रशियाने युक्रेनवर या 3 कारणंमुळे हल्ला केला

फोटो स्रोत, EPA
- Author, अँजेल बरमुडेज
- Role, बीबीसी न्यूज मुंडो
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनमधील फुटीरतावाद्यांनी ताब्यात घेतलेल्या प्रदेशांना मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयानंतर रशियन सैन्य पूर्व युक्रेनच्या फुटीरतावादी भागात पाठवलं जाईल. या भागात ते 'शांतता राखण्यासाठी' प्रयत्न करेल, असं त्यांनी म्हटलं आहे.
युक्रेनमधील दोनेत्स्क आणि लुहान्स्क या दोन रशियन समर्थक प्रांतांना पुतिन यांनी स्वतंत्र मान्यता दिली आहे.
त्यांनी युक्रेनवर टीका करताना म्हटलं की, इथलं शासन हे पाश्चिमात्यांच्या हातातलं बाहुलं आहे आणि युक्रेन अमेरिकेची वसाहत बनला आहे.
रशियासाठी युक्रेनचं महत्त्व एवढं अधिक हा आहे, हे जाणणं गरजेचं आहे. यामागे तीन कारणं सर्वात महत्त्वाची आहेत.
1. संरक्षणाशी निगडीत परिसर
"रशिया जे धोरण अवलंबत आहे त्याचं कारण म्हणजे त्यांना त्यांच्या देशांच्या सीमेजवळ एक धोकादायक लष्करी आघाडी निर्माण होत असल्याचं दिसत आहे.
ते युक्रेनला नेटोचं सदस्य बनण्यापासून रोखण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे. तसं झाल्यास युक्रेनला नेटोच्या सदस्य देशांकडून क्षेपणास्त्र आणि सैनिकांची मदत मिळणार नाही," असं व्हर्जिनियाच्या टेक युनिव्हर्सिटीमध्ये आंतरराष्ट्रीय संबंधांचे प्राध्यापक जेरॉल्ड टॉल म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images
1812 मध्ये नेपोलियनच्या आक्रमणाच्या वेळेपासूनच युक्रेनच्या परिसरानं रशियासाठी बफर झोनच्या रुपात काम केलं आहे, असं जिओपॉलिटकल फ्युचर्सचे जॉर्ज फ्राइडमॅनम म्हणाले.
"युक्रेन रशियाच्या पश्चिम सीमेवर आहे. रशियावर दुसऱ्या महायुद्धात पश्चिमेकडून हल्ला झाला होता, त्यावेळी युक्रेनच्याच परिसरातून रशियानं स्वतःचं संरक्षण केलं होतं. तिथून रशियाची राजधानी मॉस्को 1,000 मैल म्हणजे (1,600 किलोमीटर) आहे.
जर यूक्रेन नेटोबरोबर गेलं तर मॉस्को केवळ 400 मैल (640 किलोमीटर) अंतरावर येईल. म्हणजे युक्रेन हा सुरक्षेच्या दृष्टीनं असा परिसर आहे, जो त्यांना कोणत्याही स्थितीत त्यांच्याबरोबर हवा आहे. कारण, नेपोलियननंतर या भागानं रशियाचं रक्षण केलं आहे," असंही ते म्हणाले.
रशियाचा असा समज आहे की, त्यांना शत्रुंच्या आघाडीनं चारही बाजुनं घेरले गेले आहेत. तो या महाशक्तीसाठी चिंतेचा विषय आहे.
हे संकट सुरू झाल्यानंतर रशियाचे उपपरराष्ट्र मंत्र्यांनी 1962 च्या क्षेपणास्त्र संकटाचा उल्लेख केला होता. तसंच नंतर रशियानं असं म्हटलं होतं की, ते क्युबा आणि व्हेनेझुएलामध्ये सैनिक तैनात करू शकतात.
"अमेरिकेचं स्वतःचं मुनरो डॉक्ट्रिन असून स्वतःच्या देशाभोवती शत्रूसैन्य एकवटल्यानं त्यांना काही चिंता आहेत. त्यामुळं रशियाचं असं म्हणणं योग्यच आहे, यावर जोर देण्यासाठी त्यांनी हे केलं," असं टॉल म्हणाले.
2. ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक संबंध
12 जुलै 2021 ला युक्रेनबरोबरच्या संबंधांबाबत विस्तृत लेखामध्ये व्लादिमीर पुतीन यांनी त्यांचा शेजारी देश एका धोकादायक खेळात सहभागी होत असल्याचं म्हटलं होतं. युक्रेन युरोप आणि रशियामध्ये अडथळा ठरत असल्याचं त्यांनी त्यात म्हटलं होतं.
पुतीन हे केवळ संरक्षण आणि या भागाच्या राजकारणाबाबत बोलत होते. त्याचबरोबर त्यांचा इशारा याठिकाणच्या ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक संबंधांकडेही होती. त्याच्याशी रशिया आणि युक्रेन दोघांचा संबंध आहे. त्यांनी यावर सविस्तर लिहिलं.

