जर्मनी : ग्रेनेडच्या आकाराचं सेक्स टॅाय सापडल्यामुळे एकच गदारोळ

ग्रेनेड, सेक्स टॉय

फोटो स्रोत, POLIZEI HAUZENBERG

हातबॉम्ब असल्याच्या संशयावरून जर्मनीतल्या बवारिया राज्यात सोमवारी (27 एप्रिल) रात्री बॉम्ब तज्ज्ञांना बोलवण्यात आलं. पण संशयास्पद बॅग उघडल्यानंतर जे सापडलं त्याने खळबळ उडाली आहे.

जंगलामध्ये मिळालेल्या एका प्लास्टिकच्या एका पारदर्शक पिशवीमध्ये हँड ग्रेनेडसदृश गोष्ट असल्याची माहिती पसॉ शहरामधल्या अधिकाऱ्यांना मिळाली.

जॉगिंगसाठी गेलेल्या एका महिलेने पोलिसांना याविषयी कळवलं आणि जवळच्याच टिटलिंग जिल्ह्यातून स्फोटक हाताळणीत तज्ज्ञ असणारं पथक इथे पाठवण्यात आलं.

पण यामध्ये काहीही धोकादायक नसल्याचं लवकरच पोलिसांच्या लक्षात आलं.

"बॅगमधलं सामान लक्षपूर्वक पाहिल्यानंतर त्या रबराने तयार करण्यात आलेल्या प्रतिकृती असल्याचं अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं. ती बॅग रिकामी करून हे सामान तपासण्यात आलं. त्यामध्ये एक ल्युब्रिकंट ट्यूब, न वापरलेली दोन कंडोम आणि एक युएसबी केबल होती."

या सामानातली हँड ग्रेनेड म्हणजेच हातबॉम्बसारखी दिसणारी वस्तू ही सेक्स टॉय असल्याची खात्री पटल्याचं या अधिकाऱ्यांनी म्हटलंय. इंटरनेट सर्च केल्यानंतर याला दुजोरा मिळाल्याचं या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

"या वस्तू इथे कशा आल्या आणि का ठेवण्यात आल्या याची कल्पनाच करू शकतो," असं पोलिसांच्या माहितीमध्ये म्हटलं आहे.

दुसऱ्या महायुद्धादरम्यान वापरलेली, स्फोट न झालेली स्फोटकं आणि बॉम्ब अजूनही जर्मनीत अनेकदा मिळतात आणि त्यामुळे परिसर रिकामा करावा लागतो. म्हणून अशा प्रकारची माहिती मिळाल्यानंतर पोलिस तातडीने पावलं उचलतात.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)