You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोणताही सेक्स सीन नाही, पण सेक्सचा संदर्भ आल्याने सेन्सॉर झाला होता चित्रपट
- Author, नील आर्मस्ट्राँग
- Role, बीबीसी कल्चर
1939 साली लिहिण्यात आलेलं पुस्तक "ब्लॅक नार्सिसस वर काही वर्षांनी चित्रपट बनवण्यात आला होता. आता ही कथा टीव्हीवर दाखवण्यात येत आहे.
ब्लॅक नार्सिसस ही कहानी नन्सच्या आयुष्यावर होती. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात काही नन्सनी दार्जिलिंग सोडतात आणि त्या मोपूमधील जनरलच्या महालात राहायला जातात. या महालाला कॉन्वेन्ट ऑफ सेंट फेथ असंही म्हटलं जात होतं."
रुमर गॉडेन यांच्या "ब्लॅक नार्सिसस" असं काहीच नाही ज्यामुळे त्याच्यावर आधारित चित्रपटाला कात्री लागेल. पण जगप्रसिद्ध दिग्दर्शक मार्टिन स्कॉर्सेजीने देखील या चित्रपटाला 'कामोत्तेजना' उद्युक्त करणारा चित्रपट म्हणून संबोधलं होतं.
त्यावेळी या चित्रपटाची निर्मिती ब्रिटनमधील दिग्दर्शक मायकल पॉवेल आणि हंगेरीमध्ये जन्मलेले निर्माता-लेखक एमरिक प्रेसबर्गर यांनी बनवलं होतं.
या जोडीने अनेक दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली. पण, "ब्लॅक नार्सिसस"ला सर्वांत जास्त पसंत करण्यात आलं. याच चित्रपटावर आता नवीन सीरिज येत आहे. बीबीसीने या सीरिजची निर्मिती केली आहे. यात जेमा आर्टर्टन आणि आइस्लिंग फ्रैकोसी यांनी अभिनय केला आहे.
हे गॉडेन यांच तिसरं पुस्तक आणि पहिलं बेस्टसेलर होतं. चित्रपट समीक्षकांनी हा चित्रपट अत्यंत सुंदर असल्याचं म्हटलं होतं.
टीव्हीसाठी तीन भागांमध्ये बनलेल्या या सिरीजच्या लेखिका अमांडा कोए सांगतात, त्यांच्यासाठी ही सिरीज "दि शाइनिंग विद नन्स" आहे.
गॉडेन यांचा मृत्यू 1998 साली झाला 90 व्या वर्षी झाला. त्यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला होता. मात्र, भारतात त्यांनी बराच काळ वास्तव्य केलं होतं. गॉडेन यांनी 60 पेक्षा जास्त पुस्तकांचे लिखाण केलं. त्यांच्या अनेक पुस्तकांवर चित्रपट बनवण्यात आले.
'ब्लॅक नार्सिसस' ही अॅंग्लो-ख्रिश्चन नन्सची गोष्ट आहे. या नन्सला हिमालयात 8000 फूट उंचीवर बनवण्यात आलेल्या महालात पाठवण्यात येतं. त्यांना स्थानिक लोकांसाठी एक शाळा आणि दवाखाना सुरू करण्याची सूचना देण्यात आलेली असते.
कमी अनुभव असलेल्या सिस्टर क्लोडगची या मिशनच्या प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात येते. सर्व नन्समध्ये सिस्टर रूथला सांभाळणं सर्वांत कठीण काम होतं.
हा महाल एका खोल दरीत बांधण्यात आलेला असतो. स्थानिक लोक या महालाला महिलांचा महाल म्हणून ओळखायचे. त्याठिकाणी आत्म्यांचा वास आहे असं देखील स्थानिकांना वाटत असतं.
महालात रहाताना या नन्सच्या मनात संसारिक इच्छा उत्पन्न होते. एक सिस्टर भाज्यांच्या जागी फुलांची झाडं लावते. त्या बागेशी तिला प्रेम होतं.
मुलांना सांभाळणाऱ्या एका ननच्या मनात, आपलंही मूल असावं अशी भावना निर्माण होते. सिस्टर क्लोडग वयात असतानाच्या प्रेम संबंधाच्या आठवणीत रममाण होते. तर, सिस्टर रुथ गावात रहाणाऱ्या एका ब्रिटीश मिस्टर डीन यांच्यासाठी कामातुर होते.
गावातील एक सुंदर मुलगी कांचीने नन्सनी शिकवलेल्या मुलांच्या डोक्यात काही गोष्टी भरवल्यानंतर, त्यांची कामोत्तेजना आणि वाढते आणि मग संयमाचा बांध तुटतो.
या पुस्तकात यौन संबंधांवर विस्ताराने काहीच लिहिण्यात आलेलं नाही. मात्र, ही गोष्ट चित्रपटाच्या माध्यमातून समोर आली. तर, लोकांची कामोत्तेजना वाढवणारी ठरेल असं पॉवेल यांना वाटलं.