फोटो स्रोत, Getty Images
बेलारूस, रशिया आणि युक्रेन यांचे पूर्वस सारखेच होते असंही पुतीन यांनी लिहिलं होतं. त्यावर चर्चा करताना त्यांनी अनेक ऐतिहासिक गोष्टीबाबत लिहिलं होतं.
त्यांच्या या लिखाणामध्ये इतिहास, संस्कृती आणि ओखळ याबाबत अनेक गोष्टी होत्या.
रशिया युक्रेनचा विचार इतर देशांप्रमाणे करत नाही, असंही ते म्हणाले. त्यांच्या दृष्टीकोनातून युक्रेन हे बहुस्लाव्हिक राष्ट्र आहे. तसंच ते युक्रेन रशियाचं हृदय असल्याचं मानतात. युक्रेनबाबत हा रशियाचा अत्यंत शक्तीशाली दृष्टीकोन आहे, जो त्याच्या मूळ ओळखीमध्ये विहित आहे, असंही ते म्हणाले.
"युक्रेन देश म्हणून स्वतःची ओळख रशियाचा विरोधक म्हणून व्यक्त करत असतो, त्यामुळं रशियात तीव्र भावना व्यक्त होतात. याबाबत रशियामध्ये तीव्र संताप आणि निराशा निर्माण होते. भावानं विश्वाघात केल्यानंतर निर्माण होणाऱ्या भावनेसारखं ते आहे," असं ते म्हणतात.
जॉर्ज फ्राइडमॅन सांस्कृतिक किंवा ऐतिहासिक दृष्टीनं युक्रेनचं महत्त्व नाकारतात. रशियाची मुख्य चिंता त्यांच्या भू-राजकीय स्थितीमुळं आहे, असं ते म्हणाले.
"त्याचा इतिहास सारखाच आहे. ऐतिहासिक दृष्टीनं युक्रेनियावर रशियानं अत्याचार केलेला आहे. सोव्हिएत संघाच्या काळात त्याठिकाणी गंभीर दुष्काळ पडला होता. त्यावेळी लाखो लोकांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी त्याठिकाणी उगवलेलं धान्य रशियाला निर्यात करायचं होतं. असा परिस्थइतीत रशिया आणि युक्रेनच्या लोकांमध्ये एकतेबद्दल बोलणं म्हणजे, अगदी बिनविचारी आहे," असं ते म्हणाले.
3. पुतीन यांचा वारसा
"यूक्रेनच्या मुद्द्यावर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या वैयक्तिक भावना जोडल्या गेलेल्या आहेत," असं युरोपीयन काऊंसिल ऑन फॉरेन अफेयर्सचे विश्लेषक कादरी लीक यांनी गेल्या वर्षी एका मुलाखतीत बीबीसीशी बोलताना सांगितलं होतं. लीक म्हणाले होते की, युक्रेनबाबत रशियाचं धोरण तर्कसंगत न वाटण्याचं कदाचित हेच कारण आहे.
जेरार्ड टॉल म्हणाले की, पुतीन यांनी यूक्रेनमध्ये अनेकदा रशियाला पाठिंबा असलेल्या नेत्यांना सत्तेत आणण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांना यश आलं नाही. "एक सामान्य धारणा अशीही आहे की, पुतीन दीर्घ काळापासून या मुद्द्यावर संघर्ष करत आलेले आहे. त्यांना असं वाटतं की, हे अर्धवट काम त्यांचा वारसा ठरेल त्यामुळं त्यांना हे पूर्ण करायचं आहे," असंही टॉल म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images
"पुतिन यांच्या मते, पाश्चिमात्य देशांनी रशियाला विरोधी व्यासपीठ बनवलं आहे. त्यामुळं या समस्येवर तोडगा निघणं गरजेचं आहे," असंही ते म्हणाले.
पण टॉल, कादरी लीक यांच्याप्रमाणे युक्रेनचं संकट भावनिक दृष्टीकोनातून मांडणं जोखमेचं असल्याचं मानतात.
"अनेक तज्ज्ञ हेच करतात. मला वाटतं हा धोकादायक दृष्टीकोन आहे. या दृष्टीकोनामुळं संपूर्ण संकट पुतीन यांची नाराजी आणि रागापुरतं मर्यादीत ठरतं. त्यामुळं आपल्याला पुतीन हे वेडे वाटू लागतात. मला वाटतं ही एक चूक आहे. पुतीन यांच्या भावना वास्तविक आहेत आणि रशियाच्या भू-राजकीय संस्कृतीचा भाग आहेत. त्यामुळं रशियाच्या कोणत्याही नेत्याला या समस्येचा निपटारा करावा लागेल," असं ते म्हणाले.
तज्ज्ञांना असंही वाटतं की, पुतीन यांच्या धोरणांची ते माजी गुप्तहेर असण्याशी काही संबंध नाही. पुतीन यांच्यानंतरचं नेतृत्व नक्कीच याकडं वेगळ्या दृष्टीकोनातून बघेल, असंही त्यांना वाटतं.
पण टॉल स्पष्टपणे असं म्हणतात की, "युक्रेनबाबत रशियाच्या भावना अगदी खऱ्या आहेत. हा केवळ पुतीन यांच्या व्यक्तीमत्त्वाचा भाग आहे, असं म्हणता येणार नाही.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








