You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कवटीवरील बुरशी, रक्त तसंच इतर अवयवांचा वापर करणारी प्राचीन उपचारपद्धती
नुकतीच एका व्यक्तीवर मृत्यूदंडाच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात आली होती. अजूनही तडफडत असलेल्या त्या मृतदेहाजवळ अनेक रुग्ण गोळा होण्याचा प्रयत्न करत आहेत.
ज्या नशिबवान लोकांना त्यांचे पेले भरल्याचे आवाज आले, ते लगेचच मृतदेहाचं ताज आणि गरम रक्त घटाघट प्यायले.
ही नव्या डेन्मार्कमधली अगदी सुरुवातीच्या काळातील गोष्ट आहे.
तसं पाहता हे उदाहरण अत्यंत गंभीर आहे, पण त्या काळातील वैद्यकीय उपचार करणाऱ्या तज्ज्ञांच्या मते फेफरं येण्याच्या आजारावरील उपचार (औषध) रक्तामध्ये होते.
आधुनिक काळाच्या सुरुवातीला मिळणाऱ्या 'शव औषधी'चं दोन गटांत वर्गीकरण केलं जाऊ शकतं.
संवर्धन केलेल्या मृतदेहांद्वारे केली जाणारी उपचार पद्धती लोकप्रिय होती. त्यात प्राचीन इजिप्तमधील मृतदेहांचं वाळलेलं मांस काढून त्याची पावडर तयार केली जायची आणि त्याचा वापर केला जात होता.
पण काही डॉक्टर मृतदेहांच्या काढलेल्या अवयवांचाही वापर औषध म्हणून करत होते.
त्याता ताजी चरबी, रक्त आणि अगदी नितंबांच्या मांसाचाही समावेश होता. त्याचा वापर करण्यापूर्वी अगदी सावधपणे ते वाळवलं आणि स्वच्छ केलं जात होते.
अंदाजे 24 वय असलेल्या आणि वेदनादायी मृत्यू झालेल्या व्यक्तीचा लाल रंग असलेला ताजा आणि शुद्ध, स्वच्छ केलेला मृतदेह हा फेफरं येण्यावरील सर्वोत्तम उपाय होता, असं त्या काळच्या अनेक तज्ज्ञांचा दावा होता.
कधी-कधी मानवी कवटीचाही वापर केला जात होता, तर मृत्यूनंतर काही काळात कवटीवर असनी नावाची एक बुरशी लागायला सुरुवात व्हायची. त्याचाही वापर केला जात होता.
संवर्धन केलेल्या मृतदेहांचा वापर रक्तस्त्राव किंवा जखमांच्या उपचारासाठीही केला जात होता, तर रक्त आणि कवटीचा वापर हा फेफरं येण्याच्या आजारावर उपचारासाठी पावडरच्या रुपात केला जात होता.
नरभक्षण
उपचार पद्धतींच्या पारंपरिक इतिहासाचा विचार करता त्यात मृतदेहांपासून उपचार केल्याचा उल्लेख आढळत नाही. त्याचं कारण मात्र माहिती नाही. पण अशा प्रकारचे उपचार म्हणजे दैवी कथा किंवा फसवणुकीचे प्रकारही नव्हते.
काही अंशी हे उपचार ग्रीक आणि अरबी उपचार पद्धतींमधून स्वीकारण्यात आले आहेत. उपचाराच्या यापद्धती अनेक सुशिक्षित लोक केवळ मान्यच करत नाहीत, तर त्याचा वापर करण्याचा सल्लाही देतात. असा सल्ला देणाऱ्यांमध्ये वैज्ञानिक तत्वज्ञ फ्रान्सिस बेकन, कवी आणि तत्वज्ञ जॉन डन, महारानी एलिझाबेथ यांचे सर्जन जॉन बेनिस्टर आणि रसायन तज्ज्ञ रॉबर्ट बॉयल यांचा समावेश होता.
1685 मध्ये मानवी कवटीपासून तयार करण्यात आलेल्या औषधाचा वापर ब्रिटनचे राजा चार्ल्स द्वितीय यांच्या उपचारासाठीही करण्यात आला होता.
त्यामुळं मृतदेहांचा वापर करून उपचार करणं हे एकप्रकारे नरभक्षण करण्यासारखंच होतं.
15व्या शतकात आणि त्यानंतर युरोपात जवळपास प्रत्येक ठिकाणी 'जुन्या काळातील नरभक्षण' चुकीचं मानलं जात होतं. अमेरिकेत नुकताच त्याचा शोध लागला होता. पण कुणीही अशा प्रकारच्या उपचाराला नरक्षभक्षण असं म्हटलं नव्हतं.
लोकांना या प्रकारामुळं अस्वस्थ वाटू लागायचं, पण तरीही ही लोकप्रिय आणि आकर्षक उपचार पद्धती होती. ही पद्धत एवढी लोकप्रिय होती की, व्यापारी हे इजिप्तमधील मृतदेह लुटून न्यायचे तसंच लोकांना कुष्ठरोग्यांच्या किंवा उंटाच्या मांसाची विक्रीही करायचे.
