सयामी जुळ्या मुलींना वेगळं करण्यात यश, वर्षभरानं मुलींनी एकमेकींना पाहिलं

इस्राइलमध्ये सयामी (Conjoined) जुळ्या मुलींना वेगळं करण्यात डॉक्टरांना यश मिळालं आहे. एक वर्षाच्या या दोन्ही मुली डोक्याने एकमेकांना जोडलेल्या होत्या.
शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच या दोन्ही मुलींनी एकमेकांना पाहिलं.
इस्राइलच्या बीरशेबा शहरातील सोरोका मेडिकल सेंटरमध्ये या गेल्या आठवड्यात या मुलींवर शस्त्रक्रिया करण्यात आली.
या दोन्ही मुलींची अद्याप नावं ठेवण्यात आलेली नाहीत. पण, डॉक्टरांच्या माहितीनुसार या दोन्ही मुलींची तब्येत आता स्थिर आहे आणि दिवसेंदिवस सुधारतेय.
सोरोका रुग्णालयाच्या प्लॅस्टिकसर्जरी विभागाचे प्रमुख एल्दाद सिलबरस्टेइन चॅनल 12 न्यूजशी बोलताना म्हणाले, "या दोन्ही मुली योग्य पद्धतीने श्वास घेत आहेत आणि खात आहेत."
इस्राइलमध्ये अशा प्रकारची शस्त्रक्रिया पहिल्यांदाच करण्यात आली. जगभरात आतापर्यंत अशा 20 शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
सोरोका रुग्णालयाचे न्यूरोसर्जन (मेंदूविकारतज्ज्ञ) मिकी गिडेऑन म्हणाले, "या मुलींचं आभासी 3D (व्हर्चुअल) मॉडेल तयार करण्यात आलं होतं. सर्व प्रक्रिया आमच्या अपेक्षेप्रमाणे पूर्ण झाली. "
या जुळ्या मुलींचा जन्म ऑगस्ट 2020 मध्ये झाला होता. डॉक्टरांच्या माहितीनुसार, या मुली त्यांचं पुढील आयुष्य इतरांप्रमाणे जगू शकतील.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








