टोकियो ऑलिम्पिक रद्द होणार? आयोजकांनी दिलं 'हे' उत्तर...

फोटो स्रोत, Getty Images
टोकियो ऑलिम्पिकच्या आयोजन समितीनं स्पर्धा रद्द होण्याच्या शक्यता फेटाळलेल्या नाहीत.
कोरोना संसर्गाच्या वाढत्या आकड्यांवर लक्ष असून गरज भासल्यास याबाबत चर्चा करणार असल्याचं टोकियो ऑलिम्पकचे प्रमुख तोशिरो मुटो म्हणाले.
या पातळीवरही ऑलिम्पिक स्पर्धा रद्द केली जाऊ शकते का? असा प्रश्न बुधवारी (21 जुलै) एका पत्रकार परिषदेत तोशिरो मुटो यांना विचारण्यात आला होता.
त्याचं उत्तर देताना मुटो यांनी ऑलिम्पिक स्पर्धा रद्द करण्याच्या शक्यता फेटाळलेल्या नाही.
''जर संसर्गाची प्रकरणं वाढली तर आम्ही याबाबत चर्चा सुरू ठेवू. या परिस्थितीमध्ये जर कोरोनाची प्रकरणं वाढली तर काय करायचं याचा विचार करावा लागेल,'' असं मुटो म्हणाले.
मुटो यांच्या या वक्तव्यानंतर टोकियो ऑलिम्पिकच्या प्रवक्त्यांनी आयोजकांचे प्रयत्न 100 टक्के स्पर्धा व्हाव्यात याकडंच असल्याचं म्हटलं आहे.
ऑलिम्पिक स्पर्धांचा शुभारंभ शुक्रवारी 23 जुलै रोजी होणार आहे. त्यापूर्वी ऑलिम्पिकशी संलग्न असलेल्या 70 पेक्षा अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी (आयओसी) चे अध्यक्ष टॉमस बक यांनी ऑलिम्पिक रद्द करणं हा 'पर्याय कधीच नव्हता', असं वक्तव्य केलं होतं. त्याच दिवशी तोशिरो मुटो यांचं हे वक्तव्य आलं आहे.
या महिन्याच्या सुरुवातीलाच जपाननं दर्शकांच्या अनुपस्थितीमध्येच ऑलिम्पिक स्पर्धांचं आयोजन केलं जाणार असल्याचं स्पष्ट केलं होतं.
जपानमध्ये आणीबाणी लागू
2020 मध्ये ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धा कोव्हिड-19 च्या साथीमुळं रद्द कराव्या लागल्या होत्या.
ऑलिम्पिक स्पर्धांच्या 124 वर्षांच्या इतिहासामध्ये प्रथमच या स्पर्धांना विलंब झाला आहे.
ऑलिम्पिकचं आयोजन होत असलेल्या टोकियो शहरात कोरोना संसर्गाची प्रकरणं झपाट्यानं वाढत असल्याचं समोर आलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
मंगळवारी (20 जुलै) टोकियोमध्ये कोरोनाची 1,387 नवी प्रकरणं समोर आली आहेत. टोकियो हे जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेलं शहर आहे.
संसर्गाचं प्रमाण पाहता जपानमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे. 22 ऑगस्टपर्यंत ही आणीबाणी लागू असेल.
8 ऑगस्ट रोजी ऑलिम्पिक स्पर्धा संपणार आहेत, तर पॅरालिम्पिक स्पर्धांची तारीख 24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर असेल.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