उपचाराची ही पद्धत 15व्या शतकाच्या अखेरीपर्यंत कायम राहिली. पण जर्मनीमध्ये तर ती गेल्या शंभर वर्षांपूर्वीपर्यंत कायम होती.
चांगलं औषध
पण उपचाराची ही पद्धत एवढी निर्घृण असूनही एवढी दीर्घकाळ सुरू कशी राहिली?
याचं उत्तर म्हणजे उपचार करणारे तज्ज्ञ क्लासिकी युनानी काळातील तज्ज्ञांना महत्त्व देत होते. त्याशिवाय त्या काळात उपचारासाठी लॅटिन भाषेचा वापर केला जात होता आणि योग्य आणि अयोग्य काय? यावर अत्यंत कठोर एकाधिकार होता हेही महत्त्वाचं होतं.
1599 पेक्षा काही काळापूर्वी, एका पर्यटकानं इजिप्तच्या काहिरामधील एका पिरॅमिडबाबत लिहिलं होतं. "प्राचीन लोकांचे मृतदेह रोज काढले जात होते. ते सडलेल्या अवस्थेत नव्हे तर चांगले असायचे, तसंच हे तेच मृतदेह होते जे डॉक्टर आणि औषधं तयार करणारे आम्हाला आमच्या मर्जीच्या विरोधात खाऊ घालत होते," असं त्यात लिहिलेलं होतं.
यावरून लक्षात येतं की, डॉक्टर त्यांच्या रुग्णांना एखाद्या एखाद्या अत्यंत दुबळ्या शरीरातून काढलेल्या अवयवांचा वापर करण्यासाठी बळजबरी करू शकत होते.
1647 मध्ये उपदेशक आणि लेखक थॉमस फिलर यांनी संवर्धन करून ठेवलेल्या मृतदेहांना 'वाईट भोजन, मात्र चांगलं औषध' म्हटलं होतं.
त्यांच्या या वक्तव्याचा अर्थ काढला असता. मानवी मांस विविध वैद्यकीय प्रक्रियांच्या माध्यमातून स्वच्छ केलं जात होतं आणि अशाप्रकारे हे कच्चं मानवी मांस खाणं वाईट नव्हतं, असं त्यावरून म्हटलं जाऊ शकतं.
पण मृतदेहाच्या शुद्धीकरणाचा हा टप्पा विज्ञानाच्या शक्तीवर नव्हे तर मानवी शरिराच्या धार्मिक आणि अध्यात्मिक शक्तीवर अवलंबून होता.
आत्मा, मानवी जीवनाची शक्ती
युरोपातील प्रबोधनकाळात, शारीरिक दुःखाचं कारण आत्माच असते ही धारणा रूढ होती.
आत्म्याचं स्वतःचं रुप नाही, मात्र ती रक्त आणि हवेच्या मिश्रणाच्या माध्यमातून शरीराशी जुळलेली राहते. आत्म्याचं हे मिश्रण शरिरात फिरत राहतं, हा त्यामागचा सिद्धांत होता.
प्रबोधनकाळातील अनेक विचारवंतांच्या मते, मृतदेहांचा वापर करून उपचार करणं हे एक असं रसायनशास्त्र होतं जे जीवन अधिक उत्तम बनण्यासाठी आवश्यक असलेली अध्यात्मिक ऊर्जा ग्रहण करण्याची संधी देतं.
ताजं रक्त पिण्याचा विषय आल्यानंतर तर ही बाब आणखी स्पष्ट होते, अशाप्रकारे जीवनातील मूळ पदार्थ ज्या पद्धतीने जिवंत शरीरात होते, त्याचप्रकारे रोगी त्याचं सेवन करतो.
"गरम किंवा थंड मानवी रक्त आजारांवर फायदेशीर आहे," असं सतराव्या शतकाच्या अखेरीस कवी आणि वैद्य अॅडवर्ड टेलर यांनी लिहिलं होतं.
1747 पर्यंत इंग्रज वैद्यदेखील फेफरं येण्याच्या आजारासाठी ताज्या गरम रक्ताचा पर्याय सुचवायचे.
त्याशिवाय 'आध्यात्मिक शरीरशास्त्र' यामुळंही मानवी मांस खाल्लं जात राहिलेलं आहे.
विशेष म्हणजे, मृतदेह हा तरुणाचा आणि ज्याचा अत्यंत वेदनादायी मृत्यू झाला असेल अशा तरुणाचा असायला हवा असं संवर्धन करण्यात आलेल्या मृतदेहांबाबत म्हटलं जात होतं.
वेदनादायी मृत्यूमुळं भीतीचाही जन्म होत असतो.
