टोकियो ऑलिम्पिक: पी. व्ही. सिंधूची उपांत्यपूर्व फेरीत धडक

पी. व्ही. सिंधू

फोटो स्रोत, Getty Images

टोकियो ऑलिम्पिक : कोणत्या देशांना किती पदकं?

रँकिंग

भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्टचा 21-15, 21-13 ने पराभव केला.

जागतिक क्रमवारीत 12 व्या क्रमांकावर असणाऱ्या मियाचा सिंधूने सरळ दोन सेटमध्ये पराभव केला.

पी. व्ही. सिंधूकडून विजयी घोडदौड सुरूच आहे. बुधवारी तिने हाँग काँगच्या चाँग नंग या खेळाडूला हरवले होते.

पी. व्ही. सिंधूच्या या खेळामुळे तिच्याकडून आशा उंचावल्या आहेत.

भारतीय हॉकी संघाचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघानेही अर्जेंटिनावर विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. भारताने अर्जेंटिनाला 3-1 अशी मात देत उपांत्यपूर्व फेरीतील आपला प्रवेश निश्चित केला.

हॉकी

फोटो स्रोत, Getty Images

एकीकडे बॅडमिंटनमध्ये पी. व्ही. सिंधूची घोडदौड सुरू असताना ही आणखी एक चांगली बातमी आहे. यामुळे भारताच्या पदकाच्या आशा वाढल्या आहेत.

पुल ए मधील या सामन्यात सुरुवातीपासूनच भारताने अर्जेंटिनावर वर्चस्व ठेवलं. अर्जेंटिनानेही चांगला बचाव दाखवत बराच वेळ बरोबरीची स्थिती कायम ठेवली होती. सामन्याच्या हाफ टाईमपर्यंत दोन्ही संघ एकही गोल करू शकले नव्हते.

पण विश्रांतीनंतर भारताने एकामागून एक गोल करून आघाडी मिळवली आणि अखेरपर्यंत ती कायम ठेवली. भारताचा पुढील सामना आता जपानविरुद्ध होणार आहे.

बुधवारी काय घडलं?

मराठमोळा तिरंदाज प्रवीण जाधवचं ऑलिम्पिकमधलं आव्हान संपुष्टात आलं.

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असणाऱ्या अमेरिकेच्या ब्रॅडी अॅलिसनने एलिमिनेशन राऊंडमध्ये प्रवीणवर 6-0 असा विजय मिळवला.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून ऑलिम्पिकपर्यंत वाटचाल केलेल्या प्रवीणला सांघिक पुरुष तसंच मिश्र दुहेरीत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती.

मात्र वैयक्तिक प्रकारात प्रवीणने 6-0 असा विजय मिळवत दिमाखदार सुरुवात केली.

भारतीय खेळाडूंचे सामने कधी आहेत? पाहण्यासाठी क्लिक करा..

Please wait...

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)