प्रियांका चोप्राच्या 'या' पोस्टनंतर निक जोनास आणि तिच्याबद्दलच्या चर्चा थांबतील?

प्रियांका चोप्रा

फोटो स्रोत, Instagram/Priyanka Chopra

अभिनेत्री प्रियंका चोप्रानं इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाउंटवर तिचं नाव बदललं आणि सोशल मीडियावर उलटसुलट चर्चांना सुरूवात झाली.

प्रियांकाने आपल्या नावातून सासरचं 'जोनास' हे आडनाव काढून टाकलं. त्यानंतर प्रियांका चोप्रा आणि तिचा नवरा निक जोनास यांच्यामध्ये सगळं आलेबल नसल्याची चर्चा सुरू झाली. हे दोघं विभक्त होणार का इथपर्यंतही तर्क लढवले गेले.

खरंतर प्रियांकाने आपल्या नावातून केवळ आपल्या पतीचं नाव हटवलं नव्हतं, तर चोप्रा हे आडनावही काढून केवळ 'प्रियांका' एवढंच नाव ठेवलं होतं.

प्रियांका चोप्रा

फोटो स्रोत, Instagram/Priyanka Chopra

पण तरीही प्रियांकाच्या या कृतीनंतर ती आणि निक जोनास यांच्यात काही बिनसलं असल्याची चर्चा सुरू झाली.

दरम्यान, या सगळ्या गॉसिपला पूर्णविराम देण्यासाठी प्रियांका चोप्राच्या आई मधु चोप्रा यांनीही स्पष्टीकरण दिलं. News18.com ला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये मधु चोप्रा यांनी या बातम्यांमध्ये काही तथ्य नसल्याचं म्हटलं आणि अशा अफवा पसरवू नका अशी विनंतीही माध्यमांना केली.

दुसरीकडे, या कपलमध्ये काहीतरी बिनसल्याच्या चर्चा सुरू असताना स्वतः प्रियांकाने पती निक जोनासनं इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या एका व्हीडिओवर प्रतिक्रिया देत सगळं काही ठीक असल्याचं दाखविण्याचा प्रयत्न केला.

निक जोनासनं त्याचा जिममध्ये वर्क आउट करत असतानाचा व्हीडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. त्यावर कमेंट करताना प्रियांका चोप्रानं म्हटलं की, "Damn! I just died in your arms…"

प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या नवीन सिनेमा - मेट्रिक्स री-सरक्शनचा फोटो काही तासांपूर्वी शेअर केलाय.

Instagram पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

Instagram पोस्ट समाप्त

दिवाळीमध्ये प्रियांका आणि निक जोनास यांनी त्यांच्या लॉस एंजलिसमधल्या घरी लक्ष्मीपूजन केलं होतं. त्याचे फोटोही प्रियांकाने सोशल मीडियावर शेअर केले होते.

प्रियांका चोप्रा

फोटो स्रोत, Instagram/Priyanka Chopra

प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक-गीतकार निक जोनास हे 1 डिसेंबर 2018 साली राजस्थानमधील उमेद भवन इथं झालेल्या शाही सोहळ्यात विवाहबद्ध झाले होते.

कामाच्या आघाडीवर बोलायचं झाल्यास प्रियांका सध्या रुसो ब्रदर्सच्या सिटाडेल या शोमध्ये दिसेल. अभिनेता कियानू रिव्हजसोबतच मॅट्रिक्स रिसरेक्शनमध्येही प्रियांकाचा अभिनय पाहायला मिळेल. फरहान अख्तरच्या आगामी 'जी ले जरा' या चित्रपटातही प्रियांका आहे. या चित्रपटात तिच्यासोबत आलिया भट्ट आणि कॅटरिना कैफही असतील.

सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया?

सोशल मीडियावरून आडनाव हटविल्यानंतर प्रियांका चोप्रा हा हॅशटॅग वापरून सिया नावाच्या एका युझरनं लिहिलं की, अजून खूप काही समोर येणं बाकी आहे.

TWITTER

फोटो स्रोत, TWITTER

दुसऱ्या एका युझरनं हा पब्लिसिटी स्टंट असल्याचं म्हटलं. त्यांनी लिहिलं आहे- प्रियांका यांनी आपल्या बायोमधून जोनास आडनाव काढलं कारण त्यांना आपल्या नवीन चित्रपटाचा प्रचार करायचा आहे. हा केवळ एक पब्लिसिटी स्टंट आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

दुसऱ्या एका युझरनं लिहिलं आहे की, सर्वसामान्य लोक कौटुंबिक भांडणानंतर आडनाव हटवतात. तुम्ही दीर्घ श्वास घ्या.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

कोण आहे निक जोनास?

निकोलस जेरी जोनास अमेरिकन गायक, अभिनेता आणि रेकॉर्ड प्रोड्युसर आहे. त्याने वयाच्या सातव्या वर्षापासून अभिनय करायला सुरुवात केली होती.

निकचा जन्म अमेरिकेतील टेक्सास राज्यातील डेल्लासमधील पॉल केविन जोनास (सीनिअर) यांच्या घरात झाला. जो आणि केविनसोबत निकने एक बँड तयार केला. या बँडचं नाव होतं द जोनास ब्रदर्स.

2006 साली त्यांचा पहिला अल्बम 'इट्स अबाउट टाइम' प्रसिद्ध झाला. निकचं वय तेव्हा केवळ 13 वर्षं होतं. या बँडला डिस्ने चॅनलवरही खूप यश मिळालं.

निक जोनास प्रियांका चोप्रा

फोटो स्रोत, AXELLE/BAUER-GRIFFIN

2014 साली हा बँड विभक्त झाला. त्यानंतर निकने एक सोलो अल्बम रिलीज केला. 2017 साली त्याचा रिमेम्बर आय टोल्ड यू हा अल्बम प्रसिद्ध झाला. यामध्ये ब्रिटीश कलाकार एनी मेरीही होती.

निकनं काही चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे. 2015 साली 'केअरफ़ुल व्हॉट यू विश फ़ॉर' या चित्रपटात भूमिका मिळाली.

निकची एकूण संपत्ती 1.8 कोटी डॉलर (2018 या वर्षापर्यंत) होती. त्याच्या या संपत्तीमध्ये द जोनास ब्रदर्स या बँडचा तसंच निकच्या चित्रपटातील कारकिर्दीचाही खूप मोठा वाटा होता.

निक जेव्हा 13 वर्षांचा होता, तेव्हा त्याला टाइप-1 डायबेटिसचं निदान झालं. त्यानंतर त्यांनी चेंज फ़ॉर द चिल्ड्रन फ़ाउंडेशनची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून या आजाराबाबत जागरुकता निर्माण केली जाते.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)