काही वैद्यकीय सिद्धांतानुसार भीतीमुळं आत्मा हृदय, मेंदू अशा महत्त्वाच्या अवयवांमधून निघून मांसामध्ये प्रवेश करते. त्यामुळं अशा स्थितीमध्ये अंगावर शहारे येणं किंवा डोळ्यात अचानक गूढ चमक निर्माण होणं असे बदल जाणवतात. त्यामुळं अशा व्यक्तीचं मांस हे विशेषतः उत्तम मानलं जात होतं.
त्यामुळं प्रथमदर्शनी इजिप्तमधील कोरडेपणासाठी प्रसिद्ध ममीचा विचार करता त्यातही जीवन शक्ती असायला नको? असं मानलं जायचं. पण त्यातील चांगल्या अवस्थेतील मांसावरून असा अर्थ काढला जात होता की, या मृतदेहांमध्ये अजूनही आत्मा जीवंत आहे. संवर्धन करताना ती आत्मा त्यात बंद केली असल्याचं मानलं जात होतं.
त्याचप्रमाणे खूप काळापूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कवटीवर लागलेल्या बुरशीमध्येही प्रचंड अध्यात्मिक शक्ती असल्याचं मानलं जात होतं.
एखाद्या व्यक्तीला गळा दाबून त्याची हत्या करण्यात आली असेल तर त्याच्या डोक्यातील अध्यात्मिक शक्ती सात वर्षांपर्यंत त्याच्या कवटीमध्ये राहू शकते, असं काही विचारवंतांचं मत होतं.
1604 मध्ये आपण विल्यम शेक्सपिअरचं पात्र असलेल्या ओथेल्लोला त्याच्या रुमालाची स्तुतीत करताना पाहतो. त्याचं कारण म्हणजे त्या रुमालातील रेशीम एका अविवाहित महिलेच्या संवर्धन करून ठेवलेल्या हृदयापासून तयार करण्यात आलेल्या रंगानं रंगवलेलं होतं.
त्यामुळं त्या काळी तरुण, अविवाहित महिला यांचं अध्यात्मिक पावित्र्य सर्वाधिक असल्याचं मानलं जात होतं, हे स्पष्ट आहे. तसं पाहता हृदयाचा उपचार पद्धतीतील वापर हा फार विचित्रही मानला जात नव्हता. पण आत्म्याचा सर्वात शुद्ध आणि चांगला भाग हा शरिराच्या डाव्या बाजुला किंवा हृदयाचा पोकळीत असावा या धारणेवर हे वक्तव्य अवलंबलेलं असू शकतं.
वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळे अर्थ
मृतदेहांद्वारे उपचाराचा अर्थ हा वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळा होता.
काही लोक याला योग्य मानत नव्हते. पण व्यापार, पाश्चिमात्य उपचार, पुस्तकं आणि तंत्रज्ञानाच्या विकासामुळं त्यांचं मत परिवर्तन झालं आणि हळूहळू हे स्वीकार्य होऊ लागलं.
इतर लोकांसाठी हे मानवी जीवनातील सर्वात पवित्र आणि मौल्यवान तत्वाशी संपर्काचं माध्यम होतं.
हास्यास्पद बाब म्हणजे, मृतदेहांचं जतन करणं मुख्य प्रवाहातील उपचारांत अप्रचलित किंवा मागं पडलेलं मानलं जात होतं. केवळ डॉक्टर सॅम्युअल जॉन्सन यांचे समकालीन असलेले याला अंधश्रद्धा किंवा क्रूरपणा मानत होते हेच त्यामागचं एकमेव कारण नव्हतं, तर उपचारांमुळं मानवी शरीराचं अध्यात्मिक महत्त्वही कमी व्हायला सुरुवात झाली होती, हेही त्यामागचं एक कारण होतं.
1782 मध्ये उपचारतज्ज्ञ विल्यम ब्लेक यांनी इजिप्तमधील ममी आणि पुरुषांच्या कवटीसारख्या उपचार पद्धती कालबाह्य झाल्याचा आनंद व्यक्त केला होता. यासह इतर दुषित पदार्थांच्या वापराला उपचार पद्धतीत स्थान नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
अशा प्रकारे नव्या विज्ञानाचं समर्थन करत असताना विल्यम ब्लेक यांनी या संपूर्ण काळादरम्यान किती गोष्टींवर परिणाम झाला याचा विचारच केला नाही.
त्याचं कारण म्हणजे ज्यांनी मृतदेहांच्या माध्यमातून उपचार घेतले होते, त्यांची याबाबतची घृणा आता संपुष्टात आली होती. त्याचं कारण हताशपणा हे नव्हतं, तर आत्म्याबाबत त्यांची आदराची भावना होती आणि आत्म्यालाच मानव जीवनाचा सार मानत होते.
(रिचर्ड सिग डरहम युनिव्हर्सिटीमध्ये शिकवतात. त्यांचं पुस्तक मर्डर आफ्टर डेथ, उपचारांसाठी नरकभक्षणाच्या मुद्द्याला अधोरेखित करतं.)
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)