मॉडेलच्या फोटोला पोप फ्रान्सिस यांच्या अकाउंटवरून लाइक कुणी केले याची चौकशी होणार

पोप

फोटो स्रोत, Getty Images

व्हेटिकनचे पोप फ्रान्सिस यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ब्राझिलियन मॉडेल नतालिया गेरीबोतोच्या फोटोला लाइक करण्यात आले आहे. त्यावरून सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.

पण हे लाइक पोप यांनी केले नसल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. अद्याप हे स्पष्ट झाले नाही की अत्यंत कमी कपड्यातल्या नतालियाच्या फोटोला नेमकं या अकाउंटवरुन लाइक कसं मिळालं.

या घटनेमुळे व्हेटिकनचे अधिकारी चांगलेच त्रस्त झाले आहेत. नतालियाच्या एजन्सीने मात्र पोप यांच्या कथित लाइकचे स्वागतच केले आहे. त्यात तिच्या वतीने म्हटलं आहे की 'आता तर मला पोपनेच लाइक केले आहे. मला नक्कीच पोपचे आशीर्वाद मिळतील.'

इंस्टाग्राम

फोटो स्रोत, Instagram

मॉडेल नतालिया गेरीबोतोचे इंस्टाग्रामवर 24 लाख फॉलोअर्स आहेत. ती म्हणते 'आता तर हे निश्चितच आहे की मी स्वर्गातच जाणार आहे.'

व्हेटिकनने सांगितले आहे की पोप फ्रान्सिस यांचे ट्विटर अकाउंट एका टीमद्वारे सांभाळले जाते. त्या टीममधील सदस्याकडून हे लाइक गेलेलं असू शकतं.

पोप फ्रान्सिस हे सोशल मीडियावर लोकप्रिय आहेत. त्यांच्या अकाउंटला 74 लाख फॉलोअर्स आहेत पण त्यांनी कुणालाही फॉलो केलेले नाही. व्हेटिकनचे म्हणणे आहे की पोप फ्रान्सिस हे त्यांच्या अकाउंटवरुन ट्वीट करत नाहीत.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)