पॉवेल यांचे क्रिएटिव्ह पार्टनर प्रेसबर्गर, गॉडेन यांना जेवणासाठी बाहेर घेऊन गेले. आणि यावर चित्रपट बनवण्याची योजना असल्याची माहिती दिली.
जर त्यांना सेन्सॉरची परवानगी मिळाली. तर, ब्लॅक नार्सिससची गोष्ट मोठ्या पडद्यावर येईल असं त्यांनी सांगितलं.
1946 साली पॉवेल आणि प्रेसबर्गर यांनी चित्रपटावर काम सुरू केलं. त्यांची टीम पहिल्यापासूनच यशस्वी होती. त्यांनी "लाइफ एन्ड डेथ ऑफ कर्नल ब्लिंप" आणि "अ कॅटरबरी टेल" या चित्रपटांची निर्मिती केली होती.
"अ मॅटर ऑफ लाइफ एन्ड डेथ" रिलीज झाल्यानंतर त्याच वर्षी, त्यांची निवड रॉयल फिल्म परफॉर्मन्ससाठी करण्यात आली.
"ब्लॅक नार्सिसस" या चित्रपटाचं शूटिंग भारतात फार खार्चिक आणि आव्हानात्मक असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. म्हणून त्यांनी एक वेगळा निर्णय घेतला.
ब्रिस्टल युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसर सारा स्ट्रीट यांच्या माहितीनुसार, "पॉवेल यांनी या गोष्टीकडे सकारात्मक नजरेने पाहिलं. स्टुडिओत चांगला चित्रपट निर्माण करता येईल असं त्यांना वाटलं. हिमालय पर्वत दाखवण्यासाठी त्यांनी ससेक्सच्या पश्चिमेला होरशामच्या लियोनार्डलीत चीडच्या जंगलाची निवड केली.
क्लोगड यांच्या भूमिकेसाठी डेबोरो केर आणि रूथ यांच्या भूमिकेसाठी कॅथरीन बायरन यांची निवड करण्यात आली. पॉवेल यांचे दोन्ही अभिनेत्रींसोबत संबंध होते असं म्हटलं जात असे. आपल्या आत्मचरित्रात ते लिहितात, "बायरन यांनी एकदा त्यांच्यावर बंदूक रोखली होती. नग्न महिला आणि बंदूक उत्तेजना देणाऱ्या गोष्टी आहेत."
बायरन यांनी ही गोष्ट फेटाळून लावली होती. त्या सांगतात, "मला ब्लॅक नार्सिसस"मध्ये रोल ऑफर करण्यात आल्यानंतर, माकल पॉवेल यांनी त्यांना एक तार पाठवली होती. त्यात आम्ही तुम्हाला सिस्टर रुथची भूमिका देत आहोत असं सांगण्यात आलं होतं. अशी भूमिका तुम्हा पुन्हा कदाचीत मिळणार नाही. ते योग्य होते."
चित्रपट रिलीज झाल्यानंतर अनेक वर्षांनी सुद्धा बायरन एक विचित्र नन च्या रूपात लोकांच्या आठवणीत जिवंत आहेत.
सारा स्ट्रीट सांगतात, 44 दिवसांच्या शूटींगसाठी त्यांना फक्त 900 पाउंड देण्यात आले. 55 दिवसांच्या शूटींगसाठी केर यांना 16 हजार पाऊंड देण्यात आले.
क्लासिक चित्रपट
ब्रिटनमधील दिग्दर्शकांना हा चित्रपट फार आवडला. समीक्षक या चित्रपटावरून काही गोंधळलेले होते. (सिनेमॅटोग्राफर जॅक कार्डिक यांना ऑस्कर मिळाला) आणि रूमर गॉडेन नाराज होत्या.
अमेरिकेच्या कॅथलिक लीजन ऑफ डिसेंसीची नाराजी दूर करण्यासाठी सिस्टर क्लोडग यांच्या नन बनण्याआधीच्या जीवनाची दृष्य चित्रपटातून वगळण्यात आली. काही आणखी दृष्यांना कात्री लावण्यात आली.
या चित्रपटावर सुरूवातीला आयर्लॅंडमध्ये निर्बंध घालण्यात आले. या चित्रपटात कामोत्तेजना असल्याने क़ॉन्वेंट जीवनाची खिल्ली उडवली जाईल असं सेन्सॉर बोर्डाला वाटलं.
1970 मध्ये या चित्रपटाची पुन्हा समीक्षा करण्यात आली. आता या चित्रपटाला क्लासिक म्हणून ओळखलं जातं.
स्कॉर्सेजी यांना लहानपाणापासूनच पॉवेल आणि प्रेसबर्गर यांच्या चित्रपटांविषयी प्रेम आहे. ते सांगतात, चित्रपटाच्या सुरूवातीला दि आर्चर्सचा लोगो पाहिल्यानंतर आता सर्वांना काहीतरी खास पहाण्यासाठी मिळणार अशी माझी धारणा होती.
