कोव्हिड निर्बंध लवकर हटवल्याप्रकरणी नेदरलँड्सच्या पंतप्रधानांनी मागितली माफी

फोटो स्रोत, BART MAAT
कोव्हिडसंदर्भातील नियम लवकर शिथिल केल्याप्रकरणी नेदरलँड्सचे पंतप्रधान मार्क रुट यांनी देशवासियांची माफी मागितली आहे.
तीन आठवड्यांपूर्वी नेदरलँड्समध्ये कोव्हिड संदर्भातील निर्बंध शिथिल करण्यात आले. याद्वारे अनेक गोष्टी सुरू झाल्या. याचा परिणाम म्हणजे नेदरलँड्समध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली.
नाईटलाईफ सुरू झालं, अनेक तरुणांनी याचा फायदा घेतला.
शुक्रवारी नेदरलँड्समध्ये बार, रेस्टॉरंट आणि नाईटक्लब्सवर पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्यात आले.
याआधी पंतप्रधान रूट यांनी कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाल्याप्रकरणी दोष स्वत:कडे घेण्यास नकार दिला होता.
नियम शिथिल करणं हा विचारपूर्वक घेतलेला निर्णय आहे असं त्यांचं म्हणणं होतं.

फोटो स्रोत, EPA
शनिवारी, नेदरलँड्समध्ये 10,000 नवे कोरोना रुग्ण आढळल्याचं आरोग्य प्रशासनाने स्पष्ट केलं. डिसेंबर महिन्यानंतर एका दिवसात आढळलेले हे सर्वाधिक रुग्ण आहेत.
रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असली तरी सुदैवाने रुग्णालयात दाखल करावं लागणाऱ्यांची संख्या वाढलेली नाही.
कोरोनाचे नवे रुग्ण प्रामुख्याने तरुण मंडळी आहेत.
नेदरलँड्सच्या प्रौढ लोकसंख्येपैकी 46 टक्के लोकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरण बहुतांश झालं आहे. 77 टक्क्यांहून अधिक लोकांना लशीचा पहिला डोस मिळाला आहे.
युरोपातील अनेक देशांमध्ये डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग झाल्याने कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसते आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान रूट यांनी देशवासीयांची माफी मागितली आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









