन थेरपी एक व्यवहार्य रणनीती म्हणून पुढे येऊ शकते."
या संपूर्ण प्रकरणाची केस स्टडी अद्याप जर्नलमध्ये प्रकाशित होणं बाकी आहे. त्यामुळे या उपचार पद्धतीत व्यापक वैज्ञानिक दृष्टीकोन किंवा समज मर्यादित आहे.

हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









