Indian Premier League 2021 UAE: उर्वरित सामन्यांचं वेळापत्रक पाहा या ठिकाणी

फोटो स्रोत, Getty Images
इंडियन प्रीमिअर लीग 2021 च्या 14व्या हंगामातील उर्वरित सामन्यांना आजपासून संयुक्त अरब अमिराम (UAE) येथे सुरुवात होणार आहे.
कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेल्या यंदाच्या वर्षीच्या आयपीएल स्पर्धेतील उर्वरित सामने यादरम्यान खेळवण्यात येणार आहेत.
UAE मध्ये 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबरदरम्यान ही स्पर्धा होईल.
आयपीएल 2021 स्पर्धेचं आयोजन यंदाच्या वर्षी एप्रिल-मे दरम्यान भारतातच करण्यात आलं होतं. पण स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव आणि कोरोनाची दुसरी लाट या पार्श्वभूमीवर आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यात आली होती.
9 एप्रिल ते 3 मे दरम्यान स्पर्धेतील एकूण 29 सामने खेळवण्यात आले होते. पण नंतर विविध संघातील खेळाडू, सपोर्ट स्टाफ यांना कोरोनाची लागण होत असल्याचं समोर आलं. त्यामुळे अखेर आयपील स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) घेतला. आगामी काळात परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेणार असल्याचं BCCI सचिव जय शाह यांनी सांगितलं होतं.
दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर बीसीसीआयने उर्वरित स्पर्धा UAE मध्ये होणार असल्याचं जाहीर केलं.
आयपीएल स्पर्धेत एकूण साखळी सामने, क्वालिफायर, एलिमिनेटर आणि अंतिम सामना असे सर्व मिळून एकूण 60 सामने खेळवण्यात येतात. एप्रिल-मे महिन्यात स्पर्धेतील एकूण 29 सामने खेळवण्यात आले. त्यामुळे उर्वरित 31 सामने UAE मध्ये 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान खेळवण्यात येणार आहेत.
स्पर्धेतील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघात दुबई येथे खेळवला जाणार आहे.
आयपीएल स्पर्धेच्या उर्वरित 31 सामन्यांचं वेळापत्रक पुढीलप्रमाणे -

हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








