मानसिक आरोग्यः मला आत्महत्या करावीशी वाटते, असं तुम्हाला कोणी सांगितलं तर काय कराल

'मी मानसिक आजाराशी झगडतेय. मला आत्महत्या करावीशी वाटते'

तुमच्या जवळच्या व्यक्तीने तुम्हाला असं सांगितलं, तर काय करायचं? काय प्रतिक्रिया द्यायची? या परिस्थितीला कसं हाताळायचं? हा खूप मोठा प्रश्न आहे.

तुम्ही अशावेळी काय सांगाल किंवा कराल?

कॅरोलिन फ्लॅक यांच्यावर आधारीत एक डॉक्युमेंन्ट्री चॅनल-4 वर प्रदर्शित केली गेली. 2020 मध्ये, टिव्हीवर निवेदिका म्हणून काम करणाऱ्या कॅरोलिन फ्लॅक यांना आत्महत्या का करावी लागली?

काय कारणं होती? परिस्थिती काय होती? यावर ही फिल्म आधारीत आहे.

बीबीसी- 3 शी बोलताना, प्रेझेन्टर रोमन केम्प यांनी मानसिक आजाराशी त्यांनी कसा लढा दिला. हे सांगताना, त्यांचा जवळचा मित्र जो लिऑन्सच्या आत्महत्येबाबत मन मोकळं केलं.

मानसिक आजाराबाबत काम करणाऱ्या संघटनेचे अॅलेक्स डोड, एखाद्या व्यक्तीने त्याचे प्रश्न सांगितल्यानंतर काय करावं याबद्दल मार्गदर्शन करतात.

त्यांना गांभीर्याने घ्या...

"तुम्ही त्यांचे प्रश्न सोडवू शकत नाही. त्यांच्या मनात काय सुरू आहे. हे तुम्हाला कळत नाही," अॅलेक्स सांगतात.

ते म्हणतात "पण, कोणीही त्यांच्या मनात आत्महत्या करण्यासंदर्भात विचार येत आहेत असं सांगितलं. तर, त्यांना गांभीर्याने घ्या."

मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्तींना, त्यांचं मन मोकळं करून देण्यासाठी योग्य परिस्थिती निर्माण केली पाहिजे. त्यांना, मन मोकळं करण्यासाठी धीर दिला पाहिजे. त्यांची मदत केली पाहिजे, असं अॅलेक्स म्हणाले.

"या व्यक्तींसोबत चर्चा करणं, बोलणं, भावनांबद्दल चर्चा करणं. ही सगळ्यात कठीण गोष्ट लोक करू शकतात."

शांत रहा...निर्णयापर्यंत पोहोचू नका

मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्ती, जर कुटुंबातील असेल. तर, शांत रहाणं आणि निर्णयापर्यंत न पोहोचणं ही सर्वात कठीण गोष्ट आहे, असं अॅलेक्स सांगतात.

"पण, त्यांचं मन मोकळं होणं सहज नसतं. ते कोणत्याही गोष्टीचा विचार करत नसतात. तुम्ही शांत रहाणं, ही सर्वात पहिली गोष्टी केली पाहिजे."

त्यांना बोलण्यासाठी, आपलं मन मोकळं करण्यासाठी योग्य परिस्थिती आणि जागा दिली पाहिजे. एखादा शब्द जर निर्णयासारखा असला, तर तो बोलू नये.

"तुमच्या कुटुंबाला कसं वाटेल? जग सोडून गेलास तर, त्यांना काय वाटेल? असे प्रश्न विचारू नयेत."

अशा प्रश्नांमुळे, मानसिक आजारानेग्रस्त व्यक्ती बोलणं थांबवतील. पुन्हा तुमच्याकडे मोकळं होणार नाहीत.

मानसिक आजाराने ग्रस्त रुग्णांना शांत करा

अॅलेक्स सांगतात, मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्तीने फोन केला. तर, मी पहिल्यांदा त्याला धन्यवाद देतो. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी तुमची मदत करण्यासाठी तयार आहोत, असा विश्वास त्यांना देणं गरजेचं आहे.

आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी, अशा व्यक्तींना शांत करणं गरजेचं आहे.

लोकांना त्रास होईल असे प्रश्न विचारण्यापेक्षा, तुम्हाला काय वाटतंय याविषयी काही अधिक माहिती देता का? असा विचार करण्याची वेळ तुमच्यावर का आली? असे प्रश्न विचारा.

पण, फक्त प्रश्न विचारू नका.

"हा विचार करण्याची वेळ का आली? या पुढे ते जाऊ शकत नाहीत. असं त्यांना का वाटतं? हे जाणून घेण्याचा प्रयत्न करावा."

गरज असेल तर शारीरीक आधार द्या

एखादी जवळची व्यक्ती असा विचार करत असेल तर, आपण सहजच त्यांना जवळ घेऊ. त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करू.

"पण, काही लोकांना मिठी मारलेली किंवा जवळ घेतलेलं आवडत नाही. त्यामुळे, अंतर ठेवणं महत्त्वाचं आहे."

"तुम्ही या व्यक्तीच्या अत्यंत जवळचे असाल. तर, त्यांचा हात पकडून त्यांना समजून घ्या."

पुढच्या मदतीसाठी पाठवा

मानसिक आजाराने ग्रस्त एखाद्या व्यक्तीला वैद्यकीय सल्ला घेण्याची गरज असेल. तर, त्यांना डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला द्या.

पण, मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्तीलाच पुढे मदत घ्यायची का नाही हे ठरवावं लागेल.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)