तालिबान : तालिबानने हैरात शहरातील चौकात 4 जणांचे मृतदेह लटकावले

तालिबान, अफगाणिस्तान, अमेरिका, मानवाधिकार

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, तालिबान

अफगाणिस्तानच्या पश्चिमेकडील हैरात शहरातून येणाऱ्या वृत्तानुसार, विविध महत्त्वाच्या ठिकाणी 4 लोकांचे मृतदेह लटकवून ठेवण्यात आले आहेत.

बीबीसीच्या फारशी सेवेने दिलेल्या वृत्तानुसार तालिबानने या 4 लोकांना ओलीस ठेवण्याच्या आरोपांवरून अटक केली होती.

त्यांना गोळीने मारण्यात आलं आणि शनिवारी त्यांचे मृतदेह शहराच्या विविध भागांमध्ये लटकावून ठेवण्यात आले. तालिबानने यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

तालिबानच्या कार्यकाळात लोकांना देण्यात येणाऱ्या या शिक्षेबाबत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.

तालिबान नेता मुल्लाह नुरुद्दीन तुराबी यांनी याच आठवड्यात सांगितलं होतं की त्यांच्या कार्यकाळात सार्वजनिक पातळीवर नसेल पण मृत्यूदंडाची शिक्षा तसंच शरीराचे भाग तोडण्याची शिक्षा सुनावण्यात येईल.

शरीराचे अवयव तोडण्याच्या शिक्षेसंदर्भात अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाने निषेध व्यक्त केला होता.

गेल्या दोन दशकांपासून अफगाणिस्तानमध्ये सजा-ए-मौत सार्वजनिक पद्धतीने देण्यात आलेली नाही. मात्र अफगाणिस्तानमध्ये या शिक्षेची तरतूद आहे आणि काही प्रकरणांमध्ये याची अंमलबजावणीही करण्यात आली आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)