Christmas 2021 : जगभरात असं होतंय सेलिब्रेशन

जगभरामध्ये अत्यंत उत्साहामध्ये आज नाताळ (ख्रिसमस) साजरा केला जात आहे. संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणारा हा उत्सव आहे.

यंदा सलग दुसऱ्या वर्षीदेखील नाताळावर कोरोनाचं सावट आहे. अनेक ठिकाणी चर्चमध्ये कमी प्रमाणात लोकांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र तरीही गेल्यावर्षीच्या तुलनेत अधिक उत्साह यावर्षी पाहाला मिळत आहे. जगभरातील या उत्सवाची झलक आपण काही फोटोंच्या माध्यमातून पाहणार आहोत.

तैवानच्या तैपेईमध्ये फूटब्रिजवर अत्यंत सुंदर अशी रंगीत फुलांजी सजावट केलेली पाहायला मिळत आहे. स्थानिक आणि पर्यटकांमध्ये याठिकाणचा उत्सव प्रचंड लोकप्रिय आहे.

फोटो स्रोत, NURPHOTO VIA GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, तैवानच्या तैपेईमध्ये फूटब्रिजवर अत्यंत सुंदर अशी रंगीत फुलांजी सजावट केलेली पाहायला मिळत आहे. स्थानिक आणि पर्यटकांमध्ये याठिकाणचा उत्सव प्रचंड लोकप्रिय आहे.
केनियाच्या नैरोबीमध्ये ननद्वारे सोलमन चर्चमध्ये प्रार्थना करण्यात आली.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, केनियाच्या नैरोबीमध्ये ननद्वारे सोलमन चर्चमध्ये प्रार्थना करण्यात आली.
पाकिस्तानमध्ये ख्रिसमस साजरा करणारी कुटुंबं. अनेकांनी मुलांसह कराची येथील अँड्र्यूज चर्च याठिकाणी ख्रिसमसच्या उत्सवात सहभाग घेतला.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, पाकिस्तानमध्ये ख्रिसमस साजरा करणारी कुटुंबं. अनेकांनी मुलांसह कराची येथील अँड्र्यूज चर्च याठिकाणी ख्रिसमसच्या उत्सवात सहभाग घेतला.
तुर्कस्तानच्या इस्तानबूलमध्ये मेणबत्ती पेटवून प्रार्थना करताना भाविक.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, तुर्कस्तानच्या इस्तानबूलमध्ये मेणबत्ती पेटवून प्रार्थना करताना भाविक.
येशूचं जन्मस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पॅलेस्टाईनच्या बेथलेहम शहरामध्ये नेटिव्हिटी चर्चमध्ये मध्यरात्री येशू जन्म सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, येशूचं जन्मस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पॅलेस्टाईनच्या बेथलेहम शहरामध्ये नेटिव्हिटी चर्चमध्ये मध्यरात्री येशू जन्म सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.
पोप फ्रान्सिस यांनी व्हेटिकन सिटी याठिकाणीही येशू जन्माचा सोहळा साजरा केला. कोव्हिडच्या निर्बंधांमुळं दरवेळीपेक्षा आधी हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.

फोटो स्रोत, CORBIS VIA GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, पोप फ्रान्सिस यांनी व्हेटिकन सिटी याठिकाणीही येशू जन्माचा सोहळा साजरा केला. कोव्हिडच्या निर्बंधांमुळं दरवेळीपेक्षा आधी हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.
उत्तर इराकमधील कुर्दीश भागाची राजधानी इरबिलमध्ये सोहळ्यामध्ये सहभागी झालेली लहान मुले.

फोटो स्रोत, AFP VIA GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, उत्तर इराकमधील कुर्दीश भागाची राजधानी इरबिलमध्ये सोहळ्यामध्ये सहभागी झालेली लहान मुले.
भारताच्या ओडिशामध्ये बे ऑफ बंगाल (बंगालचा उपसागर) च्या समुद्र किनाऱ्यावर अशाप्रकारे वाळूमध्ये महाकाय सँटाक्लॉज साकारण्यात आला आहे.

फोटो स्रोत, NURPHOTO VIA GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, भारताच्या ओडिशामध्ये बे ऑफ बंगाल (बंगालचा उपसागर) च्या समुद्र किनाऱ्यावर अशाप्रकारे वाळूमध्ये महाकाय सँटाक्लॉज साकारण्यात आला आहे.
नाताळाच्या निमित्तानं न्यूझीलंडमधील क्राइस्टचर्चच्या ओराना वाईल्डलाईफ पार्कमधील प्राण्यांनाही मेजवानी देण्यात आली. त्याचा आस्वाद घेणारा महाकाय गेंडा.

फोटो स्रोत, NURPHOTO VIA GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, नाताळाच्या निमित्तानं न्यूझीलंडमधील क्राइस्टचर्चच्या ओराना वाईल्डलाईफ पार्कमधील प्राण्यांनाही मेजवानी देण्यात आली. त्याचा आस्वाद घेणारा महाकाय गेंडा.
लंडनमधील हा पब त्यावर केलेल्या रोषणाईमुळं ख्रिसमसच्या महाकाय खेळण्यासारखं दिसत आहे.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, लंडनमधील हा पब त्यावर केलेल्या रोषणाईमुळं ख्रिसमसच्या महाकाय खेळण्यासारखं दिसत आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)