पाकिस्तानी फलंदाज मोहम्मद रिझवानवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचं भारत कनेक्शन

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अब्दुल रशीद शकूर
- Role, प्रतिनिधी, बीबीसी उर्दू
टी-20 वर्ल्ड कपच्या सेमिफायनलमध्ये तडाखेबाज अर्धशतक करणारा पाकिस्तानचा विकेटकिपर फलंदाज मोहम्मद रिझवान सामन्याच्या 36 तासांपूर्वी आयसीयूमध्ये होता.
नऊ नोव्हेंबरला सकाळी आजारी पडल्यामुळं दुबईच्या एका रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं.
रुग्णालयात आणण्यात आलं तेव्हा त्याची प्रकृती कशी होती, याबाबत उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी माहिती दिली आहे. रिझवानला रुग्णालयात आणण्यात आलं तेव्हा त्याला हृदयविकाराचा झटका तर आलेला नाही, याबाबत डॉक्टरांच्या मनात विचार आला.
"रिझवानला रुग्णालयात आणलं तेव्हा त्याच्या छातीत प्रचंड वेदना होत होत्या. वैद्यकीय भाषेत सांगयचं झाल्यास दहा पैकी दहा असा स्कोर होता. रिझवानलाही वेदना सहन होत नव्हत्या. त्यामुळं हा हृदयविकाराचा धक्का तर नाही, याबाबत तपासणी करण्यात आली," असं डॉक्टरांनी बीबीसी उर्दूशी बोलताना सांगितलं.
"गळ्यात संसर्गामुळं रिझवानचा गळा आणि श्वसन नलिका आकुंचन पावली होती. त्यामुळं आयसीयूमध्ये गोळ्यांच्या मदतीनं छातीतील वेदना कमी व्हाव्यात, यासाठी प्रयत्न करण्यात आले. नंतर त्याला आयसीयूमध्येच दाखल करण्यात आलं," असं डॉ. सेहिर यांना उपचाराबाबत सांगितलं.
मात्र, यादरम्यान रिझवाननं अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळं त्याच्या प्रकृतीत वेगानं सुधारणा झाली, असं डॉ. सेहिर म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images
रिझवानमध्ये असलेलं प्रचंड धैर्य हीच त्याची सर्वांत मोठी शक्ती असल्याचं डॉ. सेहिर सांगतात.
"रिझावान संघात परत जाऊन सामना खेळायचा आहे, असं सांगत होता. अशा परिस्थितीत रुग्णाला बरं व्हायला, साधारणपणे, पाच ते सात दिवस लागतात. पण रिझवानच्या तब्येतीत झालेली सुधारणा अविश्वसनीय होती," असं डॉक्टर म्हणाले.
रिझवानची इच्छाशक्ती आणि त्यांची धार्मिक आस्था याला याचं श्रेय असल्याचं डॉक्टर सेहिर म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images
मात्र, 36 तास आयसीयूमध्ये राहिलेल्या खेळाडूला सामना खेळण्याची परवानगी देणं योग्य निर्णय होता का? असं डॉ. सेहिर यांना विचारण्यात आलं. त्यावर डॉक्टरांना जोपर्यंत रिझवान पूर्णपणे फिट असल्याची खात्री झाली नाही, तोपर्यंत त्यांना रुग्णालयातून जाण्याची परवानगी देण्यात आली नव्हती, असं मोहम्मद रिझवान म्हणाले.
"रुग्णालयातून जाताना त्यांना सामन्यापूर्वी आणि सामन्यादरम्यान घेण्यासाठी काही औषधंही देण्यात आली. त्यांच्या खेळण्याबाबत बोलायचं झाल्यास, पाकिस्तानी संघाच्या वैद्यकीय पथकानं सर्व बाबींची खात्री केल्यानंतरच त्यांना मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला असेल," असं ते म्हणाले.
रुग्णालयात नेहमीच जखमी झालेल्या खेळाडुंना उपचारासाठी आणलं जातं. मात्र, करिअरमध्ये प्रथमच अशा अवस्थेतील क्रिकेटपटूवर उपचार केले असतील, असं डॉ. सेहिर यांनी सांगितलं.
रिझवानने दिली भेट
रुग्णालयातून निघाल्यानंतर मोहम्मद रिझवाननं ऑस्ट्रेलियाच्या विरोधात सेमिफायनलमध्ये ज्या पद्धतीची आक्रमक फलंदाजी केली आणि षटकार लगावले, ते पाहून डॉ. सेहिर सेन उल अबिदीन अत्यंत आनंदी झाले.
मोहम्मद रिझवाननं डॉ. सेहिर यांचे आभार मानत त्यांना पाकिस्तान संघाचा त्याचा खास टी-शर्ट भेट म्हणून दिला. मुलं आणि नातवंडांना हा टीशर्ट पाहता यावा म्हणून तो फ्रेम करून ठेवणार असल्याचं डॉ. सेहिर म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images
नातवंडं आहेत का, असं विचारलं तेव्हा सेहिर यांनी, ते आता 40 वर्षांचे झाले असून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असल्याचं सांगितलं.
मोहम्मद रिझवान हा पूर्वीपासूनच आवडता फलंदाज असल्याचं डॉ. सेहिर म्हणाले. त्यांना रिझवानची फलंदाजी आणि त्याचं कायम हसत राहणं आवडतं. पण रुग्णालयाच्या नियमांमुळं ते त्यांच्या आवडच्या फलंदाजाबरोबर फोटो घेऊ शकले नाहीत.
डॉ. सेहर सेन उल अबिदीन भारताच्या केरळमधील आहेत. ते सहा वर्षांपासून यूएईमध्ये राहत आहेत. स्वतः क्रिकेटचे चाहते आहेत. मात्र, कोव्हिडच्या परिस्थितीमुळं त्यांनी मैदानात जाऊन टी-20 वर्ल्ड कपचे सामने पाहणं टाळलं.
ज्याप्रकारे झहीर आणि झैन-उल-अबिदीन असं पाकिस्तानात लिहिलं आणि म्हटलं जातं, त्याचप्रमाणे 'झेड' ऐवजी 'एस'चा वापर केला जातो आणि त्यामुळं त्यांचं नाव सेहिर सेन-उल-अबिदीन असल्याचं त्यांनी सांगितलं.
त्याचं रुग्णालय व्हीपीएस मेडल ग्रुपचा एक भाग असल्याचंही त्यांनी सांगितलं. आयपीएल आणि टी20 वर्ल्ड कपदरम्यान बायो-सिक्योर बबल याच ग्रुपनं तयार केलं होतं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








