इलॉन मस्क : 'मला एस्पर्जर्स सिंड्रोम, माझं डोकं वेगळ्या पद्धतीने काम करतं'

इलॉन मस्क

फोटो स्रोत, Getty Images

आपल्याला 'एस्पर्जर्स सिंड्रोम' असल्याचं जाहीर करत इलॉन मस्क यांनी म्हटलं की, माझं डोकं वेगळ्या पद्धतीने काम करतं

टेस्ला आणि स्पेसएक्स कंपनीचे मालक इलॉन मस्क यांनी आपल्याला 'एस्पर्जर्स सिंड्रोम' असल्याचं जाहीर केलं आहे. अमेरिकन कॉमेडी टेलिव्हिजन शो 'सॅटर्डे नाईट लाईव्ह' नावाच्या कार्यक्रमात त्यांनी हे सांगितलं.

इलॉन मस्क हे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील एक सुप्रसिद्ध चेहरा आहेत. इलॉन मस्क यांनी पहिल्यांदाच स्वत:बद्दलची ही माहिती दिल्याचे समजते.

49 वर्षीय मस्क यांनी या कार्यक्रमात प्रेक्षकांना सांगितलं की, "या कार्यक्रमात सहभागी होणारा 'एस्पर्जर्स सिंड्रोम' झालेला मी पहिली व्यक्ती आहे."

ज्या लोकांना एस्पर्जर्स सिंड्रोम आहे ते सामान्य लोकांच्या तुलनेत आजूबाजूच्या गोष्टींकडे वेगळ्या नजरेनं पाहतात, असं मानलं जातं.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

1970 साली सुरू झालेल्या 'सॅटर्डे नाईट लाईव्ह' कार्यक्रमात यापूर्वी ख्रिस रॉक, रिंगो स्टार्र आणि विल फॅरल यांच्यासारख्या प्रसिद्ध व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. याच कार्यक्रमात इलॉन मस्क गेस्ट होस्ट म्हणून सहभागी झाले होते.

ते म्हणाले, "विनोद करण्यासाठी मी एक उत्तम व्यक्ती आहे असं मला सांगण्यात आलं आहे. कारण माझ्या आवाजात चढ-उतार जास्त नसतात. खरं तर 'सॅटर्डे नाईट लाईव्ह' या कार्यक्रमात सहभागी होऊन मी इतिहास रचत आहे. कारण या कार्यक्रमाला होस्ट करणारा आणि एस्पर्जर्स सिंड्रोम असलेला मी पहिला व्यक्ती आहे."

दाव्यावर प्रश्नचिन्ह

कार्यक्रमादरम्यान अनेकांनी त्यांचे कौतुक केले आणि टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहन दिले. पण सोशल मीडियावर अनेकांनी त्यांच्या या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

यापूर्वी विनोदी अभिनेता डॅन आयकरॉएड यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यांनी एस्पर्जर्स सिंड्रोम आणि टुरेट सिंड्रोम (बोलताना उचकी लागणं) असल्याबद्दल उघडपणे सांगितले होतं, अशा पोस्ट सोशल मीडियावर केल्या जात आहेत.

या कार्यक्रमात मस्क यांनी ट्विटरवर आपल्या पोस्टसंदर्भात मस्करी करण्यासंदर्भात तसंच टीका करण्यात आल्याचंही सांगितलं.

इलॉन मस्क

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, इलॉन मस्क

ट्विटरवर मस्क यांचे 53 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. मस्क म्हणाले, "मला माहीत आहे की कधीकधी मी काहीतरी विचित्र पोस्ट करतो, पण माझा मेंदू अशाप्रकारेच काम करतो."

ते पुढे सांगतात, "ज्यांना माझ्यामुळे वाईट वाटलं आहे मला त्यांना पुन्हा एकदा सांगायचं आहे की, मी इलेक्ट्रिक कारचा शोध लावला आहे. मी रॉकेटने मंगळावर मानव पाठवणार आहे. तुम्हाला वाटतं का मी एक सामान्य माणूस होऊ शकतो?"

एस्पर्जर्स सिंड्रोम म्हणजे नेमके काय आहे?

- एस्पर्जर्स सिंड्रोम ही मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या आहे जी एखाद्या व्यक्तीवर वेगळ्या प्रकारे परिणाम करू शकते.

- काही लोक या समस्येला 'एस्पर्जर्स सिंड्रोम' म्हणतात. पण अनेकजण स्वत:ला ऑटिस्टिक किंवा ऑटिझम स्पेक्ट्रमवर असलेले, असंही म्हणतात.

- या समस्येने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला सांगितलेले किंवा न सांगितलेले काय आहे हे समजण्यास अडचण येऊ शकते तसंच एखाद्या प्रकारची माहिती आत्मसात करण्यात सामान्य माणसाच्या तुलनेत त्या व्यक्तीला जास्त वेळ लागतो.

- अशा व्यक्तीला आपल्या भावना व्यक्त करणेही कठीण असतं. असे लोक इतरांबद्दल अधिक संवेदनशील आणि नॉन-ऑटिस्टिक व्यक्तींपेक्षा जास्त भावनिक असू शकतात.

- एस्पर्जर्स सिंड्रोम असलेल्या बऱ्याच लोकांना एखाद्या विशिष्ट कामात सामान्य व्यक्तीपेक्षा जास्त रस असतो आणि ते त्यावर लक्ष केंद्रित करण्यास सक्षम असतात. बरेचजण त्यांचे करिअरही त्यात बनवतात.

(स्रोत: Autism.org.uk)

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)