इजिप्तमध्ये सापडलं 3000 वर्षांपूर्वीचं 'हरवलेलं सोनेरी शहर'

इजिप्त, इतिहास,

फोटो स्रोत, DR ZAHI HAWASS ON FACEBOOK

फोटो कॅप्शन, इजिप्तमध्ये सापडलेलं शहर

इजिप्तमध्ये 3,000 वर्षांपूर्वीचं शहर सापडलं आहे जे वाळूच्या ढिगाऱ्याखाली गेलं होतं. तुतनखामुनच्या थडग्यानंतरचं हे सगळ्यात महत्त्वपूर्ण उत्खनन आहे असं म्हटलं जात आहे.

लक्झोर जवळ हे सोनेरी शहर सापडल्याची घोषणा प्रसिद्ध उत्खननकार झाही हवास यांनी केली. इजिप्तमध्ये सापडलेलं हे सगळ्यात पुरातन अशा स्वरुपाचं शहर असं हवास यांनी म्हटलं.

सप्टेंबर 2020 मध्ये उत्खननाला सुरुवात झाली आणि काही महिन्यातच याचा शोध लागला.

इजिप्तमध्ये आमेनहोटेप 3 यांचं इसवीसनपूर्व 1391 आणि 1353 यांच्य साम्राज्यातलं शहर आहे.

या शहराचा वापर आय आणि तुतनखामुन या राजांकडून केला जात होता. त्यांचे टोम्ब 'व्हॅली ऑफ किंग्ज'मध्ये शाबूत स्थितीत आढळले होते.

हे शहर सापडणं हे तुतनखामुन थडग्याच्या उत्खननानंतरची सगळ्यात मोठी घटना आहे, असं अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स विद्यापीठातील प्राध्यापक बेस्टी ब्रायन यांनी सांगितलं.

इजिप्त, इतिहास,

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, तुतनखामुन थडग्याच्या इथे डॉ. हवास

प्राचीन इजिप्तमधील जीवन कसं होतं याची कल्पना आपल्याला या शहराच्या माध्यमातून येऊ शकेल, असं ब्रायन म्हणाल्या. धनाढ्य अशा स्वरुपाचे ते साम्राज्य होतं.

उत्खननात अनेक मौल्यवान वस्तू सापडल्या. यामध्ये अलंकार, रंगीत भांडी, नाणी यांचा समावेश आहे.

इजिप्तची राजधानी कैरोपासून तीनशे किलोमीटरवर असलेल्या लक्झोर जवळच्या 'व्हॅली ऑफ किंग्स' जवळ उत्खनन सुरू करण्यात आलं.

इजिप्त, इतिहास,

फोटो स्रोत, ZAHI HAWASS ON FACEBOOK

फोटो कॅप्शन, उत्खननात रंगीत भांडी सापडली आहे.

कामाला सुरुवात झाल्यानंतर, काही आठवड्यातच मातीची भांडी वेगवेगळ्य ठिकाणी सापडू लागली, असं डॉ. हवास यांनी निवेदनात सांगितलं.

एक मोठं शहर जे चांगल्या स्थितीत आहे. भिंती सुस्थितीत होत्या, घरांमध्ये दैनंदिन वापरली जाणारी उपकरणं होती.

उत्खनाला सुरुवात होऊन सात महिन्यांनंतर, या मोठ्या शहराच्या जवळच्या भागातली ठिकाण शोधून काढण्यात आली आहेत. बेकरी, प्रशासकीय कार्यालय आणि निवासी परिसरही आढळून आला आहे.

अनेक विदेशी यंत्रणांनी या शहराचा शोध घेतला मात्र त्यांना ते सापडलं नाही, असं डॉ. हवास यांनी सांगितलं. ते माजी अँटीक्विटीज मिनिस्टर आहेत.

इजिप्त, इतिहास,

फोटो स्रोत, DR ZAHI HAWASS ON FACEBOOK

फोटो कॅप्शन, अशा प्रकारे शहर वसलं होतं.

उत्खननाचं आणखी काम घटनास्थळी सुरू आहे. खजिन्यांचा समावेश असलेल्या कबरी या उत्खननात सापडू शकतात अशी खात्री उत्खनन पथकाला वाटते.

गतवैभवाच्या माध्यमातून पर्यटन उद्योगाला चालना देण्याचा इजिप्तचा मानस आहे. अनेक वर्षांच्या राजकीय अस्थिरतेमुळे तसंच कोरोना संकटामुळे पर्यटन उद्योगाला मोठा फटका बसला आहे.

गेल्या आठवड्यात, इजिप्तची राजधानी कैरोमध्ये, त्यांच्या प्राचीन राजांच्या अवशेषांची मिरवणूक काढण्यात आली.

इजिप्त, इतिहास,

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, अशा स्वरुपाच्या कलाकृती आढळल्या आहेत.

अतिभव्य अशा मिरवणुकीत 22 ममीजचा समावेश होता. अठरा राजे आणि चार राण्यांच्या या ममी होत्या. संग्रहालयातून नव्या नॅशनल म्युझियम ऑफ इजिप्तिशियन सिव्हिलायझेशन याठिकाणी ममी नेण्यात आल्या.

आमेनहोटेप 3 आणि राणी ताय यांच्या ममीजचा यामध्ये समावेश होता.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)