कोरोना: व्हिएतनाममध्ये आढळलेल्या कोरोनाच्या व्हेरिएंटबद्दल WHOचं काय म्हणणं?

फोटो स्रोत, Getty Images
व्हिएतनाममध्ये कोरोना विषाणूचा एक नवा व्हेरिएंट सापडला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात आढळणाऱ्या कोरोना विषाणूच्या व्हेरिएंटशी साधर्म्य साधणारा हा नवा व्हेरिएंट आहे. त्यामुळे याला हायब्रिड स्ट्रेन म्हटलं जात आहे.
अधिकाऱ्यांच्या मते हा व्हेरिएंट वेगाने हवेतून पसरतो.
हा व्हेरिएंट धोकादायक असल्याचं व्हिएतनामचे आरोग्यमंत्री विएन थान लॉन्ग यांनी सांगितलं.
जानेवारी 2020 मध्ये कोरोना विषाणूची ओळख झाल्यापासून आतापर्यंत अनेक म्यूटेशन्स पाहायला मिळत आहेत.
विषाणू आपलं स्वरूप सातत्याने बदलतो म्हणजे म्युटेट होतो. बहुतांश व्हेरिएंट निष्प्रभ होतात. मात्र काही म्युटेशन नंतर अधिक जीवघेणे होतात.

फोटो स्रोत, Reuters
रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, भारत आणि इंग्लंडमध्ये आढळणाऱ्या कोरोनाच्या दोन व्हेरिएंटच्या लक्षणं मिळून हा व्हेरिएंट तयार झाल्याचं व्हिएतनामच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.
एका सरकारी बैठकीत ते म्हणाले, नवा व्हेरिएंट म्युटेशनसह भारतीय व्हेरिएंट आहे. हा मूळ रुपाने इंग्लंडचा व्हेरिएंट आहे. हा अतिशय धोकादायक आहे.
ते पुढे म्हणाले, "नवा व्हेरिएंट आधीच्या तुलनेत जीवघेणा आहे. हा हवेत वेगाने फैलावतो. नव्या रुग्णांच्या परीक्षणानंतर नवा व्हेरिएंट समोर आला आहे."
याचं जेनेटिक कोड लवकरच उपलब्ध होईल असं ते म्हणाले.
जागतिक आरोग्य संघटनेचं काय म्हणणं?
रॉयटर्सनुसार, जागतिक आरोग्य संघटना व्हिएतनामच्या व्हेरिएंटचा अभ्यास करत आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेच्या तांत्रिक प्रमुख मारिया वॅन केरखोवा यांनी इमेलच्या माध्यमातून सांगितलं की, व्हिएतनामच्या व्हेरिएंटचा आम्ही अभ्यास करत आहोत.
तिथे आम्ही व्हिएतनामच्या आरोग्य मंत्रालयाच्या बरोबरीने काम करत आहोत. लवकरच यासंदर्भात अधिक तपशील गोळा करत आहेत.
भारतातला व्हेरिएंटही धोकादायक
भारतात गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये कोरोनाचा व्हेरिएंट आढळला होता. B.1.617.2 असं त्याचं शास्त्रीय नाव आहे. इंग्लंडमध्ये आढळलेल्या B.1.1.7 पेक्षा हा धोकादायक असल्याचं स्पष्ट झालं.
संशोधनाच्या आधारे, फायझर आणि अस्ट्राझेनका लशीचे दोन डोस भारतात आढळलेल्या कोरोना व्हेरिएंटविरुद्ध परिणामकारक आहेत. मात्र लशीचा एक डोस परिणामकारक नाही.
तूर्तास कोरोना विषाणूच्या म्यूटेशनमुळे मोठ्या लोकसंख्येत गंभीर आजार पसरल्याचे पुरावे नाहीत.

फोटो स्रोत, ANI
कोरोना विषाणूचं मूळ स्वरूप ज्येष्ठ नागरिक म्हणजे सहव्याधी असणाऱ्या आणि वय जास्त असलेल्या नागरिकांसाठी धोकादायक मानलं गेलं.
ज्या ठिकाणच्या लोकांना लस मिळालेली नाही तिथे विषाणू वेगाने पसरतो आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोक जीव गमावत आहेत.
व्हिएतनाममध्ये गेल्या काही आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. व्हिएतनामध्ये कोरोना संसर्गापासून आतापर्यंत 6,700 जणांना याची लागण झाली आहे. मात्र सर्वाधिक रुग्ण एप्रिलनंतर आढळले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत व्हिएतनाममध्ये 47जणांचा मृत्यू झाला आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








