बिल गेट्स, मेलिंडा गेट्स दाम्पत्याचा असा होता एकत्रित जीवनप्रवास - फोटो फिचर

बिल गेट्स मेलिंडा गेट्स

फोटो स्रोत, Getty Images

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल आणि मेलिंडा गेट्स दाम्पत्याने घटस्फोट घेणार असल्याचं नुकतंच जाहीर केलं. 27 वर्षांचा संसार केल्यानंतर दोघेही आता वेगळे होणार आहेत.

आयुष्याच्या पुढच्या टप्प्यात जोडीदार म्हणून आता आपण एकत्र राहू शकत नाही, त्यामुळेच आपण हा निर्णय घेत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

दोघांनी 2000 साली बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनची स्थापना केली होती. जगभरातील दारिद्र्य, रोगराई आणि विषमता या समस्यांविरुद्ध लढण्यासाठी ही स्वयंसेवी संस्था काम करते.

बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्ट या कंपनीची स्थापना केली होती. कॉम्प्युटरचे सॉफ्टवेअर बनवण्यासाठी ही कंपनी ओळखली जाते. आपल्या कारकिर्दीत उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतर बिल गेट्स 2008 मध्ये आपल्या पदावरून निवृत्त झाले होते.

बिल गेट्स यांची मेलिंडा यांच्याशी पहिली भेट 1980 च्या दशकात झाली होती. त्यावेळी मेलिंडा यांनी मायक्रोसॉफ्ट कंपनीत काम सुरू केलं होतं.

सध्या बिल गेट्स हे जगातील चौथे सर्वात श्रीमंत व्यक्ती असून फोर्ब्स मासिकाच्या माहितीनुसार त्यांच्याकडे 124 अब्ज डॉलर इतकी संपत्ती आहे.

फोटोंमधून पाहूया गेट्स दाम्पत्याचा एकत्रित जीवनप्रवास

गेट्स दांपत्याने 1998 साली आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी 10 कोटी डॉलर दान स्वरुपात दिले होते.

बिल गेट्स मेलिंडा गेट्स

फोटो स्रोत, Getty Images

2002 मध्ये मायक्रोसॉफ्ट कंपनीविरोधात एक अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. त्यावेळी मेलिंडा यांनी बिल यांना खंबीर साथ दिली होती.

बिल गेट्स मेलिंडा गेट्स

फोटो स्रोत, Getty Images

द इकोनॉमिस्ट या ब्रिटिश मासिकाने 2015 मध्ये ब्रसेल्स येथे आयोजित केलेल्या एका चर्चासत्रात बिल आणि मेलिंडा गेट्स यांनी सहभाग नोंदवला होता. यावेळी पुढील 15 वर्षांत आरोग्य, शिक्षण, शेती आणि बँकिंग क्षेत्रात होणाऱ्या बदलांवर चर्चा करण्यात आली.

बिल गेट्स मेलिंडा गेट्स

फोटो स्रोत, Getty Images

2015 मध्येच महाराणी एलिझाबेथ (दुसऱ्या) यांनी बकिंगहॅम पॅलेस येथे बिल गेट्स यांना नाईटहूड पदवीने सन्मानित केलं होतं.

बिल गेट्स मेलिंडा गेट्स

फोटो स्रोत, Getty Images

2015 मध्ये बिल आणि मेलिंडा गेट्स यांनी संयुक्त राष्ट्र संघटनेचे तत्कालीन सचिव बान की मून यांची भेट घेतली होती.

बिल गेट्स मेलिंडा गेट्स

फोटो स्रोत, Getty Images

2016 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी बिल आणि मेलिंडा गेट्स यांचा राष्ट्राध्यक्ष पदक देऊन गौरव केला होता.

बिल गेट्स मेलिंडा गेट्स

फोटो स्रोत, Getty Images

बराक ओबामा यांच्यासोबत बिल आणि मेलिंडा गेट्स -

बिल गेट्स मेलिंडा गेट्स

फोटो स्रोत, Getty Images

2017 मध्ये गेट्स दांपत्याला फ्रान्सचा लेजियन दे हॉनर हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला.

बिल गेट्स मेलिंडा गेट्स

फोटो स्रोत, Getty Images

2019 मध्ये एका टेनिस सामन्याचा आनंद घेताना बिल आणि मेलिंडा गेट्स

बिल गेट्स मेलिंडा गेट्स

फोटो स्रोत, Getty Images

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)