अफगाणिस्तान : तालिबानशी संघर्ष झाल्यानंतर अफगाणिस्तानच्या सैन्याने काढला पळ

सैनिक

फोटो स्रोत, Reuters

तालिबानी कट्टरतावाद्यांविरोधात झालेल्या संघर्षानंतर अंदाजे एक हजारहून अधिक अफगाणिस्तानचे सैनिक आपला जीव मुठीत धरून ताजिकिस्तानला पळून गेल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

अफगाणिस्तानचा शेजारी देश ताजिकिस्तानने एक प्रसिद्धिपत्रक काढले आहे. त्यात त्यांनी म्हटले की 'अफगाणिस्तानचे सैनिक आपला जीव वाचवण्यासाठी सीमेवर पळून गेले.'

अफगाणिस्तानात गेल्या काही दिवसात हिंसाचारात वाढ झाली आहे. तालिबानचे अफगाणिस्तानातील अनेक क्षेत्रांवर नियंत्रण वाढत आहे.

सीमाभागात असलेल्या बदाख्शान प्रांतात असे अनेक भाग आहेत जिथं तालिबानचं नियंत्रण आहे.

त्याच वेळी अफगाणिस्तानातून पळून आलेल्या शरणार्थी सैनिकांना आश्रय देण्याची तयारी ताजिकिस्तानने सुरू केली आहे.

अमेरिकेने आपल्या फौजा अफगाणिस्तानातून काढून घेतल्यानंतर तालिबानचे वर्चस्व पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. ज्या गतीने तालिबानचे नियंत्रण वाढत आहे ते पाहिल्यावर असं जाणवतं की अफगाणिस्तानचे सैन्य तालिबानसमोर आपला टिकाव धरू शकत नाहीये.

अफगाणिस्तानमध्ये गेल्या 20 वर्षांपासून नाटोच्या (NATO) नेतृत्वात सुरू असलेली सैनिकी मोहीम संपुष्टात येत असतानाच तालिबानच्या कारवायांमध्ये वाढ झाली आहे. सप्टेंबरपर्यंत परराष्ट्रीय सैनिक परतणार आहेत, त्यापैकी बहुतांश सैनिक परतले आहेत.

तालिबान

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, तालिबान

नाटो आणि अमेरिकेने मिळून तालिबानसोबत एक करार केला होता. त्यानुसार अफगाणिस्तानमधून परराष्ट्रीय सैनिकांना बाहेर पडणे बंधनकारक होते.

त्या बदल्यात तालिबान अल-कायदा किंवा इतर कट्टरतावादी गटाला आपल्या कारवाया करू देणार नाही असं ठरलं होतं. पण आता तालिबानचं अफगाणिस्तानात पुन्हा आपले पाय रोवताना दिसत आहे.

व्हीडिओ कॅप्शन, 'अफगाण महिलांसाठी हे काळे दिवस असतील'

"तालिबान अफगाणिस्तानात एकानंतर एका जिल्ह्यावर ताबा मिळवत आहे. असं वाटत नाहीये की त्यांनी काही योजना बनवली आहे पण ते हे करत आहेत," असं मत अफगाणिस्तानचे पाकिस्तानातील माजी राजदूत डॉ. उमर जखिलवाल यांनी बीबीसी न्यूज डे च्या कार्यक्रमात व्यक्त केलं.

पुढे ते म्हणाले, "तालिबान त्याच ठिकाणी आपले वर्चस्व कायम करत आहे ज्या ठिकाणी ते आधीपासूनच शक्तिशाली होते."

या सर्व प्रकाराबाबत अफगाणिस्तानच्या लष्कराने नाराजी व्यक्त केली आहे.

लष्कराने म्हटलंय, "हा केवळ काही जिल्ह्यांचा प्रश्न नाही. तालिबानची भीती आता शहरापर्यंत पोहोचली आहे. सैनिकांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. ते कोणताही विरोध न करता आत्मसमर्पण करत आहे."

पुढे ते म्हणाले, "अफगाणिस्तानच्या लोकांना अशी आशा होती की अमेरिकन सैन्य या देशातून जाण्याआधी देशात शांतता प्रस्थापित केली जाईल. पण हे घडलेलं दिसत नाहीये."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)