कोरोना: या देशात लॉकडाऊन लागला आणि जगभरात कॉफी पिणाऱ्यांची झाली पंचाईत

कॉफी

फोटो स्रोत, Getty Images

कोरोना व्हायरसच्या लॉकडाऊनमुळे आता कॉफी पिणाऱ्या लोकांची चांगलीच पंचाईत झालेली आहे.

व्हिएतनाम या देशात सगळ्यात मोठा लॉकडाऊन लागला आहे. त्यामुळे जगभरात होणाऱ्या कॉफीच्या पुरवठ्यावर संकट आलं आहे.

या देशातलं कॉफी निर्यातीचं सगळ्यांत मोठं ठिकाण असणाऱ्या हो-ची-मिन्ह शहरात डेल्टा व्हायसरचे रूग्ण वाढल्यानंतर प्रवासावर कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत.

रोबस्टा या कडवट कॉफीचं सर्वाधिक उत्पादन करणाऱ्या देशांपैकी एक व्हिएतनाम आहे. काही एक्स्प्रेसो मिक्सही इथे उत्पादित केली जातात.

रोबस्टा कॉफीबियांची किंमत यावर्षी 50 टक्क्यांनी वाढली आहे.

हो-ची-मिन्ह शहरात असणाऱ्या लॉकडाऊनमुळे निर्यातदारांना आपल्या कॉफीबिया बंदरापर्यंत नेण्यात आणि पर्यायाने जगभरात पोहचवण्यासाठी अडचणी येत आहेत.

एकतर माल निर्यात करण्यासाठी लागणाऱ्या कंटेनर्सची कमतरता, त्यात मालाची ने-आण करण्याची वाढलेली किंमत आणि आता प्रवासावर निर्बंध यामुळे निर्यातदारांच्या समस्या वाढल्या आहेत. हो-ची-मिन्ह शहरातली बंदरं जगभरात कॉफीची ने-आण करणाऱ्या निर्यात साखळीचा महत्त्वाचा दुवा आहेत.

कॉफी

फोटो स्रोत, Getty Images

व्हिएतनाम कॉफी असोसिएशन आणि इतर व्यापारी संघटनांनी दळणवळणाचा खर्च कमी करण्यासाठी आणि कॉफीच्या निर्यातीत आणखी उशीर होऊ नये म्हणून सरकारला लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करा अशी विनंती केली आहे.

गेल्या आठवड्यात व्हिएतनामच्या वाहतूक मंत्र्यांनी देशाच्या दक्षिण भागातल्या प्रशासनाने लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करावेत असे आदेश दिले. याने कॉफीची वाहतूक करणं सोपं होईल.

व्हिएतनामच्या कॉफी उत्पादकांना येणाऱ्या अडचणी या जगभरातल्या कॉफी उद्योगावर आलेल्या संकटाचं एक उदाहरण आहे.

ब्राझील उच्च दर्जाच्या अरेबिका कॉफीबियांचा जगातला सगळ्यांत मोठा उत्पादक देश आहे. पण गेल्या काही काळात तिथली कॉफी लागवड दुष्काळ आणि फ्रॉस्ट (थंड वातावरणामुळे पीकावर पडणारा रोग) मुळे संकटात सापडली आहे.

1994 पासून पहिल्यांदाच ब्राझीलमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर फ्रॉस्ट रोग पसरला आहे. यामुळे चांगल्या न भाजलेल्या कॉफीबियांची किंमत गगनाला भिडलीये.

काही रिपोर्टनुसार ब्राझीलमधला फ्रॉस्ट इतका वाईट होता की तो रोग कोणत्याही औषध फवारणीने जाणार नाही. इथल्या शेतकऱ्यांना कॉफीची झाडं पुन्हा लावावी लागतील. ती झाडं मोठी होऊन त्यावर कॉफीबिया लागण्यासाठी किमान 3 वर्षं जातील.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)