स्कॉर्सेजी यांनी एका डीव्हीडी रिलीजच्या ऑडियो कॉमेंन्ट्रीमध्ये "ब्लॅक नार्सिसस" पहिली इरॉटिक स्टोरी आहे असं म्हटलं होती.
ज्यांना या चित्रपटाविषयी शंका आहे, त्यांनी चित्रपटाचा शेवटचा सीन पाहायला हवा. ज्यात सिस्टर क्लोडग कामोत्तेजनेने प्रेरित झालेल्या सिस्टर रूथच्या खोलीत जाते. ती लाल रंगाच्या ड्रेसमध्ये असते.
सिस्टर रूथ ओठांवर लिपस्टिक लावत असते आणि ते लावत असताना ती सिस्टर क्लोडगला टोमणा मारते.
या दृश्यांना क्लोजअपमध्ये चित्रित करण्यात आलं आहे. या दृश्यात कुठेही नग्नता किंवा अश्लीलता नाही पण तरीदेखील ते दृश्य कामोत्तेजक आहे असं अनेकांना वाटलं होतं. अमेरिकेत हा सीन देखील कापण्यात आला होता.
स्ट्रीट पुढे सांगतात, "लिपस्टिकचं दृश्य विश्वास ठेवता न येणारं आहे. ही दृश्यं कामोत्तेजना वाढवणारी आहेत."
टीव्हीसाठी बनवण्यात आलेल्या भागामध्ये हे दृश्य दाखवण्यात आलं आहे. कोए सांगतात, "ज्यांना हा चित्रपट आवडला. त्यांना काही गोष्टी नक्कीच पाहायच्या असतील. "
आर्टर्टन सिस्टर क्लोडग तर, सिस्टर रूथ यांची भूमिका फ्रॅकोसी यांनी साकारली आहे.
नवीन युगासाठी "ब्लॅक नार्सिसस "
ही मिनी सिरीज पॉवेल आणि प्रेसबर्गर यांच्या चित्रपटांना श्रद्धांजली आहे. या चित्रपटात ब्रिटीश साम्राज्याचं पतन होण्याच्या दृश्यांना अधिक दाखवण्यात आलं आहे.
सिस्टर ब्लॅंच यांची भूमिका पॅट्सी फेरान, फुलांसाठी वेडी असलेल्या सिस्टर फिलिप्पाची भूमिका कॅरेन ब्रायसन यांनी साकारली आहे.
मिस्टर डीनच्या भूमिकेत एलेसांद्रो निवोला आहेत. त्यांच्या पत्नी एमिली मॉर्टिमर 2010 मध्ये स्कॉर्सेस यांचा सायकॉलॉजीकल थ्रिलर "शटर आयलॅंड" मध्ये काम करत होत्या. त्यावेळी त्यांनी एमिली यांना हा चित्रपट पहाण्यासाठी सांगितला होता.
निवोला यांनी बीबीसी कल्चरशी बोलताना सांगितलं, "शटर आयलॅंडला ते ज्या पद्धतीने चित्रित करण्याचा प्रयत्न करत होते. त्यामागे "ब्लॅक नार्सिसस " एक प्रेरणा होती. चित्रपटाच्या सर्व कलाकारांनी हा चित्रपट पहावा अशी त्यांची भावना होती. "
"मला आठवतंय. यात सर्व प्रकारची कामोत्तेजना होती. पण, कोणत्याच गोष्टीचं स्पष्ट प्रदर्शन करण्यात आलं नव्हतं," असं ते पुढे सांगतात.
वास्तवात या चित्रपटात दाखवण्यात आलेली कामोत्तेजना सांकेतिक आहे. रविवारी दुपारी टीव्हीवर दाखवल्यानंतरही याबद्दलची तक्रार आली नाही.
कोए सांगतात, "माझ्यामते ही गोष्ट सर्व पाहू शकतात. या गोष्टीत कामोत्तेजना दबलेली राहिली असल्याने मी यावर काम करणं पसंत केलं."
समानता आणि अंतर
पॉवेल आणि प्रेसबर्गर यांनी बनवलेला चित्रपट आणि टीव्ही सिरीयल यांच्यात एका गोष्टीच साम्य आहे. याचे एक सहनिर्माते प्रेसबर्गर यांचे नातू. तर, क्रू मधील एक सदस्य गॉडेन यांची नात आहे.
या सिरीजची काही दृश्यं नेपाळमध्ये चित्रित करण्यात आली. मात्र, मोठा हिस्सा चीडच्या जंगलात बनवण्यात आलेल्या सेटवर चित्रित करण्यात आला.
हा चित्रपट ब्रिटबॉक्सवर उपलब्ध आहे. मात्र, एक सूचना देण्यात आली आहे. "ही सीरिज कामोत्तेजना किंवा धार्मिक गोष्टींशी संबंधित नाही. मात्र बदललेल्या सामाजिक मुल्यांशी निगडित आहे. या क्लासिक ड्रामामध्ये दाखवण्यात आलेल्या ब्लॅकफेड प्रदर्शनामुळे लोकांना वाईट वाटू शकतं